झुंडशाहीचा उन्माद..?

Submitted by अँड. हरिदास on 9 March, 2018 - 06:43

lenin.jpg

झुंडशाहीचा उन्माद..?
इतिहासाकडे निकोप दृष्टीने पाहू शकणारा समाजाचं प्रगतपणाचे बिरुद मिरवू शकतो. मात्र आपल्या देशात प्रतिमा आणि प्रतिकांवरून होणारे अस्मितेचे राजकारण बघितले तर, अद्यापही आपल्याकडे तसे इतिहासभान निर्माण झाले नसल्याची प्रचिती येते. आपल्या समाजाभिमुख विचारांनी आणि लोककल्याणकारी कार्यानी माणसाचे महामानव झालेल्या महापुरुषांचे पुतळे देशात उभारण्यात आले. लोकहितासाठी झटणाऱ्या या महापुरुषांच्या स्मृती कायम स्मरणात ठेवून त्यांचे विचार जतन केले जावेत, नव्या पिढयांना त्यांच्या कार्यातून, विचारातून प्रेरणा घेता यावी, यासाठी हा खटाटोप असावा. मात्र, महापुरुषांच्या विचारांचे जतन करून त्यावर अमल करणे कदाचित राजकारणात अडचणीचे ठरत असावे. म्हणूनच विचारांचे सोडून लोकभावनेला हात घालणाऱ्या अस्मितेचे राजकारण मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. वास्तविक, इतिहासात ज्या घटना घडल्या किंव्हा महापुरुष होऊन गेले, ते आज इतिहासजमा झाले आहेत. फक्त त्यांचे कार्य आणि विचार लोकांच्या मनात जिवंत आहेत. त्यामुळे या इतिहासाकडे निकोप दृष्टीने बघायला हवे. परंतु हा सामंजश्यपणा न दाखविता एकमेकांच्या आदर्शाचे तुकडे करण्याचे राजकारण सध्या खेळले जात आहे. त्रिपुरा मेघालय नागालॅण्ड मध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर त्रिपुरातील लेनिन यांच्या पुतळ्याची बुलडोझर लावून तोडफॊड करण्यात आली. त्यानंतर वेल्लोरमधील पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली. जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून ते महात्मा गांधीपर्यंतच्या पुतळ्यांना लक्ष केल्या गेले. देशभरात सुरु झालेलं पुतळा विटम्बनांनच सत्र निश्चितच भारतासारख्या देशाला शोभनीय नाही. लोकशाही मार्गाने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष उन्मादात रूपांतरित होणे, आणि त्यातून इतरांची प्रतीके तोडून फोडून टाकण्याची मानसिकता निर्माण होणे, ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

एकाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची फोडतोड करून त्याचे विचार किंव्हा अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे अल्पमतीचंच लक्षण म्हटलं पाहिजे. कारण आजवर जो विचार दाबण्याचा किंव्हा संपविण्याचा प्रयत्न केला गेला, तो विचार अधिक वेगाने उफाळून वर आल्याचा इतिहास आहे. मात्र झुंडशाहीच्या प्रवृत्तीला कदाचित हे सत्य मान्य नसावे. त्यामुळेच अशा घटना सातत्याने घडत आहेत. ईशान्येकडील त्रिपुरा मेघालय आदी राज्यात दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा भारतीय जनता पक्षाने पराभव करून तेथील सत्ता हस्तगत केली. त्यामुळे भाजपात चैतन्य व उन्माद दोन्हीही उफाळून आले. याच उन्मादाच्या भरात काही झुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी बेलोनियामध्ये ११.५ फूट उंचीचा शोध परिणाम व्लादिमिर लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला. मंगळवारीही लेनिनच्या एका पुतळ्याची तोडफोड झाली. माकप आणि भाजप कार्यकर्ते एकेमकांसमोर येऊन हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. घटनेचे प्रतिसाद दूरवर जाऊन पोहचले तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई. व्ही. रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली.कोलकात्यातील कालीघाटमध्ये जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासले गेले. महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांनाही लक्ष करण्यात आले. देशात पुतळे पाडापाडीचे सत्र रंगले असताना काही नेत्यांनी आपल्या संकुचितपणाचे दर्शन घडवीत या कृत्यांचे समर्थन करून आपली बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध केली. तर काहींनी समाजमाध्यमातून आपल्या संकुचितपणचे दर्शन घडविले.

पुतळ्यांची मोडतोड करून त्यांची विटम्बना करत लोकभावनेला हात घालून दंग्याधोप्याचे राजकारण करणे, हे आपल्या देशासाठी नवीन नाही. आजवर अनेकवेळा असे कुकृत्य करण्यात आले आहे. आता राजकीय द्वेष व्यक्त करण्यासाठी हे फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत असावे. मात्र राज्यकर्ते बदलले कि आधीच्या सत्ताधाऱ्यांची प्रतीके मोडून टाकण्याची ही मानसिकता भारतासारख्या लोकशाही वादी देशाला परवडणारी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आल्यानंतर लेनिन आपल्या देशाचा नाही, रशियातही त्यांचे पुतळे नस्तेनाबूत करण्यात आले होते, मग भारतात लेनिनच्या पुतळ्याचे काय काम? असा युक्तिवाद केला जातोय. परंतु हे संकुचितपणचे लक्षण म्हटले पाहिजे. लेनिन यांनी एका काळात श्रमिकांच्या हितासाठी तत्वज्ञान मांडले होते. त्यातूनच लाल क्रांती चा उदय झाला आणि रशियात सत्तांतर झाले. रशिया महासत्ता म्हणून उदयास येणासही लेनिन यांचाच विचार बहुतांशी कारणीभूत ठरला. भारतावरही साम्यवादी विचारांचा मोठा पगडा राहिला आहे. देशाने साम्यवाद स्वीकारला नसला तरी अनेक नेत्यांच्या विचारातून साम्यवादी विचारांचे मिश्रण दिसून आले आहे. शिवाय लेनिन यांना मानणारा एक मोठा वर्गही आज देशात आणि जगात आहे. त्यामुळे एक पुतळा फोडल्याने लेनिन यांचा विचार संपेल, असे समजणे भाबडेपणाच म्हणावा लागेल.

जिवंत माणसांनां मारल्यावर तुम्ही काही बोलत नाही, पण निर्जीव पुतळा पडल्यावर एवढा विरोध का ? असा प्रश्न आता काही जण उपस्थित करत आहेत. त्रिपुरा केरळ आदी भागात संघ कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्यांच्या प्राश्वभूमीवर हा सवाल विचारण्यात येत असावा. त्रिपुरा भागात झालेल्या संघ कार्यकर्त्यांच्या हत्या निंदनीयच आहे. मात्र त्यामुळे झुंडशाहीच्या या राजकारणाचं समर्थन करता येणार नाही. शिवाय लेनिन यांचा पुतळा पडल्यानंतर संपूर्ण जगात पुन्हा एकदा लेनिन चर्चेत आला आहे. त्याचे विचार नव्याने वाचले आणि ऐकले जाऊ लागले आहेत. त्यामुळे पुतळे पाडापाडीच्या राजकारणात कुणी काय साध्य केलं? हा आत्मचिंतनचा विषय होऊ शकतो. मुळात, झुंडांची प्रवृत्ती विद्वेषाचे बीज रोवत असते, त्यामुळे ती डाव्यात असो कि उजव्यात कायम निषेधाहार्यच आहे. म्हणून या प्रकारचा लोकशाही मार्गाने निषेध नोंदविणे गरजेचे ठरते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर पंतप्रधान , गृहमंत्री यांचे मौन बाळगणे हे संतापजनक आणि खेदजनक होते. मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावरच मोदीं आणि अमित शाह यांनी ट्वीट केले हे त्यांची कोती विचारसरणी दाखवतो. ह्या उन्मादी झुंडांना सतत उन्माद पुरवता आला नाही तर ते शासकावरच उलटतात हे ध्यानात असु द्यावे.

लेनिनचा पुतळा पाडल्याचा ज्यांना आज पुळका आलाय त्यांचा महाराष्ट्रातील दादोजी कोंडदेव, राम गणेश गडकरी, रायगडावरचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा व अंदमान सेल्युलर जेल मधील वीर सावरकरांचा पुतळा व तिथला फलक ज्यावेळी काढून टाकला त्यावेळी यांसर्वांची वाचा बसली होती.

यावेळी निवडणुकीत निवडणुक आयोगाने VVPAT मशीन वापरल्याने, निवडणुकीतील पराभवाचे खापर ईव्हीएम वर फोडता आले नाही मग अन्य समाजकंटकांनी तोडलेल्या लेनीनच्या पुतळ्याच्या निमित्त्ताने त्याचे खापर भाजपावर फोडून विरोधकांनी काही काळ मिडीयात चमकोगिरी करायचा त्यांचा छंद पुरवून घेतला.

व आता कोण कुठला लेनिन ज्याचा भारताशी कुठलाही संबध नसलेल्या क्रुरकर्म्याचा पुतळा, २५ वर्षे कम्युनिस्ट राजवटीच्या जुलमी व अत्याचारी राजवटी खाली भरडून निघालेल्या त्रिपुरी जनतेने मोठ्या उत्सुर्फत पणे पाडला तर त्याचा शोक करत आहेत.

याच त्रिपुरात भाजपाला मतदान केले म्हणून एका सुनेला तीच्या सासर्‍यांने ठार मारले त्या घटनेची व गेल्या वर्षे-सहामहिन्यात संघाच्या व भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या कम्युनिस्टानी केल्या या घटनांची दखल मात्र फुरोगामी, डावे व तथाकथित विचारवंताना अजिबात घ्यावीशी वाटली नाही.

पुतळे पाडले जात आहेत हे बरेच आहे.. फक्त सगळीकडचे सगळेच पुतळे पाडावेत.. सगळेच दयनीय झाले आहेत.. ईतके की अलिकडे कावळे पण फिरकेनासे झालेत. ऊगाच लोकशाही वगैरे कंठशोष कशाला? त्याची चिंता करू नये, ती ऊत्तम सुरू आहे.

विठ्ठल ,माझ्या मते मौन , पेरियार यांचा पुतळा पाडल्यावर सुटले.
कारण ते महागात पडू शकतं.

{यावेळी निवडणुकीत निवडणुक आयोगाने VVPAT मशीन वापरल्याने, निवडणुकीतील पराभवाचे खापर ईव्हीएम वर फोडता आले नाही मग अन्य समाजकंटकांनी तोडलेल्या लेनीनच्या पुतळ्याच्या निमित्त्ताने त्याचे खापर भाजपावर फोडून विरोधकांनी काही काळ मिडीयात चमकोगिरी करायचा त्यांचा छंद पुरवून घेतला.

व आता कोण कुठला लेनिन ज्याचा भारताशी कुठलाही संबध नसलेल्या क्रुरकर्म्याचा पुतळा, २५ वर्षे कम्युनिस्ट राजवटीच्या जुलमी व अत्याचारी राजवटी खाली भरडून निघालेल्या त्रिपुरी जनतेने मोठ्या उत्सुर्फत पणे पाडला तर त्याचा शोक करत आहेत.}

अहो, एक काय ते ठरवा. समाजकंटक की आन्यायमुक्त झालेली जनता?
बाकी भाजप प्रवक्तेही हेच करताहेत, तर तुम्ही वेगळं काय करणार?

१. परदेशी व्यक्तीचा पुतळा भारतात कशाला हवा? त्याचं भारतासाठी योगदान काय?
२. लेनिन मास मर्डरर होता. त्याने लाखो लोकांची हत्या केली. (तुलना सद्दाम हुसेन, हिटलर)
३. जिथे जिथे कम्युनिक्झमचा पराभव झाला तिथे तिथे हे पुतळा फोडो प्रकरण जनताच करते.
४. त्रिपुरातली कम्युनिस्टांची जुलमी राजवट संपली म्हणून जनतेने उत्स्फूर्तप्णे केलेली कृती (जेसीबी मशीन आणून)
५. तो पुतळा खासगी जागेत, खासगी लोकांनी उभारलेला. त्यांनीच तो हटवला.
६. आमचं पुतळ्यांच्या तोडफोडीला समर्थन नाही. (पण राम माधव पुतळा हटवला जात असल्याचं उत्साहात ट्वीट करून मग ती ट्वीट हटवतात.
७. कम्युनिस्टांनी याआधी इंदिरा-राजीव यांचे पुतळे फोडलेत, त्यांची छायाचित्रे सरकारी कार्यालयांतून हटवलीत.
८. राज्यपाल म्हणतात की एका सरकारचं कृत्य, लोकशाही मार्गाने आलेलं दुसरं सरकार undo करू शकतं. म्हणजे राज्यपालांच्या मते हे नव्या सत्ताधार्‍यांचंच काम आहे.
९. कायदा सुव्यवस्था : हे पहा, अजून आमच्या पक्षाचं सरकार आलेलं नाही, शपथविधी झालेला नाही.
बरं पण राज्यपाल.....
आता राज्यपालांनी रस्त्यावर उतरून पुतळा तोडणार्‍यांना रोखायला हवं का?
१०. भाजपचे एक राष्ट्रीय पातळीवरचे पदाधिकारी , आता पाळी पेरियार पुतळ्याची, असं ट्वीट करतात. तामिळनाडूत ते प्रत्यक्षात उतरल्यावर ट्वीट डिलीट करतात. वर माझ्या अकाउंटच्या अ‍ॅडमिनने मला न सांगता ते ट्वीट केलं असं सांगतात. पक्ष त्यांचं हे म्हणणं मान्य करतो.
११. तामिळनाडूत जे घडलं ते महागात पडेल म्हणून मोदी-राजनाथ-शहा मौनातून बाहेर येतात.
१२. प.बंगालमध्ये शामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना होते.
१३. उत्तर प्रदेशात डॉ आंबेडकरांच्या एकाहून अधिक पुतळ्यांना जमीनदोस्त केलं जातं.
१४. केरळमध्ये गांधी पुतळ्याचा चष्मा तोडला जातो.
१५. भांडारकर, राम गणेश गडकरी, दादोजी कोंडदेव यांच्यावेळी तुम्ही कुठे होतात? हा चिरंतन प्रश्न येतो.

वरचे १-९ हे मुद्दे भाजपचा प्रवक्ता एकाच डिबेटमध्ये मांडतो. तो हेही म्हणतो की आता रशियातच लेनिनला कोणी विचारत नाही. लेनिनचं शेतकरी आणि कामगारांचं peasants and workers युग संपलं.
This is Modi era, there are no peasants and workers now. (Means all are equal; whatever it means)

त्रिपुरात 25 वर्ष राजेशाही होती निवडणूक होत नव्हत्या आणि नरेंद्र मोदीने स्वातंत्र्यासाठी लढा दिला पहिल्यांदाच निवडणूक लढल्या गेल्या असा दावा आयटीसेल वर पोसलेल्या भक्तांनी केला की करमणूक होते

पुतळे तोडणाऱ्यांचा निषेध. असा विजय साजरा करणे आवडले नाही. पण हे काम काही कमी बुद्धी वाल्या लोकांचं असावं. कोणताही पक्ष असा प्रकार घडवून आणणार नाही

नवीन Submitted by अनिरुध्द.. on 9 March, 2018 - 18:४०<<
>> झुंडशाही कोणाचीही असो त्याच्च निषेध नोंदविला गेलाच पाहिजे.. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळा विटम्बना चाही निषेद नोंदविण्यात आला आहे.

आता कोण कुठला लेनिन ज्याचा भारताशी कुठलाही संबध नसलेल्या क्रुरकर्म्याचा पुतळा, २५ वर्षे कम्युनिस्ट राजवटीच्या जुलमी व अत्याचारी राजवटी खाली भरडून निघालेल्या त्रिपुरी जनतेने मोठ्या उत्सुर्फत पणे पाडला तर त्याचा शोक करत आहेत.<<
>> हा शोक नाही निषेध आहे.. कोण कुठला लेनिन काय म्हणताय..अहो लेनिन म्हणजे डाव्या विचारसरणीचा नेता होता. म्हणून तर त्याचा पुतळा बांधला ना. आणि आजही लेनिन याना मानणारा एक मोठा वर्ग देशात आहे. या निवडणुकीत तो हरला असेल पण त्यांचाही सन्मान ठेवायला नको का.
'सब का साथ सब का विकास' या घोषणेचा अर्थ तोच आहे ना ???

पुतळे तोडणार्यांचा त्रिवार निषेध. पुन्हा एकदा राग आला. पण आता वाईट अथवा विशेष वाटायचं बंद झालंय...दादोजी कोंडदेव झाले, राम गणेश गडकरीही झाले, बाबासाहेबांच्या पुतळ्यांची तर बरेच वेळा विटंबना झालीये, आता लेनिन व पेरियार झाले. हे सगळे फोडाफोडी करणारे लोक्स म्हणजे बामियानचे पुतळे फोडणार्या तालिबानींसारखेच आहेत. एका माळेचे मणी.

सर्व पुतळे हे पडण्यासाठीच बनतात, सर्व राज्य ,राजवंश हे कालौघात नष्ट होण्यासाठी जन्माला येतात हे च शाश्वत सत्य आहे आणि असणार.

<<<<सगळे फोडाफोडी करणारे लोक्स म्हणजे बामियानचे पुतळे फोडणार्या तालिबानींसारखेच >>>>
जगात बरेच लोक केवळ तोड्मोड, फोडाफोड, आगी लावणे, विध्वंस करणे एव्हड्याच साठी जन्माला येतात.
बरं, त्यांना सांगितलेले समजण्या इतकीहि अक्कल नसते, काय करणार
त्यांना पक्ष, विचारसरणी इ. काहीहि कळत नाही. त्याची त्यांना पर्वाच नाही. पैसे द्या नि काय फोडायचे ते सांगा.

आणि भारतात उदंड लोकसंख्या असल्याने असले लोकहि उदंड आहेत.

मग राजकारणी लोकांचे फावते.

जगभरात असेच!
इकडे अमेरिकन लोक शीख लोकांना मुसलमान समजून छळतात!
अमेरिकेची ख्याति म्हणजे अक्कल नाही मुळीच पण अरेरावी जादा!