अस्तित्व : सत्य भयकथा

Submitted by देवेंद्र on 4 March, 2018 - 08:06

अस्तित्व : सत्य भयकथा

मी एका सरकारी ट्रेनिंग Institute मध्ये आय. टी. Engineer म्हणून Contract Basis वर ११ महिन्यांसाठी जॉबला होतो.

आमच Office हे Classrooms असणाऱ्या Buliding मध्येच होत. Buliding च्या समोरच Library मागच्या बाजूस दवाखाना. थोड लांब उजव्या बाजूस होस्टेल, डाव्या बाजूस कॅन्टीन, Library च्या उजव्या बाजूस कंट्रोल रूम (सदर Institute हि Cops ला ट्रेनिंग देण्यासाठी आहे ) साधारणतः १००+ एकर चा परिसर. Institute हि इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली १००+ वर्षे जुनी आणि महत्वाची Institute आहे.

Institute सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असल्याने महत्वाच्या ठिकाणी (Entry आणि Exit Gate) बंदुकधारी cops २४ तास तैनात असत आणि रात्री गस्तीसाठी पोलीसगाडी फिरत असे.

मला जॉईन होऊन ३ महिने झाले असतील. दुसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या मिटिंग्ज होत्या. मीटिंग असल्या मुळे आम्ही त्या रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. माझ्या सोबतीला एक समवयस्क क्लर्क होते.

रात्री १२ ते १२ १/२ च्या दरम्यान आमच काम संपले असावे. आम्ही निघण्याच्या तयारीतच होतो. तेव्हड्यात एका क्लासरूम मधून कसलातरी आवाज ऐकू येवू लागला. माझ्यासोबत असणारे क्लर्क मला क्लासरूम कडे जाण्यास रोखू लागले. नकळतच माझी पावले क्लासरूम कडे वळू लागली. जसजसे मी क्लासरूम जवळ जात होतो तसा आवाज कमी होत होता. मी क्लासरूम उघडण्याची हिम्मत नाही केली. आवाज बेंचवर काहीतरी आपटल्याचा होता. मी क्लासरूम पासून लांब जाऊ लागताच आवाज वाढू लागला. असे २|३ वेळा झाले. मनात धडकी भरली.

मी आणि क्लर्क ताबडतोब कंट्रोलरूमला गेलो. कंट्रोल ऑफिसर ला सर्व हकीकत सांगितली. ऑफिसरने Office बिल्डिंगच्या Incharge ला फोन केला. Incharge पुढच्या पाच मिनिटात कंट्रोलरूमला हजर झाला. Incharge हा Duty वर नसल्या कारणाने स्वतः काही करू शकत नव्हता. Incharge ने गस्तीवर असणाऱ्या Cops ला फोने केला. दहा मिनिटातच गस्तीवरची गाडी हजर झाली. त्यांना झालेल्या घटनेची कल्पना दिली.

मी, क्लर्क, गस्तीवर असणारे Cops आणि Incharge अशी ५ - ६ लोक काठ्या लाठ्या घेऊन आवाज येणाऱ्या क्लासरूम कडे जाऊ लागलो. आवाज येतच होता. जसजसे आम्ही जवळ जात होतो तसा आवाज कमी होत होता. आम्ही दरवाजा पर्यंत पोहोचलो आणि आवाज बंद झाला. हिम्मतीने एकाने दरवाजा उघडला आणि बरोबर घेतलेली Torch चालू केली आणि संपूर्ण क्लासरूम तपासाला. काहीही विचित्र आढळले नाही. परंतु एका बेंचवर पाण्याची बाटली आणि चहाचा एक कप होता. (कोणीतरी एका प्रशिक्षणार्थीचा असावा).

जवळजवळ १५ मिनिटे आम्ही क्लासरूममधेच होतो. परंतु काहीही एक हालचाल झाली नाही. सर्वजन क्लासरूम बाहेर आलो दरवाजा बंद केला. जसजसे आम्ही लांब जाऊ लागलो तसतसा आवाज वाढू लागला. आम्ही सर्व बिल्डिंगच्या खाली येऊन थांबलो. आता तर जेव्हा आवाज यायचा तेव्हा संपूर्ण Instituteची स्ट्रीट Lamps बंद होऊन चालू व्हायची. हा प्रकार न थांबता चालू होता.

माझ्या सोबत असणारे सर्व काहीतरी विचित्र असण्याच्या गप्पा करत होते. काहीच मार्ग नव्हता. झालेल्या घटनेची कंट्रोलरूमला Diaryत नोंद झाली आणि सर्वजन मार्गस्थ झाली. परंतु माझ्या मनात मात्र शंका होती, पूर्वी ह्याच ठिकाणी काहीतरी विचित्र घटना घडल्याची.

रूमवर आलो तर २ वाजले होते. झोप लागत नव्हती. Timepass म्हणून इंटरनेट surfing करू लागलो. surfing करताना सहजच intituteच नाव आणि Suicide एकत्रित गूगलवर search केलं तर पहिल्या ३ लिंक्स intitute मधेच Suicide केलेल्या ३ वेगवेगळ्या बातमीच्या होत्या.

पहिली लिंक ओपन केली आणि धक्काच बसला. ज्या क्लासरूममधून आवाज येत होता त्याच क्लासरूममध्ये एका प्रशिक्षनार्थीने बरोबर त्याच तारखेला एका वर्षापूर्वी आत्महत्या केली होती.

त्या रात्री जणू तो स्वतःच अस्तित्वच सिद्ध करू पाहत होता.

(कथेत थोडे बदल केले आहेत परंतु कथा सत्य घटनेवर आधारित आहे)
(कथा लेखनाचा पहिलाच प्रयत्न होता, चुकल्यास क्षमस्व)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Very nicely narrated n thrilling experience. Tumhi ha anubhaw "Amanviy" hya dhagyawar takayla harkat nahi.