सिटी शी दोस्ती

Submitted by Swapnilkulkarni on 21 May, 2018 - 06:46

^सिटीशी दोस्ती^^^
मित्राच्या जगातील मैत्री नावाचे एक अख्खे वर्तुळ आपल्या जीवनात गोल गोल फिरत असते।बहुदा ते पूर्ण झालेले असते किंवा पूर्णत्वाचा मार्गात असते।
दुनियादारी मन से आणि दोस्ती दिल से हा मंत्र मैत्री चा आहे।
वास्तवात आपण ज्या शहरात राहतो त्या शहराशी आपले अतूट नाते मैत्री च्या रूपात नांदत जाते
स्थलांतर च्या प्रकियेत करीयर ,व्यवसाय, नोकरी,विध्यार्थी, सरकारी अधिकारी,कर्मचारी अगदी लग्न झालेली नववधू ,नवजात बालक अशी विविध कारणांनी
एक जागेतून दुसऱ्या जागी सेटल होणारी मंडळी नव्या जागेत आपल्या अस्तीत्वा शोध घेत जीवन जगतात।या नवीन जागेत पर्यायाने शहरात आपली नवीन स्वओळख त्यांना मिळते च शिवाय ते शहर देखील आपली ओळख पक्की करून देते। अशा ओळखीचं रूपांतर मैत्री होते।
व आपण देखिल ओळख आनंदाने साँगतो 'कर 'या शब्दाने ,सांगायचे झाल्यास उदा. नाशिककर, पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर इ।
कोणी ना कोणी काही ना कारणास्तव आपल्या जन्मभूमीतून बा हेर पडत असतो।आणि नव्या कर्म भूमीत आपले बस्तान बसवतो ,खर तर नवीन जागा नवीन शहर आपलेसे करत असतो आणि नकळत आपण सुद्धा त्याचे होत असतो। लगाव तो बनाता है
ऊस जगा से ,जहा पै अपनी दुनिया की सुरुवात होती है।
वेगळ्या वेगळ्या शहरा ची जीवन जगण्याची शैली पूर्णता भिन्न असते एकमेकांपासून।तरी या शैली आपण स्वीकारतो ,हवामान, भाषेचा बदल,पाणी खाण्यापिण्याच्या पद्धती चविसह ,नागरिकांची वागण्याची अदा वैगरे वैगरे यांना आपण हळूहळू जवळ करत शहराची नाळ आपल्याशी जोडत असतो।
सिटी ची दोस्ती अशी फुलत जाते आणि आपण शहराच्या प्रेमात पडत जातो।सेटल सिटी सेटल लाइफ
सेंटल दोस्ती। सबकुछ सेटल,सिटी से सिटी तक।
निसर्ग भर भरून देत असतो वारा पाऊस उन्हं फळ फुले, दऱ्या ,खोऱ्या नदी नाले यादी मोठी आहे !याला अपवाद असतो दुष्काळाचा तो मानव निर्मित निष्काळजी पनाचा ।
अशा निसर्गाप्रमाणे सिटी नव्या पाहुण्याला इतकं भरभरून देत असतो ना ,पाहुण्याला तो काही कालावधी मध्येच यजमान बनवून देते।खरच कमाल आहे ना!!! अनोळ खिला आपलं स करून त्याला हक्काची ,कामाची जागा दिल से देऊन जातो ।मैत्री निर्व्याज असावी असे मानले जाते सिटी(शहर) तर तशी च वागते नाही मुद्दल ना
ना व्याज "आपले शहरात स्वागत आहे" हाच बाणा आपल्या मैत्री ती सांगत असते।
अमर्याद वाढणारी स्थलांतर ,शहराच जागतिकी करणं यामुळे ताण खूप च वाढत आहे तरी आपल्या शहराच
आपल्या मैत्रीशी खंड न पडला आहे ना बंध तुटला आहे।
कर्मभूमीतून सेटल होणारी सिटी ची दुनियादारी आपल्या व्यक्तीं -वल्ली सोबत दिलखुलास मैत्री ची नाते निभवत असते।
गरज असते ती अशा नात्याला समजन्याची ,न बोलता
भावणातून व्यक्त होणाऱ्या शब्दाची, कारण प्रत्येक सिटी ची मैत्रीबद्दल एकमेव व्याख्या असते।
जी आपणास आपल्या कुटुंबास आपल्या भोगौंलीक परिघात आपल्या मैत्री च्या रोपट्याला सँवर्धित करते।
आपण कळत नकळंत याच जाणिवांपाशी पोहचत असतो फ़रक इतकाच असतो कोणी व्यक्त होत असतो तर कोणी व्यक्त होत नसतो।
सिटी ची मैत्री निर्व्याज आहेच याला दाद देताना ,,स्वच्छतामित्र ,वृक्षमित्र
छोट्यासा भूमीकेत आग्रही असायला हवे जेणेकरून
सिटी च्या सौंदर्यात भर पडेल,,,व भरभरून देणाऱ्या सिटी ला आपण फुल न फुलाची पाकळी #रीटर्न गिफ्ट # स्वरूपात देऊ शकतो याला परत फेड म्हणता येईल मैत्री च्या नात्यातील।
तर आपली हि जबाबदारी आहे की आपल्या सिटी असलेल नाते असेच वृद्धीगत करत जावे आणि आपल्या सिटीतील आठवणींचा गुलमोहोर चा मोहर ब रसत रहावा।
माझी सिटी नासिक आहे व माझी मैत्री तिच्या सोबत अघात आहचे.मै नासिक का आशिक
आणि खरं सांगू का मला तिच्या सोबत मालेगाव इतकाच लगाव आहे
तर तुमची स्थायिक सिटी कोणती हीं असलेली तरी ती तुमच्या सोबत मैत्री साठी आतुर असते ।फक्त तुम्ही हात पुढे करा ती तुम्हाला नक्कीच सेटल करते।।।।
"हर सिटी कुछ कह ती
और ऑल टाइम दोस्ती
के लिये तयार रहती है।"
@स्वप्नील.सु.कुलकर्णी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान विषय
अन् सुंदर रित्या मांडला आहे Happy