ऑफलाईन

Submitted by सेन्साय on 3 May, 2018 - 14:00

.

.

आज मी लेटेस्ट मोबाईल घेतला म्हणून कौतुकाने चारचौघांत भाव खात राहतो अन् व्हाट्सअप फेसबुक वरील स्टेट्स लगेच अपडेट होते ... फीलिंग एक्साइटेड विथ न्यू हैंडसेट वगैरे वगैरे ! प्रत्यक्षात ह्या छोट्याश्या उपकरणाचा उपयोग निव्वळ इतरांसोबत संवाद साधणे आणि इंटरनेट माध्यमातून इतर जगाशी संबध राखून माहितीचे आदान प्रदान करणे एवढ्या पुरताच असतो (असायला हवा). पण एखाद्या दुर्धर रोगा प्रमाणे हे ऑनलाइन व्यसन काही आपली पाठ सोडत नाही.

जसे हां मोबाइल महागडा तसेच अनेक महागड़ी बुकिंग करून (गणपती किंवा मे महिन्यातील सुट्टीसाठी) जेव्हा मी फिरायला जातो किंवा अगदी आपल्या गावी जातो तेव्हा मानसिक पातळीवर तीसरे महायुद्ध सुरु झालेले असते ― माझे ऑनलाइन अस्तित्व विरुद्ध माझे ऑफ़लाइन नाते संबध !

समोर भेटलेली जीवाभावाची व्यक्ति / मित्र मैत्रीण असताना माझं लक्ष कायम हातातील स्क्रीन वरच्या अपडेट्सकडेच राहते.

पिकनिक किंवा गावी गेल्यावर खरेतर ह्या मोबाइल पासून ऑफलाईन राहण्याची मज़्ज़ा अनुभवता आली पाहिजे. निसर्ग कायम ऑनलाइन असतो आपल्यासाठी. आपण मात्र फेसबुक व्हाट्सअपच्या नादात त्याच्या सोबत कनेक्ट होवू शकत नाही. आणि मग आपल्या फ्रेंडलिस्ट मध्ये हां दिसतच नसल्याने निसर्गासोबत आपले चाटिंग बहुतांश घडतच नाही. व्हाट्सअप वरच्या लालबदामवाल्या स्माइलीशिवायही बनता येते इथे छान रोमांटिक हे ऑफलाईन असताना आम्हाला कधी उमगतच नाही ... अन् छान निसर्गरम्य ठिकाणी आलेला 'तो' सेल्फ़ीच्या नादात 'ती'च्या मनासोबत खऱ्या अर्थाने कधी कनेक्ट होतच नाही.

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users