--नभांतरी चांदण्यांचे उगवणे होते--

Submitted by Nilesh Patil on 23 April, 2018 - 08:37

--नभांतरी चांदण्यांचे उगवणे होते--

नभांतरी चांदण्यांचे उगवणे होते,
तुझेही माझ्यावर रागावणे होते..।

ह्रदय तर गुंतले,पण जवळ नाहीस तु,
हेच अंतरी मनाला समजावणे होते..।

बघ किती टिपूर आहे हे चांदणे,
(त्याकडे कल्पनेने दाखवणे होते..।)

जाऊया ना दूर एकट्यात कुठेतरी,
डोंगरात सुर्याचे उजळणे होते..।

बघ माझ्या नजरेने एकदा या आकाशी,
नभांतरी चांदण्यांचे उगवणे होते..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-->९५०३३७४८३३--

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users