अस्तीत्व

Submitted by राजेंद्र देवी on 18 March, 2018 - 03:53

अस्तीत्व

कृपया विसरू नका मला
मी आणि माझे अस्तित्व

सतत झळकत राहण्याचा
असतो माझा प्रयत्न
कृपया विसरू नका मला
मी आणि माझे अस्तित्व

चार दोन ओळी खरडतो
त्याच त्याच शब्दांना मुरडतो
सोडत नाही मी माझा यत्न
विसरू नका माझे अस्तीत्व

दाद मिळता मी सुखावतो
साद न मिळता मी दुखावतो
यातच असतो दिवसभर व्यस्त
विसरू नका माझे अस्तीत्व

कधी मी रुसून बसतो
एकटाच कोपऱ्यात जाऊन बसतो
अबोला धरून करतो सर्वाना त्रस्त
विसरू नका मला, माझे अस्तीत्व

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users