Submitted by कौतुक शिरोडकर on 23 March, 2009 - 04:50
येणार असशील तर ये एकदाच..
आभाळ फाडून.
कोरड्या भेगाळ जमिनीसाठी नव्हे तर
तहानलेल्या उपाश्यांसाठी ..
बाप फाशी गेल्यापासून वाटच पहाताहेत ते.
म्हणून म्हणतो,
कोसळवत ये...
भागून जाईल तहान एकदाची जगण्याची आणि
वाहून जाईल अस्तित्व
मरणाचं पोट टम्म फुगेल
म्हणजे पुन्हा तहानेचा प्रश्नच उरणार नाही
गुलमोहर:
शेअर करा
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
"वार्याचाच श्वास थांबविला की हो !
सुंदर !!!
तहान भागली एकदाची !"
बापरे
बापरे कौतुकजी. कसं काय लिहू शकता हो तुम्ही असं? शब्दांतूनपण अश्रू पाझरताहेत बघा. काय शब्दवैभव! टम्म या एकाच शब्दाने चित्रच उभे केलेत संपूर्ण आशयाचे. कवी दशसहस्त्रेषु!
(खूप
(खूप रडणारी बाहुली)
(No subject)
मरणाचं पोट
मरणाचं पोट टम्म फुगेल
म्हणजे पुन्हा तहानेचा प्रश्नच उरणार नाही
सुंदर.
--------- रुसुन
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !
खरतर
खरतर प्रतिक्रियेला शब्दच नाहित.
तरीही अतिशय सुंदर
************
मन हेलावुन
मन हेलावुन टाकलं...
निशब्द
निशब्द
कोसळते -
कोसळते - कोसळत हवंय का इथे?
चांगली आहे कविता.
~~~~~~~~~
मरणाचं पोट
मरणाचं पोट टम्म फुगेल
सर्व कवितेला ह्या ओळीने खाऊनच टाकलेय.
सुंदर.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
कौतुक, फारच
कौतुक,
फारच छान, >कोसळते ये> ऐवजी कोसळत ये हवंय बहुतेक.
जे.डी. भुसारे.
फार छान!
फार छान! खरच "कौतुकास्पद" आहे
ओहो! एकही
ओहो! एकही शब्दं उणा-दुणा नाही... घडीव.
कवितेतल्या भावाचं म्हणशील तर... खूप खोलवर... अगदी आरपार आहे, कौतुक.
मरणाचं
मरणाचं पोट.......बेफाम कल्पना..सुंदर कविता ...खुप आवडली.
*****************
सुमेधा पुनकर
*****************
मला
मला अपेक्षित बदल केला आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
प्रतिसादांबद्दल आभार.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
तु लिहीत
तु लिहीत राहा मित्रा !!
आमच्या ओंजळी आसुसल्या आहेत झेलायला !!
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही
)
(No subject)
शेवटल्या
शेवटल्या दोन ओळी अप्रतिम... व्यथित करणार्या...
विष्णु.... एक जास्वंद!
*******************************************
माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...
पुनश्च
पुनश्च आभार प्रदर्शन.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
वाह रे...
वाह रे... खनन चालू आहे बघु अजुन काय काय सापडत ते..
हम्म...... तिळतिळ
हम्म......
तिळतिळ मरणापेक्षा
एकदाचा सोक्षमोक्ष लागलेला बरा.
आरपार भेदून गेलीयं कविता.
सुरेख...
सुरेख...