ये रे ये रे पावसा

Submitted by अनन्त्_यात्री on 1 June, 2018 - 12:31

मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत
तुझ्या वर्षावात चिंब व्हायला

अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्‍यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी
शब्दात कोंबायला

बकाल महानगरातली पाताळधुंडी माणूसगिळी मॅनहोलं कचरतायत
तुझ्या ढगफुटीत तुंबायला.

यंदा तरी भरभरून येशील?

बघ, तुझ्या आशेवर तर पार भेगाळलेला शेतकरी तयार आहे पुढच्या दुष्काळापर्यंत
आत्महत्या लांबवायला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बघ, तुझ्या आशेवर तर पार भेगाळलेला शेतकरी तयार आहे पुढच्या दुष्काळापर्यंत
आत्महत्या लांबवायला.

अप्रतिम

फक्त मॅनहोलच कचरणे खटकले . मॅनहोल कधीच तुंबायला कचरत नसावे असे माझे मत ....