#महिलाday

Submitted by GANDHALI TILLU on 8 March, 2018 - 11:04

आज माझ्या फेसबुक, व्हॅटसप आणि तत्सम सगळ्या सोशल मीडिया वॉल्स वर विविध जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छांच्या आणि स्त्री शक्तीच्या पोस्ट्स वाचत असताना माझ्या घरातल्या काम करणाऱ्या सुरू मावशीला तिचा आजचा दिवस बुधवारचा उपवास करायचंय म्हणून महत्वाचा होता.हे बघून मला अनेक प्रश्न मन येतात. गेल्या एक वर्षात सोशल मीडिया वर झालेल्या महत्वाच्या महिला सशक्तीकरणाचा आढावा घेतला तर त्यामुळे वास्तविक आयुष्यात किती बदल घडला ह्या बद्दल साशंकता व्यक्त होते.अर्थात me too किंवा times up हॅशटॅग वापरून स्त्रियांनी आपल्या मानसिक, लैंगिक छळांबद्दल मुक्तपणे तरी सोशल मीडियाच्या आडून जे काही मांडला ते नक्कीच भयाण आहे आणि त्याविषयी चर्चा,वाद झाले पण त्यातून खऱ्या जा स्त्रीवर्गाला सक्षम बनवण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलाच नाही असे माझे वयक्तिक मात आहे.मला ह्या सर्व धाडसी महिलांचे आणि पुरुषांचे कौतुक आणि आदर वाटतो कारण मत मांडणे आणि आपल्या अनुभवांना जगासमोर आणणे, अन्याय विरुद्ध आवाज उठवणे,ह्या विषयांबद्दल जागृती करणे हे सगळे उद्देश योग्यच आहेत परंतु त्यातून कुठेतरी आपल्या दुबळेपणाच समर्थन करून सर्व पुरुष विरोधी सूर सुद्धा आवळले गेले."फेमिनिस्ट "आणि " फेमिनाझी "ह्या संकल्पनांची गल्लत केली गेली. हॉलिवूड मधील ज्या सर्व अभिनेत्रींनीं आवाज उठवला त्या इतके वर्ष काहीच का बोलल्या नाहीत आणि अनेकींना एकाचवेळी उपरती कशी झाली? हे प्रश्न डोकावल्या शिवाय राहत नाही.PR मनगमेन्ट हा सुद्धा ह्यामागचा हेतू असू शकतो असे काहींचे म्हणणे आहे. तरी मी आशावादी आहे की ह्या मोहीमl किंवा उपक्रम खऱ्या आयुष्यात सर्वसमावेशक होतील आणि सर्व स्थरातील माहिला सबलीकरणाचे काम घडेल आणि स्वतःच्या इच्छांच्या पूर्तीसाठी उपास- तपासाची कोणालाही गरज पडणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मांडणी विस्कळीत वाटली.पण आपल्या वर झालेल्या अन्यायााविरुद्ध महिला आवाज उठवत आहेत हेच या चळवळीचे यश आहे