आयटीवाल्यांचा भोंडला

Submitted by आदित्य सोनार on 16 April, 2018 - 12:16

वीकएंडला गोव्याला जाऊ का हो सर?
जाऊ का हो सर?
एक्स्ट्रा सुट्टी मिळणार का? मिळणार का?

प्रोजेक्ट डेव्हलप कर रे आधी, कर रे आधी.
मग जा सावकाश गोव्याला, गोव्याला.

प्रोजेक्ट डेव्हलप केला हो सर, केला हो सर,
आता तरी जाऊ का गोव्याला, गोव्याला?

युनिट टेस्टिंग कर रे राजा, कर रे राजा!
मग जा सावकाश गोव्याला, गोव्याला....

युनिट टेस्टिंग केलं हो सर, केलं हो सर.
आता तरी जाऊ का गोव्याला, गोव्याला?

डेटाबेसचा बॅकअप घे रे बाबा, घे रे बाबा.
मग जा सावकाश गोव्याला, गोव्याला...

डेटाबेसचा बॅकअप घेतला हो सर, घेतला हो सर
आता तरी जाऊ का गोव्याला, गोव्याला?

डिप्लॉयमेंट करून, जा रे बाळा, जा रे बाळा.
सावकाश जा हो गोव्याला, गोव्याला...

वीकेंडचा एन्ड झाला हो सर, झाला हो सर
आता कधी जाऊ मी गोव्याला, गोव्याला?

लाईव्हचे इशुस सोडव रे बेटा, सोडव रे बेटा..
मग जा सावकाश गोव्याला, गोव्याला...

लाईव्हचे इशुस सोडवले हो सर, सोडवले हो सर.
आता तरी जाऊ का गोव्याला, गोव्याला?

प्रोजेक्ट स्टेबल होऊ दे रे सोन्या, होऊ दे रे सोन्या
मग जा सावकाश गोव्याला, गोव्याला....

प्रोजेक्ट स्टेबल झाला हो सर, झाला हो सर..
आता तरी जाऊ का गोव्याला, गोव्याला?

आणली गाडी, लावली गाणी
सरच गेले गोव्याला, गोव्याला...

Group content visibility: 
Use group defaults

Mastach