लेख - उत्तर कोरिया - मीमांसा

Submitted by भागवत on 8 May, 2018 - 06:23

एखादा गुंड किंवा द्वाड मुलगा जो प्रत्येक अरे ला कारे करतो आणि कारण नसताना धिंगाणा घालतो अचानक तो जर समजूतदारपणे वागायला लागला तर आपल्याला नवल वाटते. त्या कडे आपण संशयाने पाहतो. असेच काहीसं "किम जोंग-अन" या उत्तर कोरियाच्या हुकूमशहा बद्दल झाले आहे. मी काही आंतरराष्ट्रीय घडामोडीचा जाणकार नाही पण या घटनेकडे एक सामान्य व्यक्तीच्या नजरेतून बघतो. मागील काही महिन्यांपासून हुकुमशहाचा कल बघितल्यास आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील.

अचानक गुपचुपपणे रेल्वेतून चीन भेट, त्या अगोदर क्षेपणास्त्र चाचणी घेणे. अमेरिकेच्या अध्यक्षांवर व्यक्तिगत बोचरी टीका करणे. अचानक दक्षिण कोरिया सोबत वाटाघाटीची इच्छा दर्शवणे. स्वत:च्या बहि‍णीला (किम यो झोंग/Kim Yo Jong) विशेष दूत म्हणून ऑलिंपिक मध्ये पाठवणे. सांस्कृतिक देवाण घेवाणीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे. अमेरिका सोबत बोलाचाली साठी तयारी दाखवणे. अणूचाचणी ठिकाण कायमचे बंद करणे. शांतता राखण्यास प्राधान्य देणे असे दाखवणे. अश्या आणि बऱ्याच घटना घडल्यात. “दोघांच्या भांडणात तिसर्‍याच लाभ.” हे मात्र वाक्य आंतरराष्ट्रीय घडामोडीत कधी-कधी लागू न होता “दोन देशाच्या जटिल संबंधामुळे आणि अराजकतेत तिसर्‍या देशाचा फायदा कदाचित होणार नाही.” कारण सगळ्यांच्या अर्थव्यवस्था एकमेकांत गुंतल्या असल्या मुळे कदाचित तोटाच होईल. आंतरराष्ट्रीय राजकारणात उत्तर कोरिया आधी पासून डोकेदुखी आहे पण तो वरचढ होऊन चालणार नाही. उत्तर कोरियाची बंडखोरी कायम राहिल्यास आंतरराष्ट्रीय समीकरणे सुद्धा बदलू शकतात.

हुकुमशहाचा स्वभाव, वागणे, आणि बॉडी लँग्वेज यांचे विश्लेषण बरीच देश आणि त्यांची माध्यमे करत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात संकेता ना खुप महत्व असते. आंतरराष्ट्रीय पत्रकार तर किमच्या शारीरिक ताकदी पासून त्यांच्या बूटा पर्यंत सर्व काही विश्लेषण करत आहे. विशेषतः प्रत्येक देश आप आपल्या परीने विश्लेषण करून त्याची माहिती स्वत: साठी वापरतो. अमेरिकेच्या गुप्तचर विभाग तर किम हुकूमशहाचा तर जन्मल्या पासून इतिहास तपासात असावेत. नक्कीच त्या माहितीचा किम- ट्रंप यांचा भेटी अगोदर त्यांच्यावर दबाव किंवा भेटीगाठी मध्ये दबाव किंवा करारा दरम्यान योग्य वापर करता येईल.

आणि शेवटी तो ऐतिहासिक दिवस (२७ एप्रिल १८) ही उजडला जेव्हा सत्ताधारी किम DMZ (Demilitarize Zone) शांतता क्षेत्र पार करून दक्षिण कोरिया यांचे राष्ट्रपती मून जॅ-इन (Moon Jae-in) यांच्या सोबत वाटाघाटी केल्या. त्या सोबत कोरियन युद्ध कागदोपत्री संपले. DMZ ही कोरियन द्विपकल्पाची दोन देशांना विभागणारे शांतता क्षेत्र आहे. जे ५० किमी रुंदी आणि २५० किमी लांब पसरलेले आहे. या क्षेत्रात १९५० पासून या शांतता क्षेत्रात युद्धबंदी होती पण तिथे दोन्ही बाजूला सशस्त्र सैनिक आणि प्रचंड प्रमाणात दारुगोळा आहे.

भूतकाळातील इतर हुकूमशहा प्रमाणे किमने क्रूर कर्म केले आहेत. राजकीय आणि सामाजिक निरंकुश सत्ता स्थापन करून ती स्वतः कडेच राहील अशी व्यवस्था करणे. जसे की आपल्या सगळ्या विरोधकांना क्रूर पद्धतीने संपवणे. काही भुकेलेल्या कुत्र्‍यांच्या पुढे विरोधकांना हवाली करणे. चुलत भावाला मारून टाकणे. खुर्चीच्या अधिक मजबूत आणि बळकटीसाठी काहीही करण्याची तयारी. जगात रंगावल्या प्रमाणे किम खुनशी, निरंकुश, युद्धखोर, घातकी, युद्ध पिपासु, क्रूर वाटतो. किंबहुना त्याने तसे स्वत:चा दबदबा राखण्यासाठीच ठेवले आहे. पण किम हुकूमशहाने आपल्या भवती एक वलय निर्माण केलाय. पण बहुतेक त्याला या गोष्टीची जाण असावी की कितीही लांब पल्याचे क्षेपणास्त्र विकसित केले तरी पोटाची भूक त्याच्याने संपत नाही.

या दोन्ही देशाची स्थापना १९४८ साली झाली आणि दोन देशाच्या भांडणाची उत्पत्ति शीतयुद्धा मध्ये आहे. शांततेचे प्रयत्न कोरियन द्विपकल्पावर आधी सुद्धा झाले आहेत जसे की १९९४, २०००, २००७ मध्ये. पण त्यात अंतिम साध्य काहीच झाले नाही. किंवा कोणाची इच्छाच नव्हती की शांततेसाठी त्याग करावा. २०१५ पर्यंत उत्तर कोरियाने जवळपास १६६ देशाशी राजकीय संबंध प्रस्थापित केले आहेत. काही युरोपियन देशाची उत्तर कोरियाला मान्यता नाही पण साम्यवादी विचारसरणीच्या देशाचा उत्तर कोरियाचे चांगले राजकीय संबंध आहेत. मानवी हक्काची पायमल्ली, आणि जगा पासून विलग असल्यामुळे त्या देशात काय चालू आहे हे कळतच नाही. काही वर्षाखाली दुष्काळा मुळे उत्तर कोरियात 20 लाख लोक मृत्युमुखी पडले होते. अति साधारण जीवनमान, इंटरनेटवर, टीव्ही, आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर बंदी, विचित्र बेबंदशाही कारभार त्यामुळे जनता त्रस्त असते.

दक्षिण कोरियाची पाठ राखणी अमेरिका, जपान, इतर देश करतात आणि उत्तर कोरियाला चीन मदत करतो. त्या प्रत्येकाचे हित सबंध गुंतलेले आहेत. प्रत्येकाला आप-आपला हेतु साध्य करायचंय. दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या पाठिंब्याने अर्थव्यवस्थेत चांगले बदल घडवून आपली प्रगती साधली. आणि उत्तर कोरियाचा फक्त एकाच कार्यक्रम होता अणूचाचणी करून जगाला धाक दाखवणे. उत्तर कोरिया वर अमेरिकेचे निर्बंध, जागतिक समुदायाचे निर्बंध, फक्त चीनच्या मदतीवर उत्तर कोरिया निभावत आहे. पण जनतेला वाऱ्यावर सोडून कोणता कार्यक्रम यशस्वी होईल का? हे हुकूम शहाच्या लक्षात आले असेल. त्यामुळे तरच हे बदल घडत नसतील? जे बदल घडत आहेत ते चांगल्याच मार्गे जाऊन जगाच्या भल्यासाठी आणि शांती साठी उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांची शांतता वार्ता सफल झाली पाहिजे. त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न झाले पाहिजे. जर दक्षिण कोरिया आणि ट्रम्प प्रशासनाला उत्तर कोरियाचा प्रश्न उलगडता आल्यास त्यांची पत आंतरराष्ट्रीय पटावर प्रभावी होईल.

घटनाक्रम
१९९४ – शांतता वार्ता रद्द
२००० – पहिली शांतता वार्ता
२००७ – दुसरी शांतता वार्ता
१ जानेवारी १७ – उत्तर कोरिया आंतरखंडीय क्षेपणास्त्र घोषणा
४ जुलै १७ – पहिली Hwasong-14 क्षेपणास्त्र चाचणी
२९ ऑगस्ट १७ – उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानच्या अवकाशातून गेले
२२ सप्टेंबर १७ – किम आणि ट्रंप याच्यात एकमेकांवर चिखलफेक
१ जानेवारी १८ – ट्रंप यांनी मा‍झ्या टेबलावर मोठे न्यूक्लियर बटण आहे असे किमला धमकावले.
९ जानेवारी १८ – उ. कोरियाचे ऑलिंपिक साठी खेळाडू पाठवण्याचे वचन
७ मार्च १८ – दक्षिण कोरियाच्या अध्यक्षाचा उत्तर कोरियाचा दौरा
९ मार्च १८ – ट्रंप यांना उत्तर कोरियाचे भेटीचे आवतन
२६ मार्च १८ – किम जोंग-अन यांचा गुपचूप चीन दौरा
२७ मार्च १८ – किम जोंग-अन आणि मून यांची शांती वार्ता
मे/जून १८ – ट्रंप आणि किम जोंग-अन यांची नियोजित भेट

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑक्टो/नोव्हे १८ – ऊत्तर कोरियाने अमेरिकेला अंधारात ठेऊन संहारक शस्त्रांचे कारखाने चालूच ठेवल्याचे निष्पण्ण.
ऑक्टो/नोव्हे १८ – ट्रंप यांच्या मंत्रिंंडळातील परराष्ट्रमंत्रांचा ऊ. कोरिया दौरा रद्द

पुन्हा ऊ. आणि द. कोरियांच्या संयुक्त ऑलिंपिक टीमची घोषणा पण झाली वाटते अलिकडे.

असे नवे अपडेट्स येऊ द्या.