स्पर्श

Submitted by kokatay on 10 June, 2018 - 17:03

मेघाला कॉलेजमधुन निघायला खुपच उशीर झाला होता. येत्या वार्षिक समारंभामध्ये ती सूत्रधार म्हणून निवडली गेली होती. कॉलेज च्या बाहेर येऊन ती रिक्षाची वाट बघत होती. कुणी रिक्षावाला थांबतच नव्हता, अंधारहि व्हायला लागला होता. आता काय करू? असा प्रश्न तिला पडला आणि तिनं पर्स मधून फोन काढला, निदान घरी कळवते आणि तिचा भाऊ समीर घरी आला असल्यास त्याला बाईक वरून मला न्यायला ये असं सांगते....तर फोन “डेड” झाला होता, सकाळ पासून चार्ज केलाच नव्हता.
कितीवेळ कुणी रिक्षावाला थांबतच नव्हता, काळी कुळकुळीत रात्र आपला पदर पसरतच चालली होती. आता मात्र तिला खूप भीती वाटयला लागली होती, तरी तिनं आपलं मन शांत ठेऊन आणखी थोडावेळ वाट बघायचे ठरवले, तितक्यात एक रिक्षा तिच्या जवळ येऊन थांबली, ती काहीही न विचार करता सरळ त्यात शिरली आणि चालकाला म्हणाली “लकडी पूल “ चलना है, तो काहीच बोलला नाही आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली, आता तिच्या लक्षात आले कि तो काही विचित्रच वाटत होता, बहुतेक प्यायलेला असावा आणि आता मात्र तिला भीती वाटायला लागली ...पण काहीच इलाज नव्हता. थोड्याच वेळात ती रिक्षा वेगानी धावायला लागली आणि तिच्या लक्षात आलं कि तो रस्ताही चुकला आहे, हा रस्ता तिच्या घराकडे जाताच नाही. ती लगेच ओरडली आणि म्हणाली “ भैया ये रास्ता गलत है, त्याने काही न ऐकल्यासारख केलं आणि अजूनच वेगाने रिक्षा धावायला लागली. तिने थोडा आरडा-ओरडा सुरु केला कि बाहेर कुणी असेल तर मदतीला घावेल, पण रस्त्यावर कुणीच दिसत नव्हतं, तिनं शेवटी आपली पर्स घेतली आणि त्याच्या डोक्यावर मारली, रिक्षा चालक थांबला, ती बाहेर पडणार ह्याचक्षणी दोन आणखी माणसं तिथ आली आणि तिला पकडली, तो स्पर्श खुपच भीती दायक होता आणि तिला खात्री पटली होती कि ती संकटात सापडली होती, तरी ती ओरडायचा प्रयत्न करू लागली, पण तीच तोंड हि बंद करण्यात आलं.... रस्याच्या बाजुला एका झाडाखाली तिला उचलूनच नेण्यात आलं आणि नंतर ते तीन राक्षस आणि त्यांचा राक्षसी स्पर्श...ते इतकं त्रासदायक आणि भयानक होतं कि ती बेशुद्धच पडली.
तिनं डोळे उघडले ते हॉस्पिटलातच, आणि शुद्धीवर येताच ती परत ओरडायला आणि रडायला लागली. तिच्या डोळ्यासमोर सारखं ते तीन दानव येत होते. काही दिवस हॉस्पिटलात राहून तिच्या शरीराचे घाव तर भरले होते पण मनाचे घाव तसेच होते. तिनं कॉलेज पण सोडून दिलं आणि स्वत:ला घरातच कोंडून घेतलं होतं.
तिचे आई-वडील खुपच चिंतीत होते कि आता आपल्या मुलीला पुन: नॉर्मल कसं करायचं. तिच्या डॉक्टरांनी तिला कौन्सेल्लिंग ला घेऊन जायचा सल्ला दिला. एका नामवंत Psychologist कडे ते मेघाला घेऊन गेले. त्यांच्या क्लिनिक मध्ये जाताच तिनं पाहिलं कि डॉक्टर आणि त्यांच्या हाताखाली इंटर्नशिप करणारा एक तरुण मुलगा होता, त्यांच्या बरोबर एकट counselling करायला ती तैयारच नाही झाली आणि परत ती थरथरून ओरडायला लागली. तो तरूण इंटर्न [ सुभाष] लगेच उठला आणि पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला, तिनं आपल्या आई-वडिलांकडे बघितलं आणि घटा घटा पाणी पीत सुटली.
त्या डॉक्टरांनी मेघाच्या आई-वडिलांना सांगितलं कि मेघाला खुपच मोठा मानसिक धक्का बसला आहे, त्यामुळे सध्या मी माझ्या ह्या विद्यार्थीला मेघाची case study करायला त्तुमच्या कडे रोज पाठवतो, एकदा तीची भीती थोडी कमी झाली कि मग आम्हाला तिचा उपचार सोईस्कर होईल.
तर आता दर रोज संध्याकाळी सुभाष मेघा कडे तिची case study करायला जाऊ लागला. सुरवातीला ती हॉल मध्ये सुद्धा यायला नाही म्हणायची पण सुभाष नी पण चिकाटी सोडली नही, हळू हळू ती आता त्याच्याशी थोडासा संवाद साधू लागली.
आता ह्या प्रसंगाला सहा महिने झाले होते, मेघाने अजून कॉलेज ला जायला नकार दिला होता, पण आता ती मात्र सुभाष च्या बाबतीत पुष्कळ आश्वस्त होती, त्याच्याशी गप्पाहि मारायची, सुभाष ला तर ती आवडायलाच लागली होती....
आणखी काही महिने उलटले आणि सुभाष ने तिला शिक्षण पूर्ण करायला उत्साहित केलं आणि तिनं पुन: कॉलेज जॉईन केलं.
आज मेघाला B.Sc. ची पदवी मिळाली होती, सगळे, मुख्यत: सुभाष आणि त्याचे “सर” ह्यांना जणू त्यांच्या कामाचं “ work satisfaction” मिळालं होतं.
सुभाष गुलाबाच्याफुलांचा गुच्छ आणि शुभेच्छापत्र घेऊन मेघा कडे आला, त्यात त्यांने चक्क, “मला तू आवडतेस आणि माझी जीवन संगिनी होशील का?” असं लिहिलं होतं! हे वाचून मात्र ति शहारली....सुभाष ने लगेच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्या स्पर्शाचा मात्र तिला खूप आधार वाटला आणि तिला जाणीव झाली कि सुभाष आता तिचा घट्ट-मित्र झाला आहे.
मेघाच्या आई-वडिलांना तर साक्षात ब्राम्ह्देवच आपला जावई म्हणून अवतरला असं वाटलं. पुढच्या महिन्या भरात मेघा आणि सुभाषच लग्न झालं सुद्धा!
मधुचंद्रासाठी ते नैनिताल ला गेले होते. रात्री हॉटेल च्या खिडकीतुन मेघा बाहेर बघत होती काळी-कुळकुळीत रात्र आणि अंधार बघुन तिला परत जुन्या आठवणी येऊ लागल्या, तितक्यात सुभाष तिच्या जवळ आला आणि तिला मागूनच हळूवार पणे मिठी मारली....तिला आता मात्र धड धडायला लागलं आणि कपाळावर घाम फुटला. सुभाष मग तिच्याशी लग्नात आलेले पाहुणे, त्यांच्या घराबद्दल बोलत होता, नैनिताल ला आपण कुठे कुठे फिरायचं असं हि सांगत होता, गप्पा इतक्या रंगल्या कि तिने कधी डोळे मिटले तिला कळलच नाही.
सकाळी तिला जाग आली तेव्हा तिनं शेजारीच झोपलेल्या सुभाष कडे बघितलं, शांत झोपलेला असुनसुद्धा चेहऱ्यावर एक तेज, दोन वर्षांपूर्वी तिच्या बरोबर जे काही घडलं त्यावरून “पुरुष” जाती बद्दल तिला घृणाच वाटू लागली होती पण आता सुभाषच्या रुपात तिला पुरूषाच एक वेगळंच रूप बघायला मिळत होतं....आणि ते खुपच सुंदर होत. मेघाने हळूच त्याच्या खांद्याच्यावर डोकं ठेवलं, सुभाषलाही जाग आली आणि ते दोघेही एकमेकांच्या मिठीत वीरगळत गेले हा स्पर्श मात्र मेघाला खुपच हवा-हवासा वाटत होता.
ऐश्वर्या कोकाटे
संपादिका
www.marathicultureandfestivals.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

CHHAN