हायकू

Submitted by अतुलअस्मिता on 18 March, 2018 - 07:38

"हायकू" हा एक प्राचीन असा जपानी काव्यप्रकार आहे. याची रचना तीन ओळी अन सतरा अक्षरात असते; या ओळी 5-7-5 अशा अक्षररचनेत शब्दबद्ध असतात.

एकमेकांशी निगडित पूरक पण विरोधाभास जाणवेल असा भिन्न विचारप्रवाह दर्शिवणाऱ्या अनुभवांमधून मी एक हायकू लिहिण्याचा प्रयत्न केलाय; तुम्हाला ही रचना आवडेल अशी मी आशा करतो. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

सर्व रसिक वाचकांना आज गुढीपाडवा निमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा!

************************

दिवे लागणी
लख्ख प्रकाश परी
अंधार मनी

मध्य प्रहरी
उष्म आस उरी
गार लहरी

तप्त वाळूनि
नयनी आर्द्र पाणी
ओली दिसे ती

ग्रीष्म संसारी
हास्य वदनी जरी
डोह पिंजारी

दूर जावूनि
वाट सरळ जुनी
शांत उभा मी

लाट ललाटी
समुद्र काठी खारी
गोड हसली

काळ फसूनि
चम चम चांदणी
तरली गाणी

*********†********************

©अतुल चौधरी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults