सातोरी

Submitted by अनन्त्_यात्री on 5 March, 2018 - 05:16

सप्त-समुद्रांमधे मिसळती असंख्य सरिता मधुर-जला
मार्गावरती समर्पणाच्या करिती पृथ्वीला सुफला

सप्त-रंग हे इन्द्रधनूचे क्षणभर दिसती, अन विरती
जलबिंदूंवर रविकिरणांचे इन्द्रजाल अद्भूत किती

पुनरावर्तन सात दिसांचे जरी मानवा योग्य दिसे
अनादि काल-प्रवाह वाहे, अंत तयाला कुठे असे?

अपूर्व विभ्रम सप्त-सुरांचे राग होउनी अवतरती
कोंदणात तालांच्या त्यांची अमूल्य रत्ने झगमगती

निर्धाराने परिश्रम करता असाध्य जगती काही नुरे
कल्पनेतले सप्त-स्वर्ग मग भूवरी येतिल खरेखुरे

Group content visibility: 
Use group defaults