अलबत्या गलबत्या....पोरांसाठी आणि थोरांसाठी पण

Submitted by स्मिता श्रीपाद on 11 June, 2018 - 03:17

शाळा सुटता, पुस्तक मिटता, करुया आपण गमत्या जमत्या..
अलबत्या गलबत्या..... अलबत्या गलबत्या.... अलबत्या गलबत्या... अलबत्या..

भरत नाट्य मंदीर चा ४९ वा हाउसफुल शो चालु होता.आजुबाजुला बसलेला लहानथोर तमाम प्रेक्षकवर्ग या गाण्यावर ताल धरुन टाळ्या वाजवत होता.
खुर्चीत बसुन नाचत होती पोरं नुसती.
पहिल्या गाण्यापासुन नाटकानं जी पकड घेतली ती शेवटच्या गाण्यापर्यंत सुटली नाही.सुमारे २.५ तास कापरासारखे उडुन गेले.
"अलबत्या गलबत्या" पाहायचा कालच योग आला.नाटक म्हणायला बालनाट्य पण मोठे पण तितकेच रंगुन गेले होते.
मोठ्यानी लहानांसाठी केलेलं हे बालनाट्य अतिशयच सुंदर आहे.

तसं बघायला गेलं तर ही परिकथाच म्हणायची..
राजा आहे, राजकन्या आहे, प्रधान आहे, आणि एक चेटकीण आहे.पण ती सुद्धा कशी..?.?तर दुष्ट नव्हे...थोडी गमतीशीर, गाणी गाणारी, जादु करणारी, काहिशी विसराळू...तिची भिती वाटणारच नाही अशी.
वैभव मांगले ने चेटकिणीच्या भुमिकेत कमाल केली आहे.
जंगलाच्या देखण्या,भव्य अशा नेपथ्याच्या पार्श्वभुमीवर, एका वेलीच्या आडुन डोकावत चेटकीण रंगमंचावर प्रवेश करते ती टाळ्याच्या कडकडाटातच...
चेटकिणीच्या जादु, तिचे मंत्र, तिने केलेल्या गमतीजमती, तिला साथ देणारे तिचे गुलाम सगळेच आपापल्या जागी चोख.
पोट धरुन हसायला लावणारे आणि मुख्य म्हणजे मुलांना कळणारे खुप सुंदर पंचेस अगदी चपखल वापरले आहेत...
अधे मधे मुलांना आणि त्यांच्या पालकांना मोबाईल चे व्यसन, मराठी भाषेबद्दलची अनास्था ई साठी कानपिचक्या पण आहेत...परीकथा असली तरी ती आजच्या पिढीला जवळची वाटते.
बालनाट्य म्हणुन मोठ्याना कुठेही कंटाळा येणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली गेली आहे. हे यश उत्तम नाटक लिहिणार्या लेखकाचे आणि आजच्या पिढीनुसार त्यात बदल करुन ते आपल्यापुढे सादर करणार्या दिग्दर्शकाचे देखिल...
वैभव मांगले सोडुन बाकी सगळे कलाकार नवीन आहेत पण आपापल्या वाट्याची कामं ईतकी चोख केली आहेत लोकांनी की बस...
अलबत्या गलबत्या झालेला नट तर खुप खुप आवडला.
गाणी, नृत्य, संवाद, नेपथ्य सगळ्याच आघाड्यांवर नाटक मन जिंकतं
आणि हो, रंगमंच्याच्या मर्यादा सांभाळुन या नाटकात स्पेशल ईफेक्टस पण वापरले आहेत बरका. पण ते काय आहेत हे प्रत्यक्ष पाहाण्यात मजा.
२८ दिवसात ५० प्रयोग आणि सगळेच्या सगळे हाउसफुल यातच सगळं आलं.
तर आपापल्या पोरांना घेउन नक्की नकी बघा...
अलबत्या गलबत्या...

लेखकः रत्नाकर मतकरी
दिग्दर्शचः चिन्मय मांडलेकर
नेपथ्यः संदेश बेन्द्रे
निर्मिती: अद्वैत थिएटर
कलाकारःवैभव मांगले आणि ईतर.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

झी मराठी वर सतत जाहिरात पाहून फार उत्सुकता होती या बालनाट्याबद्दल. इकडे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
संधी मिळाली की नक्कीच पहायचं आहे हे बालनाट्य.

जवळजवळ एका वर्षा पूर्वीची या लेखावरची प्रतिक्रिया काल एकदम आठवली. निमित्त होतं झी मराठीच्या कालच्या कार्यक्रमात वैभव मांगलेची चिंची चेटकीण.. Happy
मागच्याच वर्षी जुलै मधे नाटक पहायचा योग आला. संपूर्ण लेखाशी सहमत. वैभव मांगले कमाल करतोय चिंची चेटकीच्या भूमिकेत !
बालगोपाळांना नक्की दाखवावं असं नाटक !