बुडित बँकेच्या जामिनदार नोटिशीला उपलब्ध पर्याय कुठले आहेत?

Submitted by यक्ष on 17 May, 2018 - 07:58

फार्फार वर्षापूर्वी एक त्यातल्या त्यात नावाजलेली बँक होती. प्रत्यक्ष नांव घेणं कितपत कायदेशीर आहे / नाही ह्याबद्दल कल्पना नसल्याने क्षणभर मी तिला 'बहुरुपी बँक' म्हणतो!
माझ्या उमेदवारीच्या काळातील एका जवळच्या मित्राच्या भावाला त्याच्या पहिल्या व्यवसायासाठी एक मदत म्हणून 'कॅश क्रेडिट' साठी जामिन (क्र. २) राहिलो.
पुढील काही काळात ती बुडित निघल्याचे वर्तमान त्या व्यक्तिकडून कळाले.
त्याने असेही सांगितले की त्याने एफ. डी. मध्ये टाकलेली (कॅश क्रेडिट मर्यादेच्या तिप्पट) रक्कम ही ह्या सरकारी टांचेमुळे परत मिळणे दुरापस्त झाले. ती देउ शकण्याबद्दल बँकेने असमर्थता व्यक्त केली.
मागील काही कालावधीमध्ये मला (जामिनदार) असल्याने सुमारे तीन नोटिसा (मला -प्रती) आल्या. माझ्या परिचित एका बँक अधिकार्‍याला विचारणा केली असता...'त्या व्यक्तीला सेटल करावयास सांग....व तोपर्यंत ह्या नोटिशिंन्ना उत्तर नाही दिले तरी चालेल असे सुचवले. त्याप्रमाणे मी त्या व्यक्तीला तसे करून प्रकरण लवकर मिटवण्यास सांगितले. त्याने तसे प्रयत्न केलेही.
ह्यात सुमारे वर्षभर गेले. त्यात बेंकेचे व्याज वाढ्ले. एफ. डी रक्कम परत मिळत नाही व कॅश क्रेडिट च्या आउट्स्टँडिंग रकमेचा तिढा सुटत नाही. त्यावर व्याजाचे लोढ्णे असे सध्या चालू आहे.
ती व्यक्ती हे प्रकरण तडजोड करून सोडवण्यास प्रयत्नशील असल्याचे बोलण्यावरून साधारणपणे कळते.
आता आणखी एक नोटीस (त्या व्यक्तिच्या नांवे - मला प्रत - रजिस्टर्ड पोस्टाने) आली आहे. त्यात असे लिहिले आहे की:

"...आपणास ह्यापूर्वी नोटीस पाठवून सुद्धा आपण परतफेड केली नाही...अशा परिस्थितीत बँकेच्या प्रशासकीय मंडळाने ठराव क्र. क्ष क्ष रोजी म.स.सं. अधिनियम १९६०, कलम १०१ अन्वये मा. निबंधक, स.सं. ह्यांचेकडे अर्ज दाखल करून वसूलीचा दाखला मिळण्याबाबत ठराव मंजूर केला आहे व तुमचेकडून रक्कम वसूल करून मिळावी म्हणून ठराव मंजूर केला आहे....."

तर ह्या प्रकरणात जामिनदार म्हणून ह्यातनं बाहेर पड्ण्याचे काय पर्याय उपलब्ध आहेत? ह्यात व्यक्तिशः माझ्याकडून वसूलीचा काही प्रसंग येउ शकतो का? त्यात मी कायदेशीर मार्गाने कसे समोरे जावे असे प्रश्न आहेत. (मी केलेल्या मदतीबद्दल मी ठाम आहे, त्या व्यक्तिविषयी - तो जवळचा नसला तरी - कुठल्याही प्रकारचे विपरीत मत नाही व पश्चात्ताप वगैरे नाही! हे केवळ बाह्य कारणामुळे झाले व त्यात त्या व्यक्तीचा कुठलाही दोष नाही - असे मी मानतो.)
आपण काही सुचवू शकल्यास आधीच आभार...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही मित्रा कडून बँक FD च्या पावतीच्या Xerox घेऊ शकत असल्यास त्या जोडून बँकेला तुमच्या नोटीस चे रजिस्टर उत्तर पाठवा की कॅश क्रेडिट against fd आहे पैसे कर्ज दारकडून वसूल करा , अन्यथा जमीन दार म्हणून बँकेला तुमच्या कडून वसूल करण्याचा पूर्ण अधिकार आहे , वरील बँक लक्ष्यात आली , मित्रा ला 2010 मध्ये मोटरसायकल घेण्यासाठी जमीन होतो , व गॅरंटी म्हणून माझी FD होती बँक अवसण्यात गेली FD चे पैसे ही मिळेनात आणि मित्राला नोटीस वर नोटीस पैसे कुठे भरायचे ते पण कळेना गावातली ब्रँच बांफ झाली होती मग मला नोटीस आली त्या नोटिसला FD च्या xerox जोडून उत्तर दिले मग त्यातून पैसे कट होऊन मला उरलेले पैसे मिळाले ,कट झालेले मित्राने दिले अजून एक FD अडकून पडली आहे त्याच बँकेत 2014 पासून FD चा व्याज दर 2% केला व पावती बदलून दिली , जाऊदे पैसे गेल्यातच जमा आहे , तुम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या करण नसते झेंगत मागे लागते व आपल्या कडे तितका वेळ नसतो .

मलाही जामीनदाराविषयी काही शंका आहेत... समजा, एखाद्याने कर्ज बुडवले आणि तो फरारी झाला.. आणि त्याला जामीनदाराने त्याची म्हणून( ?) एक वेगळी जमीन तारण ठेवली होती...त्याचा जामीनदार राहतो त्या फ्लॅटशी काही संबंध नाही... या केस मध्ये बँक जामीनदार राहत असलेला फ्लॅट वर हक्क सांगू शकते का??तो फ्लॅट जामीनदार आणि त्याच्या बायकोच्या नावावर आहे...आणि जॉईंट हिंदू कायद्याखाली वडिलोपार्जित वाडा विकून घेतला आहे.. इथे तो कर्जदार फरार.. जमीनदाराच्या तारण जमिनीवर एका तिसऱ्याच बिल्डर ने बांधकाम सुरू केले तर बँक तो हो फ्लॅट मागते आहे.. बिल्डर म्हणतो त्या जामीनदाराने ही जमीन केव्हाच मला दिली आहे... आता बिल्डर आणि बँक मध्ये पण केस यावरून...आणि जामीनदार च्या करंट फ्लॅट वर पण नोटीस पाठवलीये... बायको म्हणते माझ्या नावावर अर्ध घर आहे... बँक अशी नोटीस बजावू शकते का?? सगळी कागदपत्र तर जामीनदारकडे आहे?? त्याच्या करंट फ्लॅटला काही धोका आहे का?

कोणी वकील मंडळी यावर प्रकाश टाकू शकेल का?

नटुकाकी फारच कॉम्प्लेक्स केस आहे ही...

यक्ष, त्या बँकेचे काही खरे नाही, दर सहा महिन्यांनी काहीतरी नवीनच ऐकायला मिळते. भरपूर सामान्य लोकांचे पैसे अडकले आहेत त्या बँकेत

माझा एक उलटा प्रश्न आहे.. ज्या मुदतठेवीच्या बदल्यात कॅश क्रेडिट घेतले होते तिची काय अवस्था आहे? तिच्या बदल्यात हे कॅश क्रेडीट बंद नाही का करुन घेतले? तसे करुन घेतले असते तर ते सोपे गेले असते. उरलेले पैसे त्यांच्या कडेच मुदत ठेवीत गुंतवून त्या वर २ टक्के तरी व्याज मिळाले असते.
वरती महेंद्र ढवाण ह्यांनी पण तसेच केले आहे..

धन्यवाद हिम्सकूल व Srd !
ती बँक मुदतठेवीला वेगळा न्याय व कर्ज खात्याला वेगळा न्याय लावतेय असे कळले होते!
असो. दरम्यान त्या (मित्राच्या भावा)ने बँकेशी बोलून सामोपचाराने केस बंद केल्याचे वर्तमान कळवलेय. तर ही एक चांगली बातमी कळवणे अगत्याचे.
सर्व प्रतिसाद देणार्‍यांन्ना व वाचकांन्ना मनःपूर्वक धन्यवाद!