मेणबत्या पॆटतात पण....

Submitted by Prshuram sondge on 16 April, 2018 - 15:20

मेणबत्या पेटतात पण….!

सकाळी सकाळी मी पेपर वाचत होतो.हळू अवाजात टी.व्ही पण चालू होता.आठ वर्षीय मुलीवर बलात्कार…. आतोनात छळ….ती बातमी वाचून डोकं सुन्नं झालं होतं.हे काय वय झालं. बलात्काराला समोर जाण्याचा. हे वय निरागस….निष्पाप, स्वच्छंदी…बागडयाचं.खेळायचं.आपण स्त्री आहोत याच्या जाणीवा तरी मूळ धरू ल्रागल्या आसतील का?शरीरावर स्त्रीत्वाच्या खूणा तरी उमटल्या आसतील काय?हे सारं कळयाच्या आतच कुस्करणं आलं.खूडणं आलं. वाचून मन खीन्न्‍ झालं.भ्‍यकर चीड आली.
चैतन्यं माझा सात वर्षाचा मुलगा शाळेत जायची तयारी करत होता.त्याचं स्कूल बॅग भरणं चालू होतं.तो अधून मधून पेपर मध्ये डोकावतचं होता.तो सारखचं पेपर मध्ये पाहत होता. त्यानं जायला हवं होतं पण तो जागचा हालत नव्हता.आता त्याला बाय करावं व गेट पर्यंत त्याला पोहचावं म्हणून मी उठलो.पेपर एका हातात गुंडाळला.ती बातमी त्याला दिसू नाही म्हणून मी सावधपणे ते पान लपवलं होतं.तो मला जरा बैचन वाटला.त्याच्य डोक्यात काही तरी शिजत होतं. त्याला मला काही तरी विचारायचं होतं.त्याला विश्वास देण्यासाठी मी त्याच्या पाठीवर थोपटलंव विचारलं,”तुला काही प्राब्लेम का?” त्याचा चेहरा खुलला.त्यानं लगेच मला एक प्रश्न विचारला,“बाबा,बलात्कार म्हणजे काय हो ?” या प्रश्नानं मी क्लीन बोल्डचं झालो.हे पोटटं असं काही वीचारील असं मला वाटलचं नव्हतं. आधीचं लपवलेला पेपर मी पुन्हा लपवण्याचा केवीलवाण प्रयत्न केला. त्याला बलात्कार या शबदाचा अर्थ मी कसा सांगू शकणार होतो.त्याला कोणत्या शब्दात मी बलत्कार या शब्दाचा अर्थ सांगू श्कत होतो? ज्या प्रश्नाचं उत्तरं आपल्याला दयायचं नसतं तेव्हा आपण तो प्रश्न सरळ टाळण्याचा प्रयत्न करत असतो.विषयातंर करण्याचा प्रयत्न करत असातो.तसचं केलं मी. दुसरं काय करू शकत होतो?
“जाऊ दे तुला करायचं त्याचं”
“असं काय बोलता बाबा? त्या मुलीचा खून केला त्यांनी.”
“अभ्यास सोडून तू हे काय डोक्यात घेतोस.किती वेळा सगितलं टी.व्ही पहात जाउ नकोस?”
“नाही, मी पेपरला वाचलं हे. शेजारच्या काकू पण म्हणत होत्या.”
“काय म्हणत होत्या?”
“मुलीवर बलात्कार केला त्यांनी. बाबा, मला एक सांगा. बलात्कार मुलीवरचं का होतात.” काही क्षण मी गप्पचं झालो. मला उत्तरचं नाहीतर काहीचं सुचतं नव्हतं. तो काही वेळ उभा राहीला.एक टक माझ्या चेह-याकडे. त्याचा तोच प्रश्न माझ्या तोंडात घोळत होता. हा त्याचा कीती निरागसपणे विचारलेला साधा प्रश्न होता पण त्याचं उत्तर किती कठीण होतं.हे उत्तर कोण देऊ शकणारं होतं? मी त्याच्या कडं रागानं पाहीलं. नेहमी जिद्रदीला पेटणारी स्वारी धूम पळाली.त्याची स्कूल बस आली होती.बसं वेळेवर आल्यामुळे माझी त्या प्रश्नातून तूर्त तरी सुटका झाली होती. तो लटकच हासत गेला. त्यानं बाय ही केलं पण मी त्यला बाय करायचं ही विसरलो. हाच प्रश्न तो मला पुन्हा विचारू शकतो.त्याला काय उत्त्र दयायचं? हा मोठा प्रश्न मला पडला होता.
हा प्रश्न एका निरागस मुलानं त्याच्या वडीलाला विचारलेला साधा प्रश्न नाहीये. प्रत्येक घ्रराघरातून विचारला जाणारा हा प्रश्न आहे.एका कोवळया उमलत्या पीढीने जून्या पीढाला केलेला हा प्रश्न आहे. प्रश्न साधा आसला तरी त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मेंदूचा पार भूगा झाला होता.या प्रश्नाचं उत्तर कुठं शोधायचं? धर्मशास्त्रात की तत्त्वज्ञानात? संस्कृतीत मध्ये की शिक्षणात? विज्ञानात की समाजशास्त्रात ? मानसशास्त्रात की इतिहासात? मुलीवरचं बलत्कार का होतात? हा प्रश्नं आपल्या संस्कृती,शिक्षणव्यवस्था,कायदेव्यवस्था,न्याय व्यवस्था व समाजव्यवस्थे समोर व प्रशासनव्यवस्थेपुढे मोठ प्रश्नचीन्हं उभ करणारा आहे.इतिहास कीती ही गौरवशाली व छाती फुगवीणरा आसला तरी या प्रश्नाचं सष्टीकरण इतिहास देऊ शकेल काय?
बस्सं झालं आता..!इतिहासाचा गर्व,संस्कृतीचे पोवाडे,मानवतावादाचे दिडोरे,संस्कार,नीतीमूल्यांचा बाजारगप्पा,शिक्षणव्य्वस्थ्ची पोपटपंची,समतेचे ढोल.. मानवतामूल्याची बक बक….कायदा व न्यायव्यावस्थेचे उदो..उदो… संरक्षण व्यवस्थेचे चांगभलं…..या देशात माणसूकीचा सातत्याने दारूण पराभव होतो आहे.वारंवार होतो आहे. या देशात कसली भंयकर विकृती जन्माला येत आहे. नकळत कळत ही विकृती पोसण्याचं काम ही या देशात होत आहे.दादा,,मामा,काका, चुलता, ही नात्याची स्टीकर चिकटवलेली राक्षस…. माणसं म्हणून फिरत आहेत. कोवळया,मुग्ध निरागस मुलीचं आयुष्यचं ओरबडून टकताहेत.त्याना नष्ट करताहेत.माणूस हा प्राणी आहे पंरतु इतका विकृत प्राणी दुसरा कोणताच नसेल. सामुहीक बलत्कार दुस-या प्राण्याच्या जगात नाही पहावयास मिळत. अशा माणसांना आपण रागाने पशू म्हणतो पण गँगरेप नाही करत पशू. असं क्रौर्य माणसातच पहावयास मीळते. ते क्रौर्य ही कल्पनेपलीकडचं. त्या मुली बरोबर जे केलं गेलं.,रचं त्याची कल्पना नाही करू शकत मी.
बरं घटना घडली. दुदैवानं च ते सारं घडलं. त्याचं ही भांडवल करायचं.त्यात ही जात धर्म पहात बसायचं. हैवानानां पुन्हा कसल्या धर्माच्या चौकटीत बसायचा प्रयत्न करायचा.प्रसार माध्यमाना बातमी मिळाली.त्यानां फक्त बातमी हवी आसते. झणझणीत बातम्या.. मेंदूत मुग्या आण-या बातम्यानं त्यांचा धंदा जोरात चलतो. वीरोधकांना आयतचं कोलीत मिळालं. धर्माच्या,जाती जातीच्या दवेषाग्नीत त्यांना तेल ओतता आलं.तो भडकवण्याचा चंग बांधला जाऊ शकतो. प्रश्न किती ही गंभीर असू दया.एकदा का राजकरणाच्या चीखलाल बुडाला की त्याचा चेंडू होतो.सारे जण त्याला खेळत बसतात. आपण कुणाच्या भावनांशी खेळतोय.माणसाची म्हणून जी काय मूल्यं आहेत ते पाय दळी तुडवीत अहोत याचं भान कुणालाचं राहत नाही.
अनेकदा झालं तसचं आता ही वातावरण तापलं गेलं.मोर्चे निघाले.सभा भरल्या,निदर्शने झाली. अनेक ठिकाणी नेहमी होतो तसाचं भावनांचा उद्रके झाला. आपल्या भाषेत राडा झाला. माणसातला पुन्हा माणूस जागा झाला.पुन्हा एकदा नेहमी सारख्याचं स्त्रीत्वासाठी मेणबत्तया पेटल्या….एक पणती चीमुरडीसाठी…. मन हळहळू लागली. त्या चिमुरडी साठी काळीज पाझरू लागली….पण फक्त एवढचं….
आश्या अनेक जागजागी घटना घडत आहेत. बातमी पूरतीचं माणसाची संवेदना टोकरून ओली केली जात आहे. ए-हवी ती कोरडी टाकचं होत आहे. आता घटना माणूसपणला काळीमा फासणारी आहे.विरोधकंन त्यांच राजकारण केलं. बलात्कराचं खापर त्यानी सरकारवर फोडलं. नेहमी सारखचं सरकार गेंडयाचं कातडं पांघरून बसलं. हू नाही. चू नाही….पक्षानी संघटनानी त्याचं राजकरण रंगवील. सामान्य माणसं रस्त्यावर आली. त्यांनी निषेघ केला. शिव्या दिल्या.शाप दिल्या.इतिहासाला,धर्माला, संस्कृतीला, इथल्या न्याय व्यवस्थेला. असंवेदनशलीलतेचा तो धीक्कार होता. यात सा-याचं राग खरा नसतो. अनेकांना तापल्या तव्यावर पोळी भाजायची आसते.
कायदयाच्या पळवाटा या देशात महामार्ग झाल्या आहेत.कायदयाचा धाक या देशात राहीला नाही. कायदा कधीचं दावणीला बांधला गेला आहे.इथल्या न्यायव्यवस्थेला कासवाचे पाय आहेत.धर्म,जाती, उपजातीत माणसाचं वर्गीकरण केलं जातं आहे. या देशाला इतिहास छाती फुगवीण्यासाठी,श्रेष्ठत्वाचे ढोल बाजवण्‍यासाठी वापरला जातोय. आपली जात हीच ओळख होऊ लागली आहे.आपल्या जातीच्या,धर्माच्या लोकांच्या चूकांचे समर्थनच केलं जात नाहीतर त्याचं उदात्त्करणं केलं जातं आहे.त्याची साजिक अवेलहना होण्या पेक्षा त्याचं कटटर म्हणून सन्मान केला जातोय.ही सर्वच धर्मात. जातीत मनोमिका संरचीत होत आहे. ते मानवतेच्या,लोकशाहीच्या मूल्यासाठी भंयकर आहे. त्य
स्त्रीच आईचं असते, स्त्रीच ताई असते.स्त्रीच बाये आणी सखी असते.स्त्रीचं शरीर हे फक्त सुंदर आणी मादकच नसतं तर मातृत्वाची कूस आणी वात्साल्याचं दूध देणारं ही असते.स्त्री देहाचा बाजार मांडणा-या या व्यवस्थेमध्ये आईचा मायेचा पदर, कळव णारं बहीणीचं ह्रदय… आसवं पुसणारे व पाठीवर अधार देणारे दोन हात बायको किंवा सखीचे ही असू शकतात.हे सारं बींवल पाहीजे. आपल्या अवती भवतीच्या वातावरणातून माणससाचं मन अकार घेत आसतं. स्त्रीला पण नवीन पीढी समोर कसे पेश करत अहोत यावरून पुरूषी मासिकता अकार घेणार असते. स्त्री ही उपभेग्य वस्तू नाही तर ताई, आई,माई, आसते. तीच आपली सखी आसते. ती आपली पेरणा आसते.नात्यातलं पावीत्रयांच्या आड गिकता नाही येउ शकतं. लेगीकता ही जरी नैर्गिक आसली तरी माणसू बनण्याच्या प्क्रिया मध्ये ती आडसर होणार नाही व माणसाच्या आतला सैतान वर डोक काढणारं नाही याची दक्षता घ्यावी लागणारं आहे.नराधम, पशू,राक्षस,हैवान,पाशवी असे संबोधन देऊन आपण माणसाच्या आतला क्रूर व विकृत प्राणी संपवू नाही शकतं.
पुन्हा एखादया चिमुरडीसाठी,स्त्रीत्वासाठी रस्त्यावर येऊन शिव्या दयायच्या,मेणबत्या पेटवायच्या की स्त्री समानतेसाठी दोन पावलं उचलायची.ते पण आपल्या घरापासून, आपल्या दारासून सुरू करावं लागेल. या पेटत्या मेणबत्या पुरूषी वासनेच्या नशेच्या धूंदीनं पसरत गेलेल्या अंधार दूर नक्कीच करू नाही शकतं. मातृत्वाच्या अंशासाठी….स्त्रीच्या वंशासाठी….किमान संवेदनशील मनाचं मीणमीणंत जळणं असेल.फक्तं मेणबत्या पेटवून नाही भागणारं….मशाली पेटाव्या लागतील.
परशुराम साेंडगे,पाटाेदा
952746358
prshuramsondge.wordpress.com

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users