Submitted by वारा on 22 March, 2009 - 05:32
आषाढी या मेघाजवळी
निरोप धाडतो तुला ।
वार्याच्या वेगाने सत्वर
सखे भेट तू मला ॥
ते कोसळणे नसे नभांचे
माझा अश्रूपात असे ।
ते बिजलीचे नाही क्रंदन
माझे आक्रंदन असे ॥
शापित यक्ष सखे तुझा हा
तुझिविना तगमगतो आहे ।
दूर इथे या विरहगिरीवर
तुझ्याचसाठी झुरतो आहे ॥
ना काळाचे अन् वेळेचे
नुरले सखये मजला भान ।
ध्यासाने ते तुझिया माझे
झाले मजनूचे ग ध्यान ॥
तुझा दुरावा कसातरी हा
आजवरी साहिला ।
ये ये आता लवकर तू ग
अंत निकट आला ॥
कसे तुला ग मी सांगू ते
झाली माझी काय गती ।
प्राण तिथे अन् शरीर येथे
अशी झाली माझी स्थिती ॥
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतीम
अप्रतीम !
-हरीश
-----------------------------
Have You Saved a Life Yet?
http://hridayjyot.synthasite.com/
------------------------------
खुप आवडली.
खुप आवडली.
खुप सुरेख
खुप सुरेख !!
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही
)
मेघदूत
मेघदूत !!!
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
अतिशय
अतिशय सुंदर!!!
खूप छान!
खूप छान!
मस्तच.
मस्तच.
छान !
छान !