प्रेम तुझे अन् माझे

Submitted by Nilesh Patil on 11 June, 2018 - 12:24

--प्रेम तुझे अन् माझे--

माझ्यात तु तुझ्यात मी
असेच आपण मिसळावे..।
प्रेम आपले तुझे अन् माझे,
नीत असेच फुलत जावे..।

नेहमी आपली भेट घडावी,
दूर अशाच डोंगरावरती..।
होऊ असे प्रेमात एकप्राण,
जसे की गोंदण देहावरती..।

जाऊ आपण दूर एकट्यात,
जिथे चिटपाखरूही कुणी नसेल..।
तिथे फक्त आपल्या दोघांच्या,
ह्रदयाच्या स्पंदनांचा गाज असेल..।

मन साजनी तुझे अन् माझे,
असेच नीत अडकत जावे..।
प्रेम आपले तुझे अन् माझे,
नीत असेच फुलत जावे..।

--निलेश पाटील--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users