आंजर्ले-वेळास कासव महोत्सवला कोणी जाऊन आलंय का?

Submitted by स्वप्ना_राज on 6 March, 2018 - 13:25

नुकतंच ह्या महोत्सवाबद्दल वर्तमानपत्रात वाचलं. थोडी शोधाशोध केल्यावर पुढील दोन लिंक्स मिळाल्या:

https://www.mumbaitravellers.in/velas-turtle-festival-2018-dates/
http://www.treksandtrails.org/index.php/event-timer/569-velas-turtle-fes...

मायबोलीकरांपैकी कोणी वरील ग्रूप्सबरोबर जाऊन आलं आहे का? असल्यास कसा अनुभव होता? आंजर्लेला जाणं योग्य का वेळासला? होमस्टे म्हणजे रहाण्याची नक्की काय सोय असते?

काही माहिती असल्यास कृपया पोस्ट करा. धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वेळासला गेले होते २ वर्षांपूर्वी. होम स्टे म्हणजे गावातल्या बहुतेक सगळ्या घरांमध्ये पाहुण्यांची राहण्याची, जेवणाची सोय होती. पॉश वगैरे नाही. कोकणातल्या छोट्या गावात असेल तितपतच.

आमच्या घरामध्ये आम्हीच तोवरचे पहिले गेस्ट होतो, त्यामुळे त्यांना हिशोब कसा करायचा हेही माहित नव्हतं. (आतापर्यंत बहुतेक घडी बसलेली असेल.)

कासवाची अंडी उबण्याचा काळ किती थंडी आहे इ. प्रमाणे बदलतो, त्यामुळे नक्की कुठल्या दिवशी पिल्लं बाहेर पडतील याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. अंडी टोपल्यांखाली झाकून ठेवतात, आणि रोज सकाळी, संध्याकाळी टोपल्या उघडतात. अंड्यातून पिल्लं बाहेर पडली असतील तर ती मग समुद्राकडे जायला निघतात, आणि आपल्याला बघायची संधी मिळते. आम्ही वीकेंडला गेलो होतो, पिल्लं निघाली नाहीत. लेकीने आणि तिच्या सखीने समुद्राच्या पुळणीत भरपूर एन्जॉय केलं. इथला समुद्र सेफ नाही, पाण्यात शिरता येत नाही. त्यामुळे थोडीफार अपेक्षाभंगाची तयारी ठेवून जा.

इथले मोहन उपाध्ये आणि सह्याद्री निसर्ग मित्र निसर्ग संवर्धनासाठी खूपच छान काम करत आहेत. त्यांची डॉक्युमेंट्री दाखवतात, जवळ गिधाडांच्या संवर्धनाचा एक प्रकल्प आहे तिथे भेट देणे शक्य आहे. (आम्ही गेलो नव्हतो.)

जंगल सफारीला गेल्यावर वाघ दिसलाच नाही म्हणून पैसे परत मिळत नाहीत, पण कासवाची पिल्लं दिसली नाहीत तर ट्रीप फुकट गेली म्हणून आयोजकांशी भांडणारे लोकही होते तिथे!

अजून एक म्हणजे सध्या बर्याच "कासव महोत्सव" जाहिराती दिसल्या. आम्ही अशा कुठल्या ग्रूपबरोबर न जाता थेट मोहन उपाध्ये यांच्याशी संपर्क करून गेलो होतो.

आंजर्ले चा समुद्रकिनारा सेफ आहे. तिथे 4 5 उत्तम हॉटेल्स पण आहेत त्यामुळे हॉटेल ला राहा व त्यांना विचारा. कदाचित पिल्ले सोडताना बघायला मिळू शकेल.

४ वर्षा पुर्वी मुम्बई ट्रॅवलर्स बरोबर जाउन आलो आहे. वेळास ला स्थनिक लोकान्ची घरे राहाण्यास मिळतात. जेवण अतिशय रुचकर असतं. कासव महोत्सव एकदा तरी जाउन पहावा असा आहे.

गौरी यांनी सांगितले तसेच. २ वर्षांपूर्वी वेळास ला जाऊन आलो. कुठल्या ग्रूपबरोबर गेलो नव्ह्तो. आम्ही वीकेंडला गेलो होतो, पिल्लं निघाली नाहीत. पण मुलांनी एन्जॉय केलं.
कोकणात मजा येतेच. त्यामुळे पिल्लं दिसली नाही तरी एन्जॉय करूच असं ठरवूनच जायचं.

~साक्षी

3-4 वर्षांपूर्वी मी आणि नवरा मुंबईहून bike ने गेलो होतो. कुणाकडे तरी homestay ऑनलाईन बुक केला होता. जाताना हरिहरेश्वरला भेट देऊन पुढे गेलो. सावित्री नदी फेरी बोटीतून bike सोबत क्रॉस केली बाणकोट किल्ला ही बघितला. म्हणजे आता फार काही राहिलं नाहीय किल्ल्यात पण view जबरदस्त होता. वेळास हे टोकाचे गाव बाणकोट पासून पुढे तर रस्त्याच्या एक बाजूला टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. असे निवांत समुद्रकिनारे बघायलाही भेटत नाहीत त्यामुळे आम्हाला खूप मजा आली. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर जिध्ये अंडी टोपळ्यांखाली गाडून ठेवलेली असतात ति उघडून बघितली जातात व बाहेर आलेली पिलं सोडून देतात जी समुद्राकडे चालत जातात. पण मोठा सोहळा सकाळी असतो कारण रात्रीतून खूप सारे लोक आलेले असतात. व सकाळी विकेंडसला गर्दी असते. मग पद्धतशीरपणे ती पिल सोडली जातात तेव्हा दोन्ही बाजूंनी रोप बांधून passage केला जातो. व ह्या रनवे वरून ती छोटी छोटी पिलं समुद्राच्या ओढीने जातात तेव्हा त्यांचा थाट बघत राहावा असा असतो. सर्व बाजूंनी कॅमेऱ्याच्या क्लीकक्लिकाट चालू असतो , फ्लॅश पडत असतात, गोंधळ चालू असतो,सकाळच्या सूर्याच्या सोनेरी किरणात न्हाऊन निघालेला आसमंत आणि समुद्राचा वारा perfect view. छोटे छोटे निसर्गाचे event एन्जॉय करणाऱ्यांना नक्कीच मजा येईल. आम्हाला खूप मजा आली. Destination छान होतच पण प्रवास अप्रतिम होता. ज्यांच्याकडे थांबलो त्यांचा भरपूर वर्ष जुना वाडा बघितला, त्यांच्या बागेतले रामफळ, काळीमिरी, व्हॅनिला विकत घेऊन आलो.

आम्ही २/३ वर्षांपुर्वी एकदा गेलो होतो, फारच छोटेसे गाव आहे आणि हॉटेल्स वगैरे दिसली नाहीत.
दिवाळीच्या सुमारास गेलो होतो, तेव्हा कासवातला क पण नव्हता, अर्थात आम्हाला तिकडे गेल्यावर कळाले की हे गाव कासव आणि नानांचे आहे.
जेवण एका ठिकाणी घरगुती मिळाले, चांगले होते आणि खुप स्वस्त.

गौरी, कांदापोहे, वेदांत, सीमि, साक्षी, महेश तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार! कांदापोहे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हॉटेल्स चेक करते. पण घरून मी एकटीच जाणार असल्याने बहुतेक ग्रूपसोबतच जावं लागणार.

होमस्टे मध्ये बाथरूम, टॉयलेट्सची काय व्यवस्था असते कोणी सांगू शकेल का? हा प्रश्न विचारताना थोडं ऑकवर्ड वाटतंय पण प्रश्न महत्त्वाचा असल्याने नाईलाज आहे. तसंच एका खोलीत किती लोकांची रहायची सोय असते? कृपया काही माहिती असेल तर सांगा प्लीज. पुढच्या आठवड्यात फोनाफोनी करून अधिक माहिती काढते वर दिलेल्या ग्रूप्सकडून.

घरात बाथरूम, टॉयलेट कॉमन होत्या. कमोड नाही. (१० पाहुणे आणि घरातली मंडळी सगळ्यांना १ टॉयलेट आणि १बाथरूम होती!) माझी मैत्रीण, तिचा नवरा, लेक, माझी लेक, मी असे आम्ही गेलो होतो, आम्हाला एक खोली झोपायला होती. दुसर्‍या ग्रूपला झोपायला वेगळी खोली होती. रात्री हाताला काहीतरी मऊमऊ लागलं. लेक झोपेत माझ्या एका बाजूची दुसर्‍या बाजूला कशी पोहोचली म्हणून उठून बघितलं तर घरातली माऊ माझ्या दुसर्‍या कुशीत गुडूप झोपली होती Happy