वैद्यकीय क्षेत्रातील भोंदू
========
डॉ. सतीश चव्हाण व डॉ. अर्चना चव्हाण ह्या दांपत्याच्या भोंदूपणामुळे एका तरुण महिलेला जीव गमवावा लागल्याचे जे वृत्त आज आले आहे ते पाहून काही प्रश्न उभे राहतात.
मृत महिलेच्या छातीत गाठ असल्याने तिची शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला वरील डॉक्टरांच्या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले. त्यांनी शस्त्रक्रियेची वेळ रात्री आठ आहे असे सांगितले. नंतर ती वेळ बदलून त्यांनी रात्री नऊ किंवा रात्री दहा अशी ठरवली. हा बदल करण्याचे कारण त्यांनी असे दिले की रात्री आठला यमाची घंटा होती व महिला दगावू शकली असती. ही शस्त्रक्रिया पंचांग पाहून करण्यात आली होती.
शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढून टाकली खरी परंतु तरीही रक्तस्त्राव होतच राहिल्यामुळे ह्या महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तिला अती दक्षता विभागात ठेवण्यात आले. त्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत नसल्यामुळे डॉ. चव्हाण ह्यांनी चक्क एका मांत्रिकाला आय सी यू मध्ये आणले. हा मांत्रिक तिथे पोचू शकला ह्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन कुठल्या पातळीला पोचलेले आहे हे समजते.
ह्या मांत्रिकाने केलेले मंत्रोच्चार वगैरे काही काम करू शकले नाहीत. महिलेचे ह्या प्रकारात निधन झाले.
ह्या भयंकर प्रकाराने आपल्या समाजात मिरवल्या जाणार्या भ्रामक पुरोगामित्वाचा बुरखा फाडलेला आहे. महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारीमुळे अंनिसने ह्या प्रकरणात उडी घेतलेली आहे.
आजही अनेक शस्त्रक्रिया मुहुर्त पाहून होतात हे आधीच ऐकलेले होते.
१. डॉक्टरी पेशाचे शिक्षण देताना बुरसटलेले विचार बदलतील ह्याची दक्षता घेतली जाते का?
२. खासगी रुग्णालयांची विश्वासार्हता शाबूत राहील यासाठी असलेल्या यंत्रणांवर शासकीय वचक असतो का?
३. कोट्यावधी रुपये डोनेशन उकळून शिक्षण सम्राट ही पदवी मिरवणारे व एकगठ्ठा डॉक्टर्सचे उत्पादन करणारे ह्याला जबाबदार नाहीत का?
४. अशी आणखी काही भोंदूंची उदाहरणे कोणी पाहिली, अनुभवली आहेत का?
===========
-'बेफिकीर'!
सिम्बा ते "पाटणकर" आहे हे
सिम्बा ते "पाटणकर" आहे हे पुरेसे नाही का?
नाव पाटणकर आहे म्हणून
नाव पाटणकर आहे म्हणून सर्जरीचा पेशंट साध्या प्रसुतीगृहात न्यायचा का?
स्वतःचे प्रसुतीगृह असलेल्या प्रामाणिक डॉक्टरबाईंनी माझ्या मुलाच्या वेळेला कॉम्प्लिकेशन्स होती म्हणून सुपरस्पेशालिटी मध्ये डिलिवरी केली की जेणेकरुन जरुरत पडनेपर मा-बच्चा दोनोंको योग्य उपचार वेळ न घालवता मिळावे.
आरारा ह्यांचे टिनपाट प्रतिसाद
आरारा ह्यांचे टिनपाट प्रतिसाद अचूकपणे दर्शवतात की तमाम डॉक्टर स्मुहाचे त्यांना स्वयंघोषित प्रतिनिधी व्हायचे आहे जे जन्मात शक्य नाही.
मांत्रिकासारखा न दिसणारा मांत्रिक आय सी यू मध्ये घुसू शकतो तेव्हा डॉ. चव्हाण काय करत असतो? की तो डॉक्टर नसून तिसराच कोणी असतो? मग सकाळ नावाचे वृत्तपत्र तिसरेच का छापते? दाभोळकर का भडकतात? प्रकार पूर्णपणे वेगळाच आहे व डॉक्टरकडून पैसे उकळायचे होते म्हणून हे सगळे केले असे उद्या निदर्शनास आले तर जगताप नावाच्या मृताच्या भावावर कायदेशीर कारवाई होईल का?
भाजप चा इथे काय संबंध?
पाटणकरांच्या समोर दुकान
पाटणकरांच्या समोर दुकान टाकलंय. माझा पेशंट आज तिथे नेला, तर पुढच्या वेळी तो माझ्याकडे न येता तिकडेच जाईल की! कशाला बिचार्याच्या पोटापाण्याबद्दल उणीदुणी काढताहात? >>>>>> डॉ इब्लिस, मी हे अशासाठी लिहीले कारण इमर्जन्सी असतांना जवळचे हॉस्पिटल सोडुन लांब यातायात करण्यात काय पॉईंट होता तो मला कळेना.
माझ्या दृष्टीने रुग्णाचा जीव महत्वाचा, हॉस्पिटल नाही. तुम्ही काय म्हणताय ते लक्षात येतेय. पण हातचे सोडुन पळत्यामागे का या विचाराने मी पाटणकरांचा उल्लेख केला. यात कुठल्याही डॉक्टर वा हॉस्पिटलला मला कमी लेखायचे नाहीये.
रच्याकने. तुम्ही त्या एरियात राहता असे दिसते. या चव्हाण डॉक्टरांची नक्की डीग्री काय ते जरा शोधून सांगणार का इथे? म्हणजे ते कोणत्या पॅथीचे डॉक्टर आहेत ते जरा स्पष्ट होईल.>>>>>> मी भर पुण्यात रहात नाही. दुसरे असे की मध्यंतरी सरकारने इतर पॅथीवाल्यांना प्रसुती / ऑपरेशन करण्याचा अधिकार दिला हे मी वाचले होते. पण मला ते सर्रास चूकीचे वाटते. कारण जेणो काम तेणो थाय हेच खरे.
माझ्या मुलीला व मला स्वतःला पोटाचा त्रास होत होता तेव्हा काही दिवस मी आयुर्वेदाची औषधे घेतली. पण इमर्जन्सीत काहीच फरक पडत नाही हे दिसल्यावर ताबडतोक डॉ ( आयुर्वेद) बदलुन शेजारच्याच अॅलोपॅथीच्या डॉ कडुन औषधे घ्यायला सुरुवात केली. योग्य निदान होऊन मी आणी मुलगी दोन्ही ठीक आहोत.
रहाता राहीले उपरोधाचे. तुम्ही कळकळीने लिहीता हे मला ठाऊक आहे. कारण ज्याला कळकळ आहे तो दुसर्याचे वाईट कधीच चिंतीत नाही आणी करतही नाही.
पण जसे आयुर्वेदात भोंदू आहेत तसेच लाखात एक अॅलोपथीमध्ये सुद्धा वेडे आहेत. एका एम एस ची डिग्री घेतलेल्या प्रसिद्ध डॉ ने माझ्या वडिलांना ३ वर्षे अल्सर आहे असे चूकीचे निदान करुन सतत अल्सरवरील औषधे दिली. पण शेवटी आमच्या इथल्या एका डॉक्टरांनी, जे पुण्याच्या के इ एम मध्ये सर्जरी शिकत होते, त्यांनी त्यांच्या सरांकडुन माझ्या वडलांची तपासणी करवुन घेतली तेव्हा माझ्या बाबांना पित्ताशयाचे खडे व अॅपेंडिक्स चे निदान झाले. व के इ एम मध्येच ऑपरेशन झाले.
आता या डॉक ने , जो माझ्या बाबांना अल्सर सांगुन चूकीची औषधे देत होता, आणी स्वतः सोनोग्राफी करत होता, असे का करावे? जर सोनोग्राफी नीट करता आली नाही, त्यातले शिक्षण झालेले नाही तर रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार का? हे डॉक्टर नासिकचे तर पुण्यात ऑपरेशन करण्या आधी जिथे सोनोग्राफी केली ते नामवंत तज्ञ आहेत, डॉ रहाळकर आणी डॉ किर्तने हे दोघे सोनोग्राफी (MD ) आहेत. ते माझ्या बाबांनाच म्हणाले की कुठल्या गाढवाने तुम्हाला अल्सर आहे असे सांगीतले? आणी दुसरे म्हणजे अपेंडिक्स पण सडले होते हे डॉ ( के इ एम ) ना ऑपरेशन करतांना आढळले. जर आणखी उशिर झाला असता तर वडिलांच्या जीवावर बेतले असते असे डॉ स्वतःच म्हणाले.
तिसरे म्हणजे डॉक्टरला जात धर्म नसतो हे माझे म्हणणे आहे, दुसर्याचे काहीही म्हणणे असो. कारण ज्याने चूकीचे निदान करुन ट्रिटमेंट दिली तो माझ्याच ब्राह्मण जातीचा व ज्यांनी योग्य निदान करुन सोनोग्राफी केली ते आणी ऑपरेशन केले ते ब्राह्मणच. मग जात बाजूलाच राहीली.
चौथे :- या चव्हाण डॉ ना आय सी यु मध्ये जाता आले म्हणजे तिथे ओळख असलीच पाहीजे, नाहीतर तिथे मांत्रिक कुठुन घुसला?
माझी पूर्ण पोस्ट नीट वाचा, कृपयाच.
डॉचव्हान्ण , पवारांचा सकाळ
डॉचव्हान्ण , पवारांचा सकाळ म्हणजे बॉल् योग्य त्या गोल पोस्टकडे चालला आहे
डॉचव्हान्ण , पवारांचा सकाळ
द्विरुक्त
त्या बिचाऱ्या पाटणकरांकडे IcU
त्या बिचाऱ्या पाटणकरांकडे IcU ची सोय नाहीये हो,>>>>> सिंबा हे मला माहीत नव्हते. कारण हॉस्पिटल एकदाच बघीतले आहे.
सिम्बा ते "पाटणकर" आहे हे पुरेसे नाही का? Wink>>>>> दत्तु, सगळे तुमच्या सारखे विचार करणारे नसतात हो.
बहुधा पेशन्टच्या नातेवाइकानी
बहुधा पेशन्टच्या नातेवाइकानी मान्त्रिकाचा उपचार करायचे ठरवले असावे अणि डोक्टरने हरकत घेतली नसावी. आणि नर्सनेहीबहुतेल्क. कारण विडिओत फार काही मोठा विधी नाही दिसत. रिग्णाला स्पर्श न करता दृष्ट काढल्यासारख्या हालचाली आहेत एखाध्या मिनिटाच्या.
बहुधा पेशन्टच्या नातेवाइकानी
बहुधा पेशन्टच्या नातेवाइकानी मान्त्रिकाचा उपचार करायचे ठरवले असावे अणि डोक्टरने हरकत घेतली नसावी. आणि नर्सनेहीबहुतेल्क. कारण विडिओत फार काही मोठा विधी नाही दिसत. रिग्णाला स्पर्श न करता दृष्ट काढल्यासारख्या हालचाली आहेत एखाध्या मिनिटाच्या.
या निमीत्ताने सर्व
या निमीत्ताने सर्व हॉस्पिटलांमध्ये अं.नि. कायदा होईल. ज्याच्या अन्वये हॉस्पिटल मध्ये कोणत्याही धर्माची आणि कोणत्याही प्रकारची धार्मिक अॅक्टिव्हिटी किंवा विधी केलेले चालणार नाहीत आणी संमती देणारे/इनिशिएट करणारे डॉ आणि संमती देणारे/इनिशिएट करणारे पेशंट यांच्यावर कारवाई होईल.
या प्रकारात मांत्रिक प्रकरण उघडकीला आलं हे चांगलं झालं.
प्रत्येक वाईट घटना त्यावरुन धडा घेऊन कायद्यात, सिस्टम्स मध्ये नवा बदल करणं अपेक्षित असतं.के एल एम फ्लाईट च्या अपघातानंतर ५८३ लोक गेल्यानंतर एव्हिएशन इंडस्ट्रीतले कम्युनिकेशन, वापरलेले शब्द, त्यांचे सर्वांना अपेक्षित असलेले अर्थ अधिक नि:संदिग्ध केले गेले.
माझ्यासारखे नाही पण
माझ्यासारखे नाही पण शुक्राचार्यांच्या विचाराच्या लोकांना फक्त आडनाव पुरेसे असते
अनु, तुमचे सगळे प्रतिसाद
अनु, तुमचे सगळे प्रतिसाद आवडले
मागवा आणखी
मागवा आणखी दार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रुरू ......
या निमीत्ताने सर्व
या निमीत्ताने सर्व हॉस्पिटलांमध्ये अं.नि. कायदा होईल.
<<
अनुताई, अंनि कायदा हॉस्पिटलांमधे नाही, देशात सरकारने करायचा असतो. या प्रपोज्ड कायद्याला जीवापाड विरोध करणारे लोक भाजप नामक पक्षाचे आहेत, व त्यांचे सरकार आहे. तेव्हा ये मुंगेरिलाल का हसीन सपना सध्या भूल जाओ.
भाजपा कुठून आला विचारणार्यांसाठी :
मूळ धाग्यात "यंत्रणांवर शासकीय वचक असतो का?" असा शहाजोग प्रश्न आहे, शासन ज्यांचे आहे त्यांच्याबद्दल व त्यांच्या ध्येयधोरणांबद्दल टिप्पणी येणे स्वाभाविक आहे. नैका?
मला प्रत्येक हॉस्पिटल च्या
मला प्रत्येक हॉस्पिटल च्या 'पॉलीसीज' मध्ये बदल होईल असं म्हणायचं होतं. कायदा हा शब्द चुकून आला.
(कंपन्या त्यांना आलेल्या अनुभवांप्रमाणे एच आर पॉलीसीज बनवतात त्याप्रमाणे).
यावर "युएनके" चा सर्वे काय
यावर "युएनके" चा सर्वे काय म्हणतोय? कधी येणार रीपोर्ट?
नातेवाईकांनी मांत्रिकाला
नातेवाईकांनी मांत्रिकाला बोलावण्याची देखील शक्यता आहे. अनेकदा डॉ पेशंट किंवा त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या धार्मिक उपायांना विरोध करत नाहीत. आता पेशंट दगावला म्हनून मांत्रिकाचे खापर डॉ वर फोडण्याची शक्यता देखील आहे.
पेशंट व त्यांच्या नातेवाईकांकडून अनेक विधी हॉस्पीटलमध्ये राजेरोसपणे किंवा लपूनछपून होत असतात, जसे
१. बाळ जन्मल्यावर डॉ पासुन लपवून मध-सोने चाटवणे.
२. बाळाच्या उशाशी चाकू ठेवणे.
३. पेशंटच्या उशाशी अंगारा, देवावर वाहिलेली फुले ठेवणे.
४. डॉ ने काही खाऊ नये असे सांगितले असतानाही देवाचा प्रसाद म्हणून पेढा भरवणे, तीर्थ पाजणे. यात तीर्थ वगैरेतुन इन्फेक्शन झाले तर डॉ ला कळणारही नाही की काहीही न खाता पेशंटला फुड इन्फेक्शन झाले कसे. पेशंट सिरीयस झाला की बदडा डॉक्टरला.
५. डिस्चार्ज झाल्यावर हॉस्पीटलच्या दारातच नारळ वगैरे ओवाळून टाकणे.
येथे मंत्रोपचाराने इलाज
येथे मंत्रोपचाराने इलाज केल्या जात नाही.. आशा पाट्या लावाव्या लागणार आहेत आता
येथे मंत्रोपचाराने इलाज
येथे मंत्रोपचाराने इलाज केल्या जात नाही.. आशा पाट्या लावाव्या लागणार आहेत आता>>>>> हो, ते पुणं आहे, त्यामुळे पाटी मस्ट आहे.
पुणेकरांनो, पाट्या टाकणे
पुणेकरांनो, पाट्या टाकणे थांबवा (हे लेखकास उद्देशुन नाही याची नोंद घ्यावी)
आपला जवळचा नातेवाईक (आई बाबा
आपला जवळचा नातेवाईक (आई बाबा बायको मुले ई. ई.) डेथ बेड वर असताना कसले बुरसटलेले आणि आधुनिक विचार घेऊन बसलायत! by hook or by crook माझा माणूस मला जिवंत हवा. मग त्याच्यासाठी कोंबड कुत्र का कपायला लागेना, अहो ज्याची जळते त्यालाच कळते. राहिला प्रश्न मीडीया चा तर मीडीया प्रत्येक बातमी टीआरपी च्या हिशोबानेच लिहिते / दाखवते.
>>>>भाजपा कुठून आला विचारणार्
>>>>भाजपा कुठून आला विचारणार्यांसाठी :
मूळ धाग्यात "यंत्रणांवर शासकीय वचक असतो का?" असा शहाजोग प्रश्न आहे, शासन ज्यांचे आहे त्यांच्याबद्दल व त्यांच्या ध्येयधोरणांबद्दल टिप्पणी येणे स्वाभाविक आहे. नैका?<<<<
प्रतिसादाचा टोन संयत झाला ही तुमच्यातील एक चांगली सुधारणा म्हणावी लागेल. अभिनंदन!
अंनिस ही संघटना २०१४ नंतर स्थापन झालेली असून ती ह्या विशिष्ट घटनेनंतर अतीव अॅक्टिव्ह झाली आहे असे आपले मत आहे का? ही संघटना स्थापन व्हायची गरजच पडू नये ह्यासाठी ज्या सरकारच्या कार्यकाळात ती स्थापन झाली त्यांनी काय काय केले ह्याची काही यादी आणि त्या यादीचे परिणाम वगैरेचा डेटा आहे का?
एक सर्जन मांत्रिकाला आय सी यू मध्ये कधीच आणत नाही / येऊ देत नाही / आलेला पाहून शांत राहत नाही / नाहीतर तो सर्जन नसतोच / हे सगळे त्याला फसवायला चाललेले आहे / त्या मांत्रिकाने रुग्णाला स्पर्श न करता फक्त अर्ध्या मिनिटात काहीतरी केले / व्हिडिओ खोटा आहे / त्या सर्जनचे, रुग्णाचे व रुग्णाच्या भावाचे नांव ते नव्हतेच / हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे हे होऊ शकले / आमचे सरकार असते तर आत्तापर्यंत मृत रुग्ण उठून मॉर्निंग वॉकला जाऊन येताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे पाहून खदाखदा हासला असता ह्याव्यतिरिक्त व घडलेल्या घटनेवर काही म्हणायचे आहे का?
मुळात डॉक्टर म्हणजे अमानवीय
मुळात डॉक्टर म्हणजे अमानवीय शक्तीवर विश्वास न ठेवणारच असावा असा रुल आहे का?
@ नवीन Submitted by बेफ़िकीर
@ नवीन Submitted by बेफ़िकीर on 15 March, 2018 - 20:04
<<
तुमच्या मद्दड कॉमेंट्सना उत्तर देणं मी बंद केलं आहे, हे तुमच्या आधीच्या प्रतिसादानंतर तुमच्या लक्षात आलं नाही का?
मी तुम्हाला वैयक्तिक प्रतिसाद दिलेला नाही, तेव्हा माझ्या टोनबद्दल वा माझ्याबद्दल टिप्पणी करू नका. मला फाऽर लडिवाळपणेही बोलता येते
अन हो. "जन्मात शक्य नाही" म्हणजे कुणाच्या जन्मात?
आरारा,
आरारा,
तुमच्या ह्या
नवीन Submitted by आ.रा.रा. on 15 March, 2018 - 21:15
प्रतिसादात धाग्याबाबत काहीच नसल्याने नम्र दुर्लक्ष
बेफी इतरांना बोलण्याऐवजी
बेफी इतरांना बोलण्याऐवजी स्वतःमध्ये काही सुधारणा करायचे बघा. तेच तेच प्रकार करून कंटाळा कसा येत नाही?
तुम्ही विचारलेले प्रश्न योग्य
तुम्ही विचारलेले प्रश्न योग्य आहेत. डॉक्टरी पेशाचे शिक्षण देताना बुरसटलेले विचार बदलतील ह्याची दक्षता घ्यायला शिक्षणक्रमात वेळ नसावा.
त्या दोघा डॉक्टराना रुग्णालयांची विश्वासार्हता आपल्या भोंदू वर्तनाने शाबूत राहाणार नाही हे समजण्याएव्हढी अक्कल नसावी. तसेच एका हॉस्पीटलात ज्याचा रुग्णाशी काहीही संबंध नाही ति व्यक्ती तिथे कशी येऊ शकते. याचा अर्थ हे दोन्ही डॉकतर मांत्रिक-तान्त्रीकावर विश्वास ठेवणारे आहेत किंवा त्याना आपली शस्त्रक्रियेतील चूक झाकायची होती.
शिक्षण-सम्राट लोक फक्त आपले मिळालेले कोट्यावधी रुपये कसे इतरत्र गुंतवायचे याचाच विचार करतात त्याना देशाशी काही कर्तव्य नसते आणि आपल्या कॉलेजातुन शिकलेल्या विद्यर्थ्याशी तर नसतेच नसते.
दरम्यान, मांत्रिक येरवडेकर
दरम्यान, मांत्रिक येरवडेकर स्वतःच्या घरातच बसून होता पण 40 तासांनी त्याला पकडले. महाराष्ट्र नरबळी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावर आणि डॉक्टरवर.
डॉक्टर अजून बेपत्ताच आहे.
दोघांना अद्दल घडावी. हा मांत्रिक खरा पौरोहित्य करणारा इसम आहे. पोटासाठी तो कधीच म्हणणार नाही की मंत्रोच्चार आणि मांत्रिकी उपचार निरर्थक असतात. पण आता चांगला अडकलाय. ह्याला मांत्रिकी जादूटोणा करून स्वतःला निरपराध सिद्ध करता येते का बघू.
बेफ़ि, तुमच्या लेखाशी सहमत.
बेफ़ि, तुमच्या लेखाशी सहमत. दीनानाथ हॉस्पिटल बद्दल एक समोर घडलेला किस्सा आहे. accident मध्ये मृत झालेल्या रुग्णावर आय सी यु मध्ये उपचार करण्याचा मोठेपणा इथल्या डॉक्टरांकडे आहे. बाकी जास्त काही न बोलणे चांगलं.
Pages