प्रश्न

Submitted by पंढरी on 13 April, 2018 - 01:45

कसा सुटेल पोटाचा प्रश्न ?
कोण सोडवेल रोटीचा प्रश्न ?
स्पर्धा ही भाकरिच्या प्रश्नाची
कथा ही बेरोजगाराच्या चाकरिच्या प्रश्नाची
जीवाच्या आकांताने स्पर्धा चालली जीवनाच्या भविष्याशी खेळ हा चाललाय
शिक्षणाने प्रश्न संपतात असे म्हणतात ?
शिक्षणाच्या बाजाराने बेरोजगार झालेत पूरते हैरान
अन् डिग्य्राच्या कागदाने झालेत परेशान, सरकारी धोरणाच्या आश्वासनाचा पाऊस चालूच आहे अन् बेरोजगारांच्या डोळ्यातील आसवांचा पूर चालूच
आहे.
पोटाच्या प्रश्नाएवढा गंभिर प्रश्न दुसरा जगात नाही
भुकेनेच इतिहास हा घडविला,
आणि बेरोजगारीनेच जीवनाचा,
रस्ता हा अडविला. बापांच्या डोळ्यातील पाणी काही केल्या आटत नाही, आणि बेरोजगारीचा प्रश्न काही केल्या सुटत नाही ?
' कसा सुटेल पोटाचा प्रश्न ? . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users