एकदा टारझन अंगात आला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 May, 2018 - 09:47

एकदा टारझन अंगात आला

काढून टाकले कपडे सर्व

पायपुसण्याचा लंगोट केला

अन जंगल प्रवास सुरु झाला

कुणीही ओळखू नये

म्हणून हेल्मेट घातले

बाहेर येताक्षणी घराच्या

भरपूर सारे कुत्रे मागे लागले

वाट मिळेल तिकडे धावत सुटलो

पारंब्या अन वेली शोधू लागलो

नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून

उड्या मारू लागलो

आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता

कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता

स्टेमिनापण संपत आला होता

टारझन अंगातून कधीच निघून गेला होता

लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता

पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये

जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट

टारझन बनण्याच्या नादात

पुरता झालो होतो चेकमेट

--------->> सिद्धेश्वर विलास पाटणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults