समांतर लैंगिकता आणि मानसिक आजार

Submitted by सिम्बा on 5 March, 2018 - 07:06

माणसाच्या मानसिक स्थितीचा त्याच्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. मानसिकरित्या निरोगी आणि तणावरहित आयुष्य जगणाऱ्या माणसांचे सर्वसाधारण आरोग्यमान चांगले असते.
आपण लैगिक अल्पसंख्यांकांकडे ( LGBT- लेस्बियन,गे,बाय-सेक्शुअल आणि ट्रान्सजेन्डर) पहिले तर त्यांच्यात मानसिक समस्यांचे प्रमाण थोडे जास्त असल्याचे दिसते.समाजाच्या नितीनियामांच्या रूढ चौकटीत सामावण्यासाठी त्यांना ज्या ताणाचा सामना करावा लागतो त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. हे एकलकोंडी, कुढी किंवा अतिरिक्त flamboyant बनु शकतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक आयुष्यावर मोठा परिणाम होतो.
कोणत्याही मानसिक समस्या सोडवण्यात महत्वाचा वाटा “मानसिक आरोग्य कार्यकर्ते (mental health workers MHW)” म्हणजे सायकोलोजीस्ट, सायकीयाट्रिस्ट आणि कौन्सेलर्स यांचा असतो.परंतु आज अशी परीस्थिती आहे कि बहुसंख्य MHWना (मोठ्या शहरातील किंवा स्वत: ला अपडेटेड ठेवणारे MHW सोडून ) या लैगिक अल्पसंख्यांकांबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दल फारशी माहिती नाही कारण आत्ता पर्यंत त्यांच्या ट्रेनिंग मध्ये या विषयावर जास्त भर दिला जात नसे.
जसजशी LGBT लैंगिकतेबद्दल समाजात जाणीव वाढू लागली तसतसे त्यांच्यातील जास्त लोक आपल्या मानसिक आरोग्याबद्दल जागृत होऊ लागले. त्याचबरोबर या विषयातील प्रशिक्षित MHW ची कमी चांगलीच जाचक होऊ लागली.
त्यावर उपाय म्हणून इंडिअन सायकीयाट्रिक सोसायटीने एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. त्यात लैंगिक अल्पसंख्यान्कांच्या मानसिक आरोग्यासाठी एक टास्क फोर्स बनवला आहे. LGBT कम्युनिटीला भेडसावाणाऱ्या मानसिक समस्यांबाबत MHW मध्ये जागृती करणे हे या टास्क फोर्स च्या सभासदांचे मुख्य काम असणार आहे.
याची पहिली पायरी म्हणून मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शनिवार दिनांक १० मार्च 2018 रोजी एक सेमिनार आयोजित केला आहे . या कार्यक्रमात इंडिअन सायकीयाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ अजित भिडे आणि इतर नामवंत डॉक्टर्स त्यांचे या विषयावरचे विचार मांडतील.
सुप्रसिद्ध लेखक श्री. देवदत्त पटनायक सुद्धा एक सत्र घेतील. वेगवेगळ्या धर्मांचे लैगिकता किंवा समांतर लैगीकते बद्दल काय मत आहे याबद्दल बोलतील. धर्माचा LGBT मानसिकतेवर काय परिणाम होतो याचा ते उहापोह करतील.
हा सेमिनार मुख्यत: मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना समोर ठेऊन आखला असला तरी या विषयची आवड असणाऱ्यांनी इतर लोकांनी सुद्धा उपस्थित राहायला हरकत नाही.
कार्यक्रमाची विषयसूची खाली दिली आहे, त्यात नमूद केलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
रजिस्ट्रेशन विनामुल्य आहे.

IMG-20180218-WA0002[1].jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुदलात समांतर लैंगिकता हा कुठलाही मानसिक आजार नाही हे पण सर्वसामान्य समाजाला सतत ठासून सांगत राहायची गरज आहेच...
अतिशय चांगली बातमी आहे वरची. या चर्चसत्राशी सकारात्मक रीत्या कुठल्याही तर्‍हेने संबंधित असलेल्या सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन. अशा प्रकारचे प्रयत्न समाजस्वास्थ्यासाठी सातत्याने करत राहाय्ची गरज आहे.

मुदलात समांतर लैंगिकता हा कुठलाही मानसिक आजार नाही हे पण सर्वसामान्य समाजाला सतत ठासून सांगत राहायची गरज आहेच...>>>>
वरदा अगदी बरोबर,
हा मुद्दा मी हेडर मध्ये घालायला विसरलो होतो. त्याचा उल्लेख केला बद्दल धन्यवाद.

शुभेच्छा.
मानसिक आरोग्य कार्यकर्ते यांची जी काही ऑर्गनायझेशन असेल त्याचा मेंबरना मेंबरशिप टिकवण्यासाठी दर काही वर्षांनी डिग्री रीइव्हॅल्यूएट करुन घ्यालला लागत असेल ना? त्यासाठी असे सेमिनार अटेंड करणे ही अट केली आहे का?

अतिशय चांगली बातमी आहे वरची. या चर्चसत्राशी सकारात्मक रीत्या कुठल्याही तर्‍हेने संबंधित असलेल्या सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन. अशा प्रकारचे प्रयत्न समाजस्वास्थ्यासाठी सातत्याने करत राहाय्ची गरज आहे>>>+११११

शुभेच्छा!

सिम्बा, या विषयाविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. एकूणच लैंगीकता या विषयावर शास्त्रीय माहिती सर्वाना मिळावी.

समांतर लैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा मनोविकार नाही असे मी अभ्यासू तज्ञ् व्यक्तींकडून ऐकले आहे माझा या बाबतीत विशेष अभ्यास नाही. परंतु मला थोडे समजते त्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचे इतरांपेक्षा वेगळे आचारण किंवा कल हा जडणघडणीतून निर्माण झालेला असू शकतो किंवा अनुवांशिक असू शकतो. जसे एखाद्या व्यक्तीचा डोळ्यावर रंग, उंची, शरीरयष्टी तसेच काही मानसिक कल जसे भावनिकता (नयूरॉटिसिसम) इत्यादी गोष्टी अनुवांशिक असू शकतात. तर काही जडणघडणीतून निर्माण झालेल्या असू शकतात. जसे सचिन चे क्रिकेटप्रेम हे अनुवांशिक न म्हणता जडणघडणीतून निर्माण झाले असेच म्हणावे लागेल. हे फक्त उदाहरण दिले.

समांतर लैंगिकतेविषयी बोलायचे तर,जर समांतर लैन्गितकता कोणत्याही सामाजिक कारणातून किंवा जडण घडणीतून निर्माण होत नसेल, तर ती अनुवांशिक असते का? या बाबतीत तज्ज्ञांची काय मते आहेत?

समांतर लैंगिकतेचा स्वीकार समाजात वाढवा म्हणून TOI ने केलेल्या प्रयत्नाचा एक अपडेट.
17 मार्च हा international day against transphobia, homophobia and bi phobia म्हणून मानला जातो,
या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप ने "प्राउड अँड आउट" नावाचे एक कॅम्पेन सुरू केले आहे,

https://youtu.be/-p8DFP1Tn1s

LGBTQ लोकांसाठी TOI च्या क्लासिफाईड भागात खास जागा राखून ठेवली जाणार आहे, पाहिले 3 महिने या जागेत पूर्णपणे फुकट जाहिराती देता येतील.
स्वतः साठी घर शोधणारा एक मुलगा, आपल्या वेगळेपणा बद्दल वडिलांना संदेश देणारी मुलगी, स्वतः साठी जोडीदार शोधणारा पुरुष आणि आपल्या 15व्या ऍनिव्हर्सरी निमित्त आपल्या कुटुंबियांचे आभार मानणारे एक जोडपे यांच्या जाहिरातींनी या कॅम्पेन चा शुभारंभ झाला.
Times Out and Proud campaign_2.jpg

Toi चा यात कमर्शिअल इंटरेस्ट असायचा तो असो, पण PAN इंडिया लेवल सगळ्या आवृत्यांमध्ये फुल पेज जाहिरात आणि हे कॅम्पेन रेडिओ वगैरे इतर माध्यमातून राबवायचे प्रयत्न पाहता हा मुख्य धारेपासून वेगळा ठेवला जाणारा गट लौकरच मुख्य सामाजिक धारेत येईल अशी आशा ठेवायला हरकत नाही.