भटकंती उत्तरपूर्वीय भारताची- २

Submitted by निक्षिपा on 2 May, 2018 - 01:41

भटकंती_उत्तरपूर्वीय_भारताची - एक लेखन प्रवास!

सुखद आठवणी जपायच्या तर फोटोंच्या माध्यमातून! हे माझ्या बाबांचं तत्व होतं. (अर्थात ते माझ्यातही उतरलंय) पण माझी आई त्या आठवणी संवादातून जपते. सतत त्या विषयावर बोलणं, भावुक होणं, मध्येच कुठलासा संदर्भ विसरणं पण तरीही त्या दरवेळी रंगवून सांगणं हे तिला फार छान जमतं. मला असं घडाघडा बोलता येत नाही. 'कशी झाली टूर?' याला माझं उत्तर 'छान झाली' असं आलं की ती चिडते. पण हे माझे शब्द, या आठवणी बरेचदा जणू लेखणीला शरण जातात... 'उचललं पेन आणि लावलं कागदाला' की जणू ते पेनच बोलू लागतं. हे सगळं इथे सविस्तर लिहिण्याचे कारण म्हणजे मी आयुषला- माझ्या मुलाला दररोज इ-पत्र लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझा लेखन प्रवास हा मी त्याच्याशी केलेला संवाद असणार आहे. तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच्यासाठी ही कदाचित एक नॉस्टॅल्जिक पण हॅप्पी जर्नी असेल याची खात्री आहे मला...

©स्मृती
शिलाँग, मेघालय

#NorthEast #Lettertoson #MissingAayush #MyTravelogue #LifeinaMeghalaya #SoloTraveller #FeelGoodelephant-falls-1280x640.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

निक्षिपा, मोठे भाग टाका ना, उत्तर पूर्व भागाविषयी कायम उत्सुकता वाटत आल्ये, १९९६ साली गंगटोक, शिलाँग, गुवाहाटी फिरलो होतो, त्याही पुधे जायचं आहे एकदा. तुम्ही एकट्या गेलात म्हणून खूप कौतुक !!

नॉर्थइस्टला मराठीत 'ईशान्य' असा शब्द आहे.
(साऊथईस्ट - आग्नेय, साऊथवेस्ट - वायव्य, नॉर्थवेस्ट - नैऋत्य.)

लेखमालेत सगळीकडे 'उत्तरपूर्वीय' असा उल्लेख वाचून लिहिले.