लता स्वरपुष्प २: फैली हुई है सपनोंकी बाहें.

Submitted by अमा on 19 May, 2018 - 00:30

कधी कधी जगण्याचे ओझे असह्य होते. विचार चक्रे फिरत राहतात, शारीरीक मेहनत, कामामधील टेन्शन, घरातले नाजूक ताण तणाव सर्व साचून येते. सगळे एकाजागी बांधून ठेवण्यात शक्ती, उर्जा खर्च होते आणि अगदी थोडा वेळ का होईना ह्या सर्वांपासून दूर जावं असं वाटू लागतं . ढोर मेहनत करणारा, हातावर पोट असलेला हमाल असू दे कि करोडोंची उलाढाल सुपरवाइज करणारी इन्वेस्ट मेंट बँकर अँड ऑल ऑफ अस इन बिटवीन, सर्वाना ही एक छोटीशी पळ काढायची संधी निसर्गाने दिलेली आहे. पण काही नशीबवानच ती पूर्ण उपभोगू शकतात. शांत रात्री लागणा री झोप.

निद्राराणी कधी मेहरबान होईल म्हणून कावलेला मेंदू वाट बघत चक्रात फिरत राहतो. तेव्हा लतेचे हे गाणे आपल्याला हळू हळू जोजवत शांत करते. चित्रपट आहे हाउस नंबर ४४ साहिर लुधियानवी ह्यांचे शब्द आहेत व एस डी दा ह्यांचे संगीत. अलवार सतारीची सुरुवात व मग शब्द ही तितकेच हलके हलके येतात. इथे ही एक लाडीक ओपनिंग आलाप आहे. प्रत्येक वेळी संगीत आपल्यावर दाण दाण आदळायची गरज नसते. कधी कधी एखादी बारकी तान विषयाला अनुरूप अशी घातल्यास जास्त परिणामकारक होते. एस्डीं सारख्या सिद्धहस्त संगीत कारा कडून हा संयम आपण अनुसरू शकतो.

फैली हुई है सपनों की बाहें आ जा चलदें कहीं दूर
वही मेरी मंजील वोही तेरी राहें आजा चल दें कहीं दूर.

उंधी घटाके साये तले छुप जाए
धुंदली फिजा में कुछ खोये कुच्छ पाये

सांसो की लय पर कोई ऐसी धुन गाये
दे दे जो दिल को दिल की पनाहें

आजा चल दे कहीं दूर.

आता एक देखणी तान आहे.

आपण हे कॄर जग जरासे दूर ठेवून स्वप्नांच्या राज्यातच राहु या.
इंद्रधनुष्याचा झोपाळा करून खेळू, तार्‍यां पर्यंत भरारी घेउ. सारी दु:खे विसरून जाउ थोडा वेळ
मागे वळून पाहुयाच नको. ही स्वप्ने जागे पणी आपण बघतो आहोत का निद्रेत माझ्या लक्षात येत नाही ये, हे प्रियकरा तुझ्याबरोबर राहण्याची स्वप्ने मला जागेपणी पण पडत असतात. तुझ्या बरोबर सारे जीवनच एक मोहनिद्रा होईल. केवळ स्वप्नवत.

झूला धनक का धीरे धीरे हम झूले.
अंबर तो क्या है तारों के भी लब छुले.

मस्ती में झूमे और सभी गम भूले.
देखे न पूछे मुडके निगाहें

आजा चल दे कहीं दूर.

हे सुरांची राणी, तुझ्यामुळे आमचे दु:खी कष्टी जीवन थोडे सुसह्य झाले आहे. कराल सत्यांच्या बरोबरीने जगताना थोडे स्वप्नांचे अस्तर लावुन आम्ही फाटलेले वस्त्र सांधतो.

व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. सर्व लेखांची नावे तुम्हाल सर्च मध्ये टाकता येतिल अशीच दिली आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हे सुरांची राणी, तुझ्यामुळे आमचे दु:खी कष्टी जीवन थोडे सुसह्य झाले आहे. कराल सत्यांच्या बरोबरीने जगताना थोडे स्वप्नांचे अस्तर लावुन आम्ही फाटलेले वस्त्र सांधतो. >>>

आज काही ऐकत नाही अमा!

अमा,
पहिल्याप्रथम या गाण्याबद्दल धन्यवाद! आताच ऐकलं.नाजूक , देखण्या हरकती मन मोहवून टाकतात.

अतिशय आवडतं गाणं आहे माझं. रात्रीचं एकत बसायची मी कित्येकदा.

ह्या गाण्यबरोबर, ते “छुपा लो यु दिल मे “. हे गाणं म्हणजे मूड एकदम मस्त होतो. शोधली पाहिजे ती माझी सीडी....

“छुपा लो यु दिल मे>> माझ्याकडे आहे सीडी तुला हवी तर विपू कर. यू वोंट बिलीव्ह कोइंबतूर एअर्पोर्ट वर टीपी करताना मिळाली. आम्ही एक हेमंत कुमार लता ड्युएट प्लेलिस्ट बनवली होती क्याशीट. त्यात हे फेवरिट गाणे आहे. बरीच मिळालेली त्या सीडीत. कपाटात लॉकर मध्ये संभाळून ठेवली आहे. वेरे लेख रायाली हेमंत लता पाटा गुरिंची.

मस्त सिरीज. लताबाईंचा खजिना खुप मोठ्ठा आहे; त्यातली रत्न वेचुन इथे मांडायला तुम्हाला वेळ, प्रेरणा आणि सगळे रिसोर्सेस मिळोत हि सदिच्छा!!

मस्त सिरीज. लताबाईंचा खजिना खुप मोठ्ठा आहे; त्यातली रत्न वेचुन इथे मांडायला तुम्हाला वेळ, प्रेरणा आणि सगळे रिसोर्सेस मिळोत हि सदिच्छा!!+111111