Submitted by सुप्रिया जाधव. on 4 May, 2018 - 21:00
नको व्यर्थ भक्तीमधे खोट काढू
फिरुन जन्म घेणार नाही जटायू
जपू दे मला आत्मसन्मान माझा
जिण्याला पुरेसा हवा प्राणवायू
स्मृतींसोबती विस्मरण देत जातो
तुझ्यासारखा पाहिला ना दयाळू
कशी काय हसतात काट्यांमधे ही ?
फुलांसारखी होत जा मनमिळावू
तुझ्यावर भरवसा न उरलाय त्याचा
विषाची परीक्षा नको घेत जावू
युगांचा तळपतो जसा सूर्य माथी
तशी वेदना दे मलाही चिरायू
तुला स्वार्थ दिसतोय निष्ठेत माझ्या ?
नव्याने पुन्हा सर्व संदर्भ चाळू
तुला पाहते रोज फोटोमधे मी
सरक ना जरा, सोबतीनेच राहू !
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप खूप जीवास भिडली गझल .
खुप खूप जीवास भिडली गझल .
मनापासून धन्यवाद भुईकमळ
मनापासून धन्यवाद भुईकमळ