स्फुट - एक क्षण अस्सल

Submitted by बेफ़िकीर on 2 May, 2018 - 05:48

स्फुट - एक क्षण अस्सल

अस्सल बोलणाऱ्या आणि अस्सल बोलून जगताना झगडणाऱ्या काही व्यक्ती असतात

अस्सल बोलणे जमत नाही म्हणून गॉसिप करत मजेत किंवा यथाशक्ती जगणाऱ्या काही व्यक्ती असतात

अस्सल बोलता येत नाही म्हणून स्वतः नीट स्थिरस्थावर झाल्यावर अस्सल लिहिणाऱ्या काही व्यक्ती असतात

त्यांची व्हर्जन्स होतात नेमाडेंची

अस्सल बोलताही येत नाही आणि गद्यात लिहिताही येत नाही त्यांचे गालिब आणि जफर आणि सावरकर होतात

अस्सल बोलताही येत नाही, लिहिताही येत नाही, ते कवी म्हणून मिरवतात

कवी ही सर्वाधिक फुटकळ भाष्य करणारी जमात आहे

ह्या फुटकळ भाष्यात स्वतःला शोधणारे अनंत आहेत ह्या भांडवलावर ही जमात टिकून आहे

दुर्दैव हे, की भरडले गेलेले लोक कविता करतात आणि प्रशंसकांना कायम भरडले जाण्याचीच स्फूर्ती देतात व ती शैली लोकप्रिय होते

अस्सल जगणारे कसे जगतात किंवा कसे जगावे हे पब्लिकला कधीच कळत नाही

शस्त्र खाली ठेवतात तशा कविकल्पना खाली ठेवा

साहित्याच्या मनुस्मृतीत कवी म्हणून तुम्ही नक्कीच शूद्र असाल

शंभर प्रेरणादायी कविता रचण्याऐवजी

एक क्षण अस्सल जगून दाखवा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users