निरगाठ प्रत्यक्षाची....

Submitted by अनन्त्_यात्री on 10 March, 2018 - 22:51

दिशा, मिति, कालगति
कसे ठरती निरर्थ?
स्थिर, अविनाशी ऐसे
शोधू कासया मी व्यर्थ?

कार्य-कारण नियम
थिटा पडतो कशाने?
निरगाठ प्रत्यक्षाची
का न सुटते प्रज्ञेने?

अंध:कार भोवताली
कधी प्रकाश दिसेल?
श्रांत-क्लांत जिज्ञासेला
कधी उत्तर मिळेल?

गुंता गहन, कठिण
कधी सुटेल की नाही?
बाहेरचे ओलांडून
आतमध्ये आता पाही !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गुंता गहन, कठिण
कधी सुटेल की नाही?
बाहेरचे ओलांडून
आतमध्ये आता पाही ! >> खरंय....

सुरेखच...