लता स्वरपु ष्प ४: मौसम है आशिकाना

Submitted by अमा on 19 May, 2018 - 09:50

हे चौथे पुष्प लिहिताना महजबीन बानो अर्थात मीना कुमारी ह्यांची आठवण येते. दु:खांची राणी म्हणून गौरविलेली गेलेली ही गोड चेहर्‍याची व कवीमनाची प्रतिभावान अभिनेत्री फक्त वयाच्या अडतिसाव्या वर्शी वारली. नुकतीच तिची पुण्य तिथी झाली. जीवनकथा नेहमीसारखीच. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवायला ही सिनेमात कामे करू लागली. बैजू बावराच्याही आधी ऐन सोळाव्या वर्शी तिने अलाउद्दीन मध्ये एका गोड व हसर्‍या राज कन्येचीही भूमिका केली आहे. हा सिनेमा मी दूरदर्शन वर बघितला आहे. साधे ग्राफिक्स पण मजेशीर. व मीना एकदम नाजूक. क्युटी पाय.

पण जस जसे कामात स्थैर्य आले तसतसे भूमिकाही दु:खी मिळत गेल्या, वैयक्तिक जीवनात कमाल अमरोही सारख्या दिग्दर्शकाबरो बर एक्स्ट्रीम लव्ह हेट रिलेशन शिप मध्ये अडकली. संवेदनशील मनाची असल्याने सुकून मिळ वायला मद्याचा व ऊर्दू शायरीचा आधार घेतला. अनेक भावना कवितारूपात बद्ध करून डायरीत उतरवल्या. अश्या रिलेशनशिप मध्ये अडकले की व्यक्तीचा स्वतंत्र जगण्याचा आत्मविश्वास हळू हळू संपत जातो व नष्टच होतो. प्रेमिका शिवाय आपल्याला पर्याय नाही व त्याच्याबरोबर तर जमत नाहीये. मध्ये स्पेसेस उरतच आहेत अश्यावेळी त्या स्पेसेस भरायला कसकसले आधार घेतले जातात. खुदही को बुलंद कर इतना हा पर्याय हरवून जातो. त्यात अश्या कमकुवत अवस्थेचा फायदा करुन घेणारे नातेवाइक असले की मग एकच सुटकेचा मार्ग दिसतो जो तिने अंगिकारला...

फेब्रुवारी १९७२ मध्ये पाकीजा रिलीज झाली, पुण्यात नव्याने झालेल्या नटराज सिनेमातला हा पहिला सिनेमा. मी आई व मावशींबरोबर हात धरून गेले होते पण काहीही समजले नाही. ३१ मार्चला मीना वारली तेव्हा काळ्या बुरख्यातले तिचे चित्र सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर होते. ते आत्ताच्या भाषेत एपिक शॉट. बघताना मौसम है आशिकाना गाण्यातले निसर्ग चित्रण फारच मनोहारी वाटले होते ते ऑरेंज स्काय, पक्षी, आपली घरासमोरची मुठा नदी पहाटे पहाटे थोडीशी अशीच दिसते असे ही वाटले होते बालमनास...गाण्याचे शब्द असे आहेतः

मौसम है आशिकाना,
ऐ दिल कहींसे उनको ऐसेमें ढुंड लाना.

कहना के रुत जवां है और हम तरस रहे है
काली घटाके साये बिरहन को डस रहे है.
डर है न मार डाले सावन का क्या ठिकाना

सूरज कहीं भी जाये. तुमपर न धूप आये
तुमको पुकारते है इन गेसुओं के साये
आ जाओ मैं बनाउं पलकों का शामियाना

फिरते हैं हम अकेले बाहों में कोई ले. ले.

आखिर कोई कहांतक तनहाइयोंसे खेले.
दिन हो गये है जालिम राते हैं कातिलाना

ये रात ये खामोशी ये ख्वाब से नजारे
जुगनू है या जमीं पर उतरे हुए हैंतारे
बेखाब है मेरी आंखे मदहोश है जमाना.

सिचुएशन अशी आहे की नायक आपल्याच प्रेमात आहे. आग उधर भी बराबर लगी हुई हैहे नायिकेला कळते. ती स्वतः कोठ्याच्या कचाट्यातून उठून थोडे से स्वातंत्र्य उपभोगते आहे. फार काळापासून आपण ज्याचा शोध घेत होतो तो हाच हा एक भावनिक गारवा ती अनुभवते आहे.

द मेकिंग ऑफ पाकीजा व त्यातील गुलाम महंमद ह्यांचे संगीत हे दोन्ही स्वतंत्र लेखांचे विषय आहेत. वो किस्सा फिर कभी. दिग्दर्शकाने अजोड निसर्ग व फ्रेशनेस आणून बॉयफ्रेंड च्या कपड्यात अनोखे स्वातंत्र्य उपभोगणारी नाजूक व सुरेख अदाकारा आणून आपले काम केले आहे. ती स्वच्छंद निसर्गात बागडताना प्रियकराला लवकर यना असे साकडे घालते त्यासाठी लताचा स्वर्गीय गोड आवाज आहे. व संगीत काराने अनेक वाद्ये त्यात सुरुवातीलाच वेगळे असे फ्लूट वापरले आहे. व ताल वाद्ये अगदी सॉफ्ट आहेत. कधी कधी तर नुसते घुंगरुचे गुच्छच वापरले आहेत. अत्तरशास्त्रात कसे व्हॅनिला, चॉकोलेट मिल्की सॉफ्ट असे सुगंध एकत्र मेळ करून सुखद भावना जनरेट करतात तसे संगीतकाराने सुखी आनंदी सूर वापरले आहेत. नुकत्याच जन्मलेल्या ( अल्पायुषी ) प्रेमाचा ताजा करारा अंदाज लताजी आपल्या बेहतरीन आवाजात व्यक्त करतात.

किती सुरेख वातावरण उभे केले आहे. लताच्या आवाजत जी एक प्रकारची प्युरिटी आहे ती इथे चपखल बसते. पूर्ण गाण्याला बेस फीलिंग्ज, शारिरिकतेचा स्पर्शही नाही. उदा तू मुंगळा मुंग्ळा हे उषा च्या आवाजातले गाणे ऐका. हॉर्नी व डिलिशसली चीप साउंड आहे. ते गाणे ही आपल्याजागी आय कॉनिकच आहे. पण हे एका वेगळ्या लेव्हलवर आहे.

इथे फक्त प्रेम व प्रेमच गुलिस्तां भरून टाकते आहे. नायिका सुर्यालाच दटावते. मी माझ्या केशपाशात प्रियकराला उन्हापासून सुरक्ष्हित ठेवेन नाहीतर नयनांतच त्याचे घर बनवेन, मध्ये मग एक फ्लूटचा आलाप आहे. एकटे रहायला ती गांजली आहे आता मनाला सहजीवनाची, कंपॅनिअनची आस लागून राहिली आहे.

ह्या नंतर एक आलाप आहे तो जीव कुरवाळून टाकण्याजोगा आहे. एका ओळीतुन दुसृया ओळी कडे नेताना लता ज्या सफाईने मधला अवकाश जोडते ती कारीगरी ऑसम आहे. सलाम कुबुल करीये.

माझ्या डोळ्यातली स्वप्ने पण त्याने चोरली आहेत आणि ह्या मादक आशिकाना मौसम मध्ये मला आता त्याच्या मिठीतच खरा सुकून लाभेल..... हाय अल्ला उनको जल्दी भेज्दो. एक अतिशय हळूवार गाणे. हा नायक नेमका हिला सोडून कुठे गेलाय असे वाटून मीच हळहळले. असे एकांताचेक्षण किती कमी येतात. असे लाँगिन्ग पण कधीतरीच भावते. नाहीतर
रुक्ष नात्यातले व्यवहार.

एकट्या स्त्रीच्या आयुष्यात अनेक मोहाचे, कमकुवत पडण्याचे क्षण येतात. महजबीन बानुसारखी कोणी जीवनाचे जहर पिउन लवकरच हार मानून दुनियेला अलविदा म्हणते तर लताजींसारखी कोणी
आपल्या गोड आवाजामागे एक कणखर व्यक्तिमत्व खडे करून जीवनाने दिलेले पत्ते नीट खेळून लढा जिंकते. आपल्याबरोबर इतर लाखोंना जीवनात सध्या लुप्त होत चाललेले निवांत आरामाचे, गुलाबी प्रियाराधनाचे क्षण अनुभवण्याची छोटीशी संधी उपलब्ध करून देते. तुमच्या आवाजाने प्रकाशित केलेल्या जीवनाच्या खडतर अंधार्‍या वाटेवर आम्ही चालतोय दीदी. मोह पडतो तो फक्त हे गाणे परत परत ऐकायचा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, जबरदस्त वर्णन! खूप सुंदर लिहीले आहे.

हे ऑल टाइम फेवरिट गाणे आहे माझे. लताच्या यातील आवाजाचे तुमचे वर्णन चपखल तर आहेच, पण संगीताबद्दलही टोटली सहमत. काहीतरी एक वेगळीच जादू आहे यात. "कहना के रूत जवाँ है..." म्हणताना त्या दृष्यातील हवा/वारा ते गाणे व संगीत जणू आपल्यापर्यंत पोहोचवतात असे वाटते. हे असेच फीलिंग आशाच्या किसके आने की खबर ले के हवाए आयी ला येते.

सुंदर गाण्याचे सुंदर वर्णन. हे एक अवीट गोडीचे चिरस्मरणीय गीत आहे. अप्रतिम संगीत, सुंदर पिक्चराइझेशन, अजोड - मोहक मीनाकुमारी, लताचा स्वर्गीय आवाज, पेस्टल कलर मधली निसर्गातली फोटोग्राफी, गाण्याचे सिनेमातले आलेले पर्फेक्ट टाइमिंग......सगळेच बेस्ट

ये रात ये खामोशी , ये ख्वाबसे नजारे ही ओळ सुरू होताना एकदम्च चाल बदलून जाते ते एक्दम लाजवाब . मी तर हे गाणे ऐकताना हा टप्पा कधी येतो त्याची वाटच पहात असतो. पाकीजाचे सगळी गाणी उदासीने झाकोळलेली आहेत. अपवाद या गाण्याचा ! एखादे मोठे कारंजे एक्दम सुरू व्हावे आण त्याचे तुषार एक्दम अण्गावर यावेत अन सुखद अनुभूती यावी तसे हे गाणे. (दुसरे म्हनजे ' कांटोंसे खींच्के ये आंचल.....)

छान लिहिलंयत अमा. मी नुकतीच पाकी़जा़ची जादू अनुभवली.
नर्तकीचा व्यवसाय करणार्‍या स्त्रीला कोणीतरी 'पाँव ज़मीनपर मत रखियेगा, मैले हो जायेंगे' असा निरोप सोडून जाणं, आणि मग तो बिनचेहर्‍याचा निरोपच तिचं ख़्वाब होऊन बसणं यातला विरोधाभास टचिंग आहे!

या गाण्यात शेवटी ती 'बेख़्वाब मेरी आँखें' म्हणते आहे - तो भेटला आहे, आता स्वप्नं पहायची आवश्यकता
उरलेली नाही. ख़्वाब-से नजा़रे प्रत्यक्षात आलेले पहायला डोळ्यांना मोकळीक मिळाली आहे!! लता गाण्यातून तो स्वर्ग उभा करते डोळ्यांसमोर!! हॅट्स ऑफ टु बोथ लता अ‍ॅन्ड मीना कुमारी!

छोटंसं करेक्शन सुचवू का?
>> सुकून मिळ वायला मद्याचा व ऊर्दू मौसीकीचा आधार घेतला
तुम्हाला बहुधा 'उर्दू शायरीचा आधार घेतला' असं म्हणायचं आहे. मौसीकी़ म्हणजे संगीत.

तुम्हाला बहुधा 'उर्दू शायरीचा आधार घेतला' असं म्हणायचं >> बरोबर. केला बदल. तुमच्या टीपापा वरच्या त्या दिवशी गप्पा वाचल्या म्हनूनच हे बारके बारके लेख लिहीले होते ते उचलून इथे आणले. मीना च्या पुण्यतिथी दिवशी लिहीले होते.
तुमच्या व फारेंड च्या पोस्टी छान होत्या . प्रतिसा दा बद्दल हार्दिक धन्यवाद.

हो काही दिवसांपूर्वी गप्पा झाल्या होत्या हे लक्षात आहे पण स्पेसिफिक पोस्ट्स आठवत नाहीत.

नर्तकीचा व्यवसाय करणार्‍या स्त्रीला कोणीतरी 'पाँव ज़मीनपर मत रखियेगा, मैले हो जायेंगे' असा निरोप सोडून जाणं >>> ते वाक्य लोकप्रिय आहेच पण नर्तकीचा संदर्भ लक्षात नव्हता. तो विरोधाभास लक्षात आला नाही आधी. गुड कॅच.

मात्र त्या गाण्याच्या सुरूवातीला राजकुमारचे बॅकग्राउण्डचे डॉयलॉग्ज अगदीच सरधोपटपणे म्हंटलेले आहेत. त्यात "मै और मेरी तनहाई..." किंवा मै पल दो पल का शायरच्या आधीची "कल नयी कोंपले(?) फूटेंगी, कल नये फूल मुस्कुरायेंगे..." ची जादू नाही Happy

>>> मात्र त्या गाण्याच्या सुरूवातीला राजकुमारचे बॅकग्राउण्डचे डॉयलॉग्ज अगदीच सरधोपटपणे म्हंटलेले आहेत.
तेव्हाच नाही, एकूणच त्याची डायलॉग डिलीव्हरी धन्यच आहे! पुस्तकात पीस सापडल्यावर खूश झालेल्या मीना कुमारीला 'अ‍ॅन्ड देन ही स्पोक' असं वाटलं असणार नक्की. (म्हणूनच ती तिथून पळून जाते की काय! Proud )

पुस्तकात पीस सापडल्यावर खूश झालेल्या मीना कुमारीला 'अ‍ॅन्ड देन ही स्पोक' असं वाटलं असणार नक्की. (म्हणूनच ती तिथून पळून जाते की काय! Proud ) >>> Lol

अवांतर ,पाकीजात सर्वोत्तम डायलॉग डिलिव्हरी असेल तर वीणाचीच... तिचा ' शहाबुद्दीन ....' हा संवाद तर काटाच आणतो

अत्तरशास्त्रात कसे व्हॅनिला, चॉकोलेट मिल्की सॉफ्ट असे सुगंध एकत्र मेळ करून सुखद भावना जनरेट करतात तसे संगीतकाराने सुखी आनंदी सूर वापरले आहेत >>> हे आधी निसटले होते वाचताना. हे मस्त आहे. याचा लिटरली गंधही नाही. त्यामुळे नवीनच माहिती.

द मेकिंग ऑफ पाकीजा व त्यातील गुलाम महंमद ह्यांचे संगीत हे दोन्ही स्वतंत्र लेखांचे विषय आहेत. वो किस्सा फिर कभी. >> जरूर लिहा. आवडेल. गुलाम मोहम्मद चे संगीत आवडते म्हणण्याइतकी त्याची गाणी ऐकलेली नाही. तो नौशाद चा साहाय्यक होता म्हणे. 'मिलते ही आँखे दिल हुआ दीवाना किसीका...' हे गाणे मी इतके दिवस त्याचेच समजत होतो. एकूण सिग्नेचर पाहता त्यानेच हे संगीत दिले असण्याची शक्यता आहे. नौशाद च्या डिसिप्लिन्ड संगीतापेक्षा एक वेगळा गोडवा गुलाम मोहम्मद च्या संगीतात आहे (think Dravid and Laxman Happy )

या लेखामुळे हे गाणे २-३ वेळा पुन्हा ऐकले. आता दिवसभर यातले वेगवेगळे म्युझिक पीसेस डोक्यात फिरत असतात. अजून एक जाणवले. 'सूरज कही भी जाये, तुमपर ना धूप आये' ही एक आवडती लाइन आहे त्यातले. त्यावेळेस 'पलकोंका शामियाना' म्हणताना ती खरेच त्या शामियान्यापुढे उभी आहे. आता ते दिग्दर्शकाने "डायरेक्शन" दाखवायला तो शामियाना नंतर सीन मधे घातलाय, की मूळच्या शामियान्याच्या सीनवरून गीतकाराला सहज सुचलेली ती ओळ आहे, माहीत नाही.

बाय द वे यातली अजून ११ गाणी नंतर वेगळी रिलीज केली होती म्हणे. विकीवर आहे.

फा , ती तशी वेगळी गाणी नव्हती . कोठ्यांच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या विविध ठुमर्‍या होत्या. त्या लॉस्ट ठुमरीज फ्रॉम पाकीजा म्हणून उपलब्ध आहेत. https://www.youtube.com/results?search_query=missing+thumaries

राजकुमारीचे नजरियाकी मारी मरी मेरी गुईयां हे गाणे चित्रपटातून लांबी कमी करण्यासाठी वगळले होते पण पाकीजाच्या रेकॉर्ड वर मात्र होते.

ओह हे नव्हतं माहीत - मस्त आहेत त्या!
कौन गली गयो श्याम, मोरा साजन सौतन घर जाये आणि नजरिया की मारी या गूगल म्यूझिकवरच्या अल्बममध्ये आहेत.

माझं मोस्ट फेव्हरिट ठाडे रहियो!!
'इन्ही लोगों ने'मध्ये लता 'डुपट्टा' म्हणते तेही भारी गोड लागतं कानाला.

याबद्दल अजून माहिती वाचताना अजून एक जाणवले. हा सिनेमा १९७२ साली आला. हिंदी चित्रपट संगीत १९६९ सालानंतर पूर्ण बदलले. १९७२ मधे राजेश खन्ना-किशोर कुमार जोरात होते. बरेचसे जुने संगीतकार साइडलाइन झाले होते व आर डी बर्मन, लक्ष्मी-प्यारे आणि कल्याणजी-आनंदजी यांचे राज्य सुरू झाले होते. या काळात ६०च्या दशकात शोभतील अशी गाणी घेउन हा पिक्चर आला. बहुधा आधी रखडल्याने तसे झाले असावे. पण लोकांना ही जुन्या स्टाइलची गाणी एकदम आवडली असतील तेव्हा.

तसेच, चलो दिलदार चलो गाण्यात मीना कुमारीचे समोरून फारसे क्लोज अप्स नाहीत. बहुतांश सीन्स मधे पाठमोरी आहे ती. आम्ही असे ऐकले होते की ती मधेच गेल्याने कोणीतरी डमी वापरून ते गाणे शूट केले. पण टाइमलाइन बघितली तर ती याच्या प्रीमियर ला सुद्धा होती, नंतर एक महिन्याने गेली. मग हे गाणे असे शूट का केले कळत नाही.

अमा -सॉरी जरा भरकटल्या आहेत प्रतिक्रिया. पण त्या गाण्याने व या लेखाने उत्सुकता निर्माण होउन हे सगळे वाचले.

अरे लगे रहो फारएंड अहो मी द क्रिएशन ऑफ पाकीजा व मीना व कमाल अमरोही ची रिलेशनशिप ची कथा असलेले पुस्तक वाचले आहे. त्यात तिची जरा घरगुती पण माहिती होती. शिळी पोळी आवडीने खायची वगैरे. व अत्युच्च पातळी वरून रिलेशन शिप कशी खालावत गेली तिची मानसिकता कशी बदलत गेली ते लिहीले आहे. मराठीतच पुस्तक होते. माझे आव ड्ते गाणे चलते चलते. त्याच्या क्रिएशनची पण एक कथा आहे. कारंजे कसे ऑण क्यू वर खाली होत असे. सर्व दिवे, तिचे ड्रेस वगैरे.

सुंदर लिहिले आहे अमा.
फार आवडते हे गाणे. चलो दिलदार चलो पण आवडते.
या दोन्ही गाण्यांत ऐकताना बघताना एकप्रकारची फॅन्टसी जाणवते. काहीतरी स्वप्नाळू

या दोन्ही गाण्यांत ऐकताना बघताना एकप्रकारची फॅन्टसी जाणवते. काहीतरी स्वप्नाळू>> लव्ह सच अ‍ॅज धिस इज नॉट मेंट टू लास्ट. असे मोनिका ताई म्हणून गेल्यात मॅट्रिक्स २ मध्ये. त्यावर माझा विश्वास आहे.

तसेच, चलो दिलदार चलो गाण्यात मीना कुमारीचे समोरून फारसे क्लोज अप्स नाहीत. बहुतांश सीन्स मधे पाठमोरी आहे ती. आम्ही असे ऐकले होते की ती मधेच गेल्याने कोणीतरी डमी वापरून ते गाणे शूट केले. पण टाइमलाइन बघितली तर ती याच्या प्रीमियर ला सुद्धा होती, नंतर एक महिन्याने गेली. मग हे गाणे असे शूट का केले कळत नाही.
नवीन Submitted by फारएण्ड on 25 May, 2018 - 02:34
@ फारएण्ड
मी ऐकून आहे की मीनाकुमारी आणि कमल अमरोहीचे ( दिग्दर्शक आणि नवरा ) फाटल्यामुळे हा सिनेमा १८ वर्षे रखडला होता. मीनाकुमारीचे वय वाढल्यामुळे पुर्ण सिनेमात खुपसे लाॅग शाॅट्स घेतले आहेत.
@अमा नेहमी प्रमाणे छान रसग्रहण

हे भारीच लिहिलंयत अमा! मेजवानी मिळाली. प्रतिक्रियाही एकसे एक आल्या आहेत.
प्रत्येक शब्दाशी सहमतीनं आपोआप मान डोलली Happy
बाकी मालिका वाचते आता.

अजून दोन रेडी हायती आन सातवं गानं माबोच्या तोडीचं शोधून पक्कं केल्या पन ल्ह्यायला भीती वाटतंय. पर मै रिस्क लेके लिहुंगी.

लव्ह सच अॅज धिस इज नॉट मेंट टू लास्ट. असे मोनिका ताई म्हणून गेल्यात मॅट्रिक्स २ मध्ये. त्यावर माझा विश्वास आहे. >> हा हा Lol

Love such as this is not even meant to exist. Its possible only in fantasies.
असे मीच म्हणते Wink