फेसबुक महिमा - फेसबुक हानिकारक आहे कां ?

Submitted by kokatay on 28 April, 2018 - 13:03

फेसबुक महिमा
फेसबुक खरच हानिकारक आहे कां?
कालच जोशी काकांचा इमेल आला, त्यांनी फेसबुक वरून आपलं नाव काढून घेतलं आहे, त्यांना मी कारण विचारलं, तर त्यांनी सांगितलं कि भारतात अनेक मराठी वृत्तपत्रात लेख छापून आले आहेत कि हि लोकं आपली माहिती विभिन्न व्यवसायांना जाहिराती साठी पुरवतात, लोकांची माहिती ते राजकारणासाठी देखील पुरवतात. मी स्वत: देखील अशे काही लेख वाचले आणि मला असं वाटलं कि ज्यांना सोशल मिडिया बद्दल फारशी माहिती नाही किंवा अशी मंडळी, ज्यांनी ह्याचा फारसा अभ्यासही केला नाही, त्यांच्यासाठी हि माहिती अगदी बॉम्ब-विस्फोटा सारखी धक्का दायक ठरली असावी आणि ह्या मंडळींनी चक्क आपलं नावच काढून घेतलं. खरतर मलाही बऱ्याच गोष्टी ह्याचा अभ्यास केल्यावरच कळल्या. काही फेसबुक updates आपल्या नकळत होत असतात. अधून मधून setting मध्ये जाऊन तपासणी करणे फार गरजेचे आहे.
तसं बघितलं तर नुसतं फेसबुकच नव्हे तर सगळेच सोशल मिडिया platforms आणि इमेल देखील तुमची माहिती तुमच्या computer आणि internet च्या वापरातून बाहेरच्या व्यवसायांना पुरवत असतात. सगळ्यात पहिले तर हे जाणून घेणे जरुरी आहे कि जी माहिती हि लोकं पुरवतात, त्यामुळे तुमचं वैयक्तिक नुकसान होतं का?
जी माहिती पुरवली जाते ती साधारण तुमच्या आवडी-निवडी, तुमची पर्यटन ठिकाणं, तुम्हाला कुठलं पुस्तक किंवा सिनेमा आवडतो, तुम्ही वाचन-लेखन करता कां? अशी साधारण माहिती तुमच्या “shares” आणि “likes” वरून काढली जाते आणि मग हि लोकं त्याप्रमाणे जाहिराती दाखवतात. आता एक उदाहरण सांगते: मागच्या वर्षी मी भारताच तिकीट बघत होते आणि माझ्या एका फेसबुक contact नी एक कंपनीची ची लिंक शेयर केली होती, deal फारच सुंदर होती म्हणून मी पण ती क्लिक करून वाचली आणि मला एक सुंदर तिकीट मिळालं सुद्धा! आता मी हि लिंक वाचली आणि वापरली अशी माहिती नक्कीच दुसर्या travel agents ला पुरवली गेली आणि त्यानंतर मला एक पेक्षा एक सुंदर travel agents च्या जाहिराती दिसायला लागल्या. आता ह्यात माझं काहीच नुकसान झालं नाही, उलट मला उपयोगी अश्या जाहिराती दिसू लागल्या.
आपण कुठल्याही गोष्टितलं चांगलं काय ते घ्यायचं, वापरायच, सतर्क राहून पुढे कूच करायची! आता मलाच तुमच्या सारखी असंख्य वाचक मंडळी माझ्या www.marathiculturandfestivals.com संकेतस्थळाला लाभली आहे, त्यात सगळ्याच सोशल मिडिया sites चा हातभार आहे. फेसबुक चा तर नक्कीच आहे. फेसबुक वर ह्या संकेतस्थळासाठी बनवलेला ग्रुप आहे त्यात हजारोनी सदस्य आहेत आणि मराठी संस्कृती विषयी माहिती इथे शेयर केली जाते.
मुख्य म्हणजे जी माहिती तुम्हाला personal ठेवायची आहे ती माहिती तर आपण कुणाकडेच देत नाही, फक्त सरकारी व्यवहार, बँक, नौकरी अश्या ठिकाणीच आपण आपली खाजगी माहिती शेयर करतो. फेसबुक ला किंव्हा दुसर्या कोणत्याही सोशल मिडिया ला घाबरून जाऊन ते बंद करणे अजिबात जरुरी नाही. स्वत:ला सतर्क आणि सुरक्षित ठेऊन तुम्ही ह्या sites चा नक्कीच आनंद घेऊ शकता.
फेसबुक वर बऱ्याच गोष्टी बाहेर शेयर करण्याची परवानगी तुम्ही control करू शकता, खाली मी हि सगळी माहिती देत आहे:
१. Location services: तुम्ही कुठे जाता? कुठल्या restaurant मध्ये जेवता? कुठे खरेदी करायला जाता हि माहिती जर कां तुम्हाला शेयर करायची नसल्यास हि सेवा शक्यतो बंद करा:
iPhone वर: Setting app वर क्लिक करा ->
fb1.JPG
खाली scroll करा आता Privacy ह्यावर क्लिक करा
fb2_0.JPG
आता Location Services ह्यावर क्लिक करा
खाली scroll करा आणि Facebook च्या चित्रावर क्लिक करून “never” अशी setting निवडा.
fb3.JPG
Android वर: account setting वर क्लिक करा Location वर क्लिक करा facbook वर क्लिक करून “never” निवडा.

२. Third party apps आणि दुसर्या हानिकारक संकेत स्थळांना नाही म्हणा:
हि खुपच महत्वाची step आहे, खर सांगू तर आपल्या नकळतच ह्या apps आणि लिंक्स तुमच्या फेसबुक खात्यावर accept केलेल्या असतात. हाच data पुढे विकला जातो आणि विभिन्न राजकारण, व्यवसाय ह्यात वापरला जातो.
हि step तुम्ही तुमच्या desktop वरून चांगल्यारिते करू शकता.
Facebook च्या setting वर क्लिक करा
आता डावीबाजुला Apps and Websites tab दिसेल, ह्याचावर टिचकी मारा आणि तिथे edit वर जाऊन सगळाच access turn off करा.
fb thrird party.png
३. तुमचं profile आणि post sharing:
हि पण खूब महत्वाची step आहे: Setting वर क्लिक करून डाव्याबाजूला “Privacy” वर टिचकी मारा आणि तुमच्या मर्जीप्रमाणे setting निवडा.
“friends only” हे निवडणे उत्तम!
४. वैयक्तिक माहिती आणि जाहिराती
About me मध्ये तुमच्या बद्दल कमीत कमी माहिती द्या, शिक्षण, शाळेच नाव इत्यादी आणि जाहिरातींना कसं नाही म्हणायचं ते इथे बघा :
फेसबुक वर सगळ्यात वर उजव्याबाजूला एक गोलाकार मध्ये प्रश्न चिन्ह दिसतो त्याचावर क्लिक करा  आता Privacy check up ह्याचावर क्लिक करा :
fb step four.png
इकडे तुम्ही परत तुम्हाला पाहिजे ती setting निवडू शकता. आता पुढच्या step मध्ये आपण जाहिरातींना नको म्हणूया! मागच्या सारखच setting ला टिचकी मारून डाव्याबाजूला Ads वर क्लिक करा
ad setting ला जाऊन “not allowed” निवडा.
fb ad.png
वरील सगळ्या steps केल्यावर तुम्ही बऱ्यापैकी सुरक्षित असता. फेसबुकच चांगलं घ्या आणि वाईट ला राम राम ठोका! फेसबुक नी तुम्हाला काय चांगलं दिलं आहे त्याचा आनंद घ्या. किती मित्र मैत्रिणी तुम्हाला मिळाल्यात? किती छान-छान लेख तुम्हाला वाचयला मिळतात, कितीतरी बौद्धिक ग्रुप्स आहेत त्याच्यात तुम्ही आपली मतं मांडू शकता, तुम्ही काही उपक्रम हातात घेतला असेल तर त्याच्या बद्दल तुमची जाहिरात मात्र फुकटच.
म्हणून सांगते फेसबुक ला घाबरू नका उलट आनंद घ्या पण आपल्याला वाचवून!
मला तर बाबा फेसबुक पावला आहे जसा मला पावला, तसा तुम्हालाही पावो हीच श्रीचरणी प्रार्थना.
ऐश्वर्या कोकाटे
संपादिका
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स

Group content visibility: 
Use group defaults

हाहाहा, तुमचा भोळेपणा बघून हसू आले.
एखादी गोष्ट फुकट मिळते म्हणजे समजून चला You are not the customer, you are the product.

हे वाचा.

Hello! Is this Gordon's Pizza?

No sir, it's Google's Pizza.

Did I dial the wrong number?

No sir, Google bought the pizza store.

Oh, alright - then I’d like to place an order please.

Okay sir, do you want the usual?

The usual? You know what my usual is?

According to the caller ID, the last 15 times you’ve ordered a 12-slice with double-cheese, sausage, and thick crust.

Okay - that’s what I want this time too.

May I suggest that this time you order an 8-slice with ricotta, arugula, and tomato instead?

No, I hate vegetables.

But your cholesterol is not good.

How do you know?

Through the subscribers guide. We have the results of your blood tests for the last 7 years.

Maybe so, but I don’t want the pizza you suggest – I already take medicine for high cholesterol.

But you haven’t taken the medicine regularly. 4 months ago you purchased from Drugsale Network a box of only 30 tablets.

I bought more from another drugstore.

It's not showing on your credit card sir.

I paid in cash.

But according to your bank statement you did not withdraw that much cash.

I have another source of cash.

This is not showing on your last tax form, unless you got it from an undeclared income source.

To HELL With Ur Pizza..!!
ENOUGH!!
I'm sick of Google, Facebook, Twitter, and WhatsApp. I'm going to an island without internet, where there’s no cellphone line, and no one to spy on me ...

I understand sir, but you’ll need to renew your PASSPORT ... it expired 5 weeks ago.```

>>एखादी गोष्ट फुकट मिळते म्हणजे समजून चला You are not the customer, you are the product.<<
मुद्दा पटला परंतु व्हेन यु साइनप फॉर फ्री, यु आर नॉट रियली ए प्रॉडक्ट, बट अ मिअर डेटापॉइंट. प्रॉडक्ट चा स्कोप खूप मोठा आहे...

लेख चांगला आहे.स्क्रीनशॉट वगैरे मेहनत समजते आहे.
पण हेही खरं की गुगल चा आपल्या आयुष्यात हस्तक्षेप खूप अती होतो.कुठे गेलं/नोकरी शोधत असलं/काही घेतलं की लगेच त्याच्याशी संबंधीत रेकमेंडेशन चा मारा व्हायला चालू होतो.हे प्रकार "जोवर तुम्ही नाही म्हणून सांगत नाही तोवर आमच्यासाठी तुम्ही हो म्हणालात" या तत्वावर चालते.अनसबस्क्राईब हे तुम्ही तसदी घेऊन करण्याचे काम बनते.
नुकतीच आईच्या फेसबुक अकाउंट मधून खोलवर सेटिंग मध्ये जाऊन अनेक परमिशन काढल्या.ती प्रत्येक कुकिंग, क्राफ्ट च्या व्हिडीओ वर क्लीक करायची.काही ठिकाणी "डु यु वॉन्ट टू रिसिव्ह अपडेट" असा मोठा मेसेज पुढे जाण्यापूर्वी येतो.त्यावर यस मोठं समोर आणि नो चं बटन कुठेतरी कोपऱ्यात सूक्ष्मात असतं."पुढे जाऊन व्हिडीओ बघायला" यस क्लीक करून तिचे फेसबुक आणि मेल अश्या सोम्यागोम्या लोकांच्या व्हिडीओ नोटिफिकेशन ने भरून वाहत होते.
नोटिफिकेशन ला यस किंवा नॉ म्हणण्याचा चॉईस ग्राहकांचा असतो.पण यस बटन विश्वव्यापी आणि नॉट नाऊ, नेव्हर चं बटन कोपऱ्यात 2 मिलिमीटर चं ही युजर्स ची एक प्रकारची फसवणूकच असते.
कधीकधी 'फेसबुक नको' हा साधा चॉईस सेटिंग चे खोदकाम करण्या पेक्षा जास्त सोपा पडतो.

नोटिफिकेशन ला यस किंवा नॉ म्हणण्याचा चॉईस ग्राहकांचा असतो.पण यस बटन विश्वव्यापी आणि नॉट नाऊ, नेव्हर चं बटन कोपऱ्यात 2 मिलिमीटर चं ही युजर्स ची एक प्रकारची फसवणूकच असते.>>>>

कित्येक ठिकाणी नो हे बटण नसतेच. मी अशा वेळी पुढे जातच नाही, नाद सोडून देते. तसेही हल्ली फेसबुक बंदच करून टाकलंय.

पण माझ्या आईला खूप उपयोग होतोय. तिला वाचन सोडून इतर छंद नाहीत, वाचन पण फक्त मराठी, त्यातही कुसुम अभ्यंकर, योगिनी जोगळेकर टाइप वाचू शकते. इतर काहीच झेपत नाही. फेसबुक सुरू करून दिल्यापासून तिचा वेळ जातो, त्यावरून बघून पाककृती करत बसते.

तिच्या मोबाईलवरून या सगळ्या परवानग्या काढल्या तर तिला काहीच त्रास न होता ती आरामात वापरू शकते.

बाकी तसेही माहिती तर मिळत असते. रेल्वे स्टेशनवर हल्ली सगळीकडे Uts ह्या अँपच्या मोठ्या जाहिराती लावल्यात. लोकल तिकिटांच्या मोठ्या रांगा बघून जीवावर येते , अगदी स्मार्ट कार्ड वापरून तिकीट काढायलाही रांग असते, आशा वेळ uts बरे म्हणून काल डालो केले तर तिथे सरकारी ओळखपत्र सक्तीचे आहे. पास काढताना ओळखपत्र दाखवावे लागतेच, पण इथे अँपवर आधार नंबर द्यायला जीवावर आले.