आजही माझी कथा ही प्रत्येकाच्या आयुष्यात होणारे छोट्या छोट्या प्रसंगांपासून प्रेरित आहे आणि मित्रांनो ही सत्यकथा आहे बरे का...आजकाल किती तरी छोट्याशा मोठ्याश्या गोष्टी होतात ज्यांना आपण दुर्लक्षित करतो तशीच ही एक छोटी गोष्ट पण मोठी शिकवण आजकाल त्या दोघांची खूप वादावादी व्हायला लागलेली कदाचीत ती वेळ देऊ शकत नव्हती म्हणुण असेल अथवा तो छोट्याछोट्या गोष्टींवर जास्त लक्ष देतोय म्हणून असेल पण वाद तर होतच होते आणि दोघंही वेळ नव्हता मिळत आपापल्या very busy schedule मधून ....शेवटी जे व्हायचं ते झालं वाद खूप वाढली आणि विकोपाला गेले दोघांचं एकमेकांशी तात्पुरता संवाद च थाम्बला कि राव....मग काय दोघांची स्थिती इकडे आठवण आणि तिकडे ego अशी झाली आणि मज्जा म्हणजे दोघही दिवसभर फक्तं एकमेकांचा विचार करायचे 'तिला वाटायचं तो जेवला कि नाही ...त्यांच्या tiffin मधे काय असेल ..भाजी तर आवडीची असेल ना ?' आणि त्याला वाटायचं हिला अगदी कुम्भकर्णा चा आशीर्वाद मिळालाय ..वेळेवर उठली असेल ना ..धावपळ नसेल ना झाली ? तिचा जिवश्च कंठश्च असणारा आल्याचा चहा करायला तर वेळ मिळाला असेल ना ? नाहीतर दिवसभर डोकं धरून बसेल ...एक ना अनेक काळज्या पण बोलणार कसा ...असेच चांगले दोन दिवस फक्तं whatsapp -whatsapp खेळण्यात गेले ...i woke up... reached office..lunch done..i left...reched home..dinner done..gn...फ़क़्त एवढा काळजी वजा पण अगदी informative असाच संवाद व्हायचा शेवटी तिने एकदाच बोलून काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवला आपलाच माणूस काय आगाउपणा दाखवायचा त्याला म्हणुन कॉल केला आणि धडाधडा बोलून टाकलं तीच झाल्यावर त्यांनी पण पटापट बोलून टाकलं आणि मग स्मशान शांतता आणि तिचा हुंदक्याचा आवाज आणि चल bye अँड take care म्हणुण खाट्कन call cut करण्याची क्रुती इतकी पटकन झाली कि त्याला कळालंच नाही...पण त्याचे धाबे दणाणले कि अता आपलं खरं नाही आपन खूप उलट सुलट बोललोय ...पण फोन करायची हिम्मत होईना शेवटी कसातरी एक massage टाकला कि sorry...तिकडून reply आला ...need to talk to you ...see you tomorrow for while good night and take care आणि इथे love you मिस्सिंग होता ...कसातरी बळजबरीने तो झोपला आणि सकाळी उठून मोबाइल बघतो तर ना कॉल ना massage ..तयार झाला आणि ब्रेकफास्ट करून निघाला ते थेट तिला भेटायलाच हे ठरवून कि आता अजुन वाद नको पण जाताना तिच्या आवडीचा cupcake न्यायला विसरला नाही हो ...ती समोर येताच परत नव्याने त्याला जाणवल कि आपली choice खरंच किती top आहे आणि स्वतःवरच खूष होऊन तिला मिठी मारली खरी पण मनात माहिती होत कि हीच्या आतली दुर्गा थंड झाली नसेल तर माझ्यातला पुरुषाला रडावे लागणार ...पन अहो आश्चर्यम ..तिने माझ्या आवडीचा traditional tea आणि स्वतःच्या आवडीचा ginger tea अगदी रोजच्याप्रमाणे अथवा जास्तच प्रेमाने मागवला ...आणि माझ्या समोर एक छान पेपर बॅग् ठेवली आणि म्हणाली बघ उघडून ...उघडून बघितलं तर काय कमाल तिने माझ्यासाठी एक scrapbook बनवलं होत आणि त्यात छोटी छोटी लिफाफे ज्याच्या आत छोटी छोटी लेटर्स ...त्यामधे तिने जीव लाऊन छान quotes तिला मला द्यावयाची संदेश आणि स्वतःच्या कविता लिहीलेल्या ...माझे तर अगदी डोळे भरून आलेत आणि तिच्या कडे बघितले तर ती नेहमीसारखीच लहान बाळा सारखा प्रश्नार्थक चेहरा ..बाहुलीचे चपटे नाक ...काजळ घातलेल मोठाले रेखीव नषिले डोळे...माझ्या आणि माझ्याच आवडीचा lipstick चा shade..एकदम streight केस...नेहमीचेच cupcake सारखे गाल फुगवून बघत होतीं...आणि आता तिचे माझे शब्द मनाला ना लावून घेण्यासाठी आभार मानावे कि ती माझीच आहे याचा आनंद वाटून गालगुच्चा घ्यावा कि इतकी कशी ही समजदार असू शकत असं वाटून मिठी मारावी हेच कळेना ...तेवढ्यात चहा आला आणि तिने cheers and very happy new year to you dear म्हनून ..माझ्यासारख्या वेड्याला नव वर्षांची आणि नात्यातल्या एक नव्या पैलूंची व तिच्यातल्या एक नव्या स्वभावाची जाणीव करून दिली...माझ्यासाठी हे गिफ्ट अगदी अनपेक्षित होत कुठे गेला होता काल पर्यंत चा वाद ते ही कळेना ...फक्त तिचे शब्द कानात गुंजत होते ..आपल्याच माणसाच्या बोलण्याचं वाईट वाटत हे खरं पण त्यामुळे कुणी सोडून जात का नाही ना ? उलट प्रयत्न करतो नातं अजुन घट्ट करण्याचा...तोच मी केलाय रे ...!!!
स्क्रँपबुक
Submitted by ऋणी on 26 May, 2018 - 04:52
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे..
छान आहे..