पाझरू लागल्या पापण्या...

Submitted by अश्विनी शेंडे on 24 April, 2018 - 02:40

पाझरू लागल्या पापण्या, तर संकोचू नये आपण...
प्रत्येकाच्या आत असतोच एक निखळ झरा...
समोरच्या नजरेत चमकून गेलंच काही, तरी निशंक: असावं...
त्याच्याही आत असू शकतो एक समंजस दिवा....
एखाद्याची माफी कुशीत घ्यावी, मायेने...
प्रत्येकाच्या आत असतं एक दमलेलं मूल...
कुणी मागितलेली सिगरेट बेशक शिलगवावी...
त्याच्याकडून घेतलेल्या उसन्या ठिणगीवर आपण शेकवली असतात नात्यांची कितीतरी उन्हे..
सगळ्याची उत्तरे शोधत बसू नये उगा...
आयुष्याच्या शब्दकोड्यात सुद्धा काही चौकोन राहतातच रिकामे...
पाझरू लागल्या पापण्या, तर संकोचू नये आपण...
प्रत्येकाच्या आत असतोच एक निखळ झरा...
...................................

अश्विनी शेंडे

Group content visibility: 
Use group defaults