Submitted by Kalika Bapat on 19 April, 2018 - 13:42
पाऊस आणि तू मनवेडे
पाऊस कसा रानभैर
पाऊस कसा सैरभैर
कसा तो बेभान
कसा तो घालतो थैमान
अगदी सुसाट, अगदी पिसाट
वेडा होऊन धावतो
सृष्टीला मोहवितो
वनराईला नादावितो
अगदी अस्साच...नाही म्हणणार तुला
पाऊस? आणि तू ?
छे...पटत नाही मला
पाऊस कुठे, तू कुठे?
पाऊस...पाऊस मनविभोर
पाऊस मनमयूर
पाऊस चचल किशोर
पाऊस नखरेल
पाऊस मनमोही
पाऊस कृष्ण, राधाही पाऊस
मग...पाऊस आणि तू ?
छेछे...
पण हां...पाऊस आणि तू
काहीसे मनवेडे, काहीसे मनगवडे...
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults