ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्पॉयलर अलर्ट
StoryLine plz>>
पहिल्या एपिसोड मध्ये इतकं दाखवलं की पजो गृहिणी आहे,नवरा ,बायको ,2 मुलं असं कुटुंब आहे,त्यांचा सुटीच्या दिवसाचा दिनक्रम दाखवला,रात्री कॅरम खेळून झाल्यावर ती सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला रस्त्यापलीकडे आईस्क्रीम च्या दुकानात जाते,आणि परत येते तर त्यांच्या बैठ्या घराच्या जागी 5-6 मजली बिल्डिंग असते,एपिसोड संपतो

पजो घरच्या बाहेर पडलेला कचरा (दुसर्या कोणी तरी फेकलेला !) स्वतःच्या हाताने गोळा करुन शेजारच्या कचराकुंडीत टाकते आणि तशीच हात न धुता स्वयंपाकघरात येऊन त्याच हाताने कादेपोहे डीश मध्ये भरून मुलाला देते ! युक्क !

पाजो च्या अंगावर सकाळी नवर्याला झोपे तून उठवताना जी साडी तीच दिवसभर, अगदी रात्री आईस्क्रीम आणायला बाहेर पडली तरी तीच साडी , बाहेर पडताना दोनदा दाखवले आहे सकाळी लोंन्द्रित कपडे देताना आणि सध्याकाळी आईस्क्रिम आणायला , दोन्ही वेळा तीच साडी तसेच केस अस्ताव्यस्त ! चांगल्या सुखवस्तू घरातली महिला ती सुद्धा मुंबैई सारख्या ठीकाणची असे घरा बाहेर कधीच पडणार नाही, अरे त्या डायारेकटरास अक्कल नाही किमान पल्लवी जोशी सारख्या अनुभवी कलाकाराला तरी या चुका शुटींग करते वेळी समजायला हव्या होत्या आणि त्यांनीच त्या सुधारून घ्यायला हव्या होत्या , पण पाट्या टाकायाच्याच असे ठरवले असले तर काय बोलायचे ?

सुरूवात चांगली झाली. कलाकार तगडे घेतलेत.
दिवसभर एकाच साडीत वावरणार्‍या महीला आहेत त्यामुळे त्यात गैर नाही वाटलं. पहील्या भागात तरी सगळे नॉर्मल दिसले.
शेवटही छान झाला.
पण झी टिव्ही आहे त्यामुळे अपेक्षाभंग नक्कीच करतिल.
वर्षभर तिला नवरा आणि मुलांच्या नावाने ओरडत ठेवतील आणि मग अचानक कथानक गुंडाळतील.

पजो घरच्या बाहेर पडलेला कचरा (दुसर्या कोणी तरी फेकलेला !) स्वतःच्या हाताने गोळा करुन शेजारच्या कचराकुंडीत टाकते आणि तशीच हात न धुता स्वयंपाकघरात येऊन त्याच हाताने कादेपोहे डीश मध्ये भरून मुलाला देते ! युक्क ! > हायला,म्हणजे हात धुतले वगैरे सग्गळं डिटेलवार दाखवायचं Uhoh

दिवसभर एकाच साडीत वावरणार्‍या महीला आहेत त्यामुळे त्यात गैर नाही वाटलं. >>>> हो त्यात काहि गैर नाहि, नोर्मल घरगुति बायका अगदिच लाम्ब station ला वैगरे जायचे असेल तर कपडे बद्लुन जातात पण फर्लान्गभर जाण्यासाठि......
कलाकार मात्र भारिच घेतले आहेत, साध्या इस्त्रिवालयाच्या रोल प्यडि करतोय, तो कचरा टाकुन जातो तो अभिजित चव्हान, शेजारि नाव नाहि माहित, तो ice cream wala.

जोशी म्याडम सकाळी घाई गडबडीत असतात. पोरांची शाळेत आणि नवऱ्याची ऑफिसात जायची तयारी करत असतात. नवऱ्याला उठवायला जाते तर नवरा म्हणजेच बर्वे सर तिला गुड मॉर्निंग करून परत झोपतात(बर्वेचे पांढरे केस आणि जोशी म्याडम पाहून मला नकळत बोनी कपूर आणि श्रीदेवीची जोडी आठवली आणि माझे डोळे पाणावले. पण कठोर हृदय करत आणि त्यावर दगड ठेऊन मी पुढे सीरिअल पाहू लागलो.) जोशी म्याडम बोलतात अहो गुड मॉर्निंग कसलं करताय तासाभरात गुड आफ्टरनून होईल, ऑफिसात नाही जायचं का?(म्हणजेच सर ११ पर्यंत झोपून होते. आता एवढ्या लेट ते ऑफिसला का जातात? किंवा त्यांना दुपारपाळी असते का असे प्रश्न अनुत्तरित राहतात.) . सर बोलतात आज मला सुट्टी आहे त्यामुळे मी काहीही काम करणार नाही. जोशी म्याडम इस्त्री केलेला शर्ट प्यांट सरांच्या पायाजवळ ठेवलेला असतो. अर्थातच सर तो पायाखाली चुरगळतात. पण फक्त चुरगळलेला शर्ट प्यांट जोशी म्याडम लॉंड्रीवाल्याला का देतात ते समजलं नाही. कदाचित इस्त्री नसावी घरी. जोशी म्याडम जशा लॉंड्री वाल्याकडे जातात. तसं बाप लेक म्याडमना सरप्राईज द्यायला प्लॅन बनवतात. तो प्लॅन काय बनवतात ते त्यांचं त्यांनाच माहित, पर्सनल गोष्टींमध्ये नाक खुपसणं मी सोडून दिलंय. नंतर मालिका जाम कंटाळवाणी झाली. एवढी कि लिहायचा पण कंटाळा आलाय. शेवटी जोशी म्याडम आईस्क्रीम आणायला एवढ्या लांब जातात कि परत येईपर्यंत त्यांचा वाडा तोडून त्या जागेवर भली मोठी इमारत बांधलेली असते. समाप्त.

जोशी म्याडम सकाळी घाई गडबडीत असतात. पोरांची शाळेत आणि नवऱ्याची ऑफिसात जायची तयारी करत असतात. नवऱ्याला उठवायला जाते तर नवरा म्हणजेच बर्वे सर तिला गुड मॉर्निंग करून परत झोपतात(बर्वेचे पांढरे केस आणि जोशी म्याडम पाहून मला नकळत बोनी कपूर आणि श्रीदेवीची जोडी आठवली आणि माझे डोळे पाणावले. पण कठोर हृदय करत आणि त्यावर दगड ठेऊन मी पुढे सीरिअल पाहू लागलो.) जोशी म्याडम बोलतात अहो गुड मॉर्निंग कसलं करताय तासाभरात गुड आफ्टरनून होईल, ऑफिसात नाही जायचं का?(म्हणजेच सर ११ पर्यंत झोपून होते. आता एवढ्या लेट ते ऑफिसला का जातात? किंवा त्यांना दुपारपाळी असते का असे प्रश्न अनुत्तरित राहतात.) . सर बोलतात आज मला सुट्टी आहे त्यामुळे मी काहीही काम करणार नाही. जोशी म्याडम इस्त्री केलेला शर्ट प्यांट सरांच्या पायाजवळ ठेवलेला असतो. अर्थातच सर तो पायाखाली चुरगळतात. पण फक्त चुरगळलेला शर्ट प्यांट जोशी म्याडम लॉंड्रीवाल्याला का देतात ते समजलं नाही. कदाचित इस्त्री नसावी घरी. जोशी म्याडम जशा लॉंड्री वाल्याकडे जातात. तसं बाप लेक म्याडमना सरप्राईज द्यायला प्लॅन बनवतात. तो प्लॅन काय बनवतात ते त्यांचं त्यांनाच माहित, पर्सनल गोष्टींमध्ये नाक खुपसणं मी सोडून दिलंय. नंतर मालिका जाम कंटाळवाणी झाली. एवढी कि लिहायचा पण कंटाळा आलाय. शेवटी जोशी म्याडम आईस्क्रीम आणायला एवढ्या लांब जातात कि परत येईपर्यंत त्यांचा वाडा तोडून त्या जागेवर भली मोठी इमारत बांधलेली असते. समाप्त.

मला तरी हे कुटुंब सुखवस्तू वाटले नाही. मध्यमवर्गिय च वाटले. वडिलोपार्जित (मोठ्या) घरात राहतायत इतकंच.
आणि मध्यमवर्गिय घरातल्या बायका आहे त्याच साडिवर दिवसभर राहतात नॉर्मली त्यात काहीही गैर नाही. फक्त तो वाडा मुंबईत आहे असं दाखवलं आहे आणि आजूबाजूला पण बैठी घरं किंवा बंगलेच ते पचत नाही, शिवाय रहदारी सुद्धा अगदिच तुरळक दाखवली आहे. स्टारकास्ट अगदी तगडी आहे, मुलिचं काम केलेली कोण आहे कलाकार माहित नाही पण चुणचुणित आहे एकदम. मुलगा डायलॉग बोलताना पाठ केल्याप्रमाणे बोलतो.

वाडा विकायला बिल्डरकडून प्रेशर असावं असा सटल अंदाज आला पहिल्याच एपिसोड्मध्ये.
बहुधा नवरा आणि मुलाना बिल्डर मारून टाकेल किंवा पळवून नेइल किंवा ही सुद्धा मेलेली असेल आणि हिचं भूत वावरत असेल वाड्यात अशी साधारण कथा असावी असं वाटतंय.
नारायण धारपांच्या कादंबरीवर आधारीत आहे असं वर कुणितरी म्हटलंय, पण मी ती कादंबरी वाचली नाहिये.

धारपांच्या स्टोरिचा आढावा घ्या बघु कुणीतरी. म्हणजे ओरिजिनल गोष्टीचा अंदाज येईल आणि झी च्या शिरेल ची पिसं काढायला सोप्प् जाईल Proud

मलाही हेच वाटतय ही वेगळ्या टाईम झोन मध्ये आलेय.
धारपांच्या ग्रहणाशी एकदम मिळाती जुळती आहे.
आता हीला एक माणूस आपल्या घरी नेइल.
मग शिरल्या शिरल्याच त्याचे वडील हिच्यात सुन पहातील, आई तिच्यावर तिथेच जळायला सुरवात करेल. बहीण दादाने वहीनी आणली म्हण्त अतिरेकी चांगल वागेल. मग कुठला तरी मामा किंवा आत्या हिला मारायचा प्लॅन करून तयार असतिल ....... वगैरे वगैरे
झी ची सिरीयल आहे काहीही होउ शकतं.

ना धां च्या ग्रहण सारखी स्टोरी असेल अस वरच्या प्रतिसादांवरुन वाटतंय.
बाई कुठेतरी जाते. तिचा अक्सिडेंट होतो. मग वेगळ्याच टाइम झोनमधे किंवा समांतर विश्वात जाते असं काहीतरी.

बाई कुठेतरी जाते. तिचा अक्सिडेंट होतो. मग वेगळ्याच टाइम झोनमधे किंवा समांतर विश्वात जाते असं काहीतरी. >>>> +१११

काल एका सिन मधे तसेच दखविम्ह, म्हणजे अक्सिडेंट नाही पण होता होता वाचते

काय असतं, मुलांच्या पप्पांनी आणी मुलांनी आईच्या वाढदिवसाचा पिलॅन बनवलेला असतो, त्यात ओळखीचे पण सामिल असतात, फकस्त ते आयत्या वेळेवर येऊन बड्डेगीत गाणार असतात.

पल्लुबाय घरगुती वेशात छानच दिसते, पण त्याचा अतीरेक दाखवलाय. आणखी एक, जेव्हा मुले व पप्पा ( सुनिल बर्वे ) कॅरम खेळायला बसतात, तेव्हा पप्पा मुलांना सांगतात की आई हरेल मग तिच्या सोबत ( त्यांचा मुलगा की मुलगी हे आता लक्षात नाही ) मुलाने आईस्क्रीम आणायला जायचे व पप्पा व मुलगी वाढदिवसाचा केक वगैरे टिपॉय वर ठेऊन डेकोरेशन करतील. पण ती एकटीच जातांना दाखवलीय. जातांना ती एका बसखाली येता येता वाचते, अगदी क्षणाचा फरक वगैरे. पण मला वाटत की त्याच वेळी ती गेलेली असावी, जे दाखवले नाहीये. आणी मग अचानक तिच्या छोट्या बंगली ऐवजी मोठा दोन मजली बंगलाच दाखवलाय. धन्य हो!

विठ्ठल भाऊ शिरेल निट पाहीली नाही वाटते ... एकाच सलग शॉट मध्ये ती कचरा उचलून फेकून देऊन तशीच घरात येते मुलां वर वसकन ओरडते आणि त्याच पावली स्व.घरात शिरून डीश भरते असे सलग दाखवले आहे कोठेही कट नव्हता .

पात्रांच्या प्रत्येक हालचाली (दात घासणे , अंघोळ करणे ई ) दाखवले पाहिजे असे म्हणत नाही पण जेव्हा एकाच कट मध्ये सलग अ‍ॅक्शन असते तेव्हा अशी काळजी घेतली पाहिजे . मी स्वत: व्हीडिओज बनवतो , शुटींग पासुन एडिटींग पर्यंतचे सर्व सोपस्कार करण्याचा अनुभव आहे म्हणूनच मी हे सांगत आहे.

पल्लवी जोशी सारख्या सिनियर कलावंतांनी तरी अशा चुका होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे , डायरेक्टर ने असा शॉट घेतला तरी त्याला सुचवता आले पाहिजे की सलग शॉट आहे किमान कचरा हाताळलेल्या हातांनी मुलांची पोह्याची डिश भरणे दाखवणे बरोबर दिसणार नाही ,पब्लीकच्या लक्षात येते , आपण हा टेक सुधारुन घेऊ इ. बाहेरुन येऊन वॉश बेसिन वर हात धुवुन पदराला हात पुसत ... पुढे चालू ... फार नाही फक्त ५ सेकंदांचे फुटेज वाढले असते.

वाचले की ते आता नारायण धारपांच्या ग्रहणाच्या कथेचे लिंक असलेले. ९५ टक्के तशीच सुरुवात आहे की.

सिरीयल अजून पाहिली नाही. ट्रेलर मातॄकृपेने माहिला.
भूत झाल्यावर इतके हात बित धुवायचं अवधान कुठून राहणार :):)
स्वगतः भूत होऊन पण मेलं रांधा वाढा उष्टी काढा संपत नै..पोहे वाढत बसलेय बशीत.

मला अस वाटतंय की प जो चा एक्सीडेंट झाला असेल आणि ती काही वर्ष कोमात असेल, कोमातून आल्यावर फक्त आइसक्रीम ची मेमरी शिल्लक असेल. ते ट्रक ने खरच उडवल असेल बहुतेक.

Pages