विरह...... आईचा....

Submitted by kalyanib on 3 March, 2018 - 00:46

होळी म्हटली की सगळ्यांना आठवतात ते रंग, पुरणपोळी, मज्जा.... पण आमच्या करीत मात्र हा दिवस कला दिवस ठरतो प्रत्येक वर्षी.... आज माझ्या आईला जाऊन २१ वर्षे झाली. त्या करीतच लिहायचा प्रयत्न करतेय... काही चुकले तर माफी असावी

आई .. काय लिहू? सगळंच अबोल शांत झालं आहे.तुझी आठवण आज अजून जास्त येते आजच्याच दिवशी तू एका नव्या प्रवासाला निघून गेली. तरीही तू आहेस..बघते आहेस आमच्या कडे हि जाणीव सदैव आहे. आज खर तर सगळे होळी खेळण्यात दंग असेल पण आम्हाला मात्र सगळंच रंगहीन दिसतंय. तू गेली हे मनाने अजून मान्य केलेले नाही. तू असायला हवी होतीस. बाबा सगळं कस करतात तुमचे मुलं आता शहाण्या सारखा कसे वागतात हे बघायला तरी हवी होतीस.

तुझं असणं पण किती सुखकर होतं ह्याची जाणीव आज होते. बघ ना आई आता सगळंच change झालं आहे तू थोडी सुट्टी घेऊन ये ना ग आमच्या जवळ. सांग देवाला लेकी कडे जाते तूप रोटी खाते आणि येते. जमेल का ग यायला. खूप बोलायचं आहे ग तुझ्या सोबत आम्हां सगळ्यांनाच. खूप लोकांच्या complaint पण करायच्या आहेत. तू ये बस. Cancer ला हरवलस तू आई. खूप सहन केलस गं..

आता आम्ही मोठे झालो आई. बाबा सगळं करतात. ताई आता तुझ्या सारखीच दिसते तूझ्या सारखी ओरडते पण. बाबा मात्र हळवे झाले आहेत अगदी रडूबाई. तुझी खरी गरज बाबांना आहे गं. आम्हाला मात्र तू हवी आहेस ती आमचा लाड करायला. उगाच मोठं झाल्या सारख वागावं लागत तू असतीस तं हि झंझट नसती. बाबांची तब्येत आजकाल फार नाजूक झालीय गं heart चे प्रॉब्लेम्स आणि सगळंच वयामुळे होत आहे. पण आजही त्यांना हॉस्पिटल मध्ये नेतांना रडू कोसळत. तू गेलीस.... आता त्यांना गमवायचे नाही बस.

आई तुला आठवत का गं आपण कशी मज्जा करायचो नं ? आपलं वेगळचं विश्व होतं. तुझा कॅन्सर नि मात्र सगळंच विस्कटवलं .सगळे खूप काळजी घेतातं आमची. काका काकू पटकन धावून येतात. ताई मात्र फार हळवी झाली आहे. तुला एक गोंडस नातं आहे बरं का आई . अवनी नाव आहे. खूप समजदार आहे ती. तू असतीस तं तिचे खूप लाड झाले असते. ताईच्या डोहाळे जेवणाच्या वेळेस तुझी फार फार आठवण आली आई. तिनी बोलून नाही दाखवल पण सारखी हळवी होत होती. तू असतीस तर कित्ती केला असतंस ताईचं. २१ वर्ष तुझ्या शिवाय जगणं म्हणजे कमाल आहे न ?कधी कधी भीती वाटते तू आम्हाला विसरली का याची ...
आता मात्र लिहिणं होणार नाही. रडायचे नाही असे कितीही ठरवले तरी ते शक्य नाही. तुझी आठवण रोजच येते आई. त्रास करून घेऊ नकोस मस्त एन्जॉय कर... आम्ही आहोत ना सगळं सांभाळायला.... काही त्रास असेल तर मात्र कळवं....
२१ years and forever to go of missing you AAI ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Sad Sad Sad .... same. 8 years Sad
करोगे याद तो हर बात याद आयेगी

आई वडील यांपैकी कोणाचाही विरह सहन करावा लागणे अतिशय दुखःदायी असते.
कितीही वर्ष झालि तरी ती उणीव भरून येत नाही. Sad

कल्याणी मॅडम स्वतःला आवरा ..अर्थात ज्याचं दुःख त्यालाच माहिती पण तुम्ही आईसाठी सतत डोळ्यात पाणी आणलात तर आईला अजून वाईट वाटेल मग ते तुम्हाला चालेल का ? छान हसरी सामील द्या ब्र एकदा आईसाठी ..तिला छान वाटावं म्हणून ..आणि आठवण जास्तच अली कधी तर तुमची ताईची छोटी मुलगी आहे ना अवनी तिला कुशीत घ्या न घट्ट मिठी मारा आणि बघा सगळं दुःख फिनिश...हसत रहा ..आनंदी रहा .. आई बघतेय तुम्हाला ..बाबांची काळजी घ्या ...आणि माझं काही पटलं नसेल तर कान पकडून सॉरी बरं का.......

अंजली_१२
अगदि खरे बोलल्या आपण.

निलुदा
१८ वर्ष...
ज्याचे जळते त्यालाच कळते.....

अगदी मनातलं कागदावर उतरावलंत तुम्ही आजच वर्ष पूर्ण झालं आई ला जाऊन तिच्या अकाली जाण्याचं कारण हि तेच , तिच्या शिवाय जगण्याची सवय अजूनही नाही.

माझ्या आईला जाऊन २० वर्षे झाली. पण त्यानंतर वडिलांनी सगळे केले, मि एकुलती एक .......................पण लग्नानंतर माहेर खूप मिस करते. आई असली तरच माहेर. मला एक मुलगा आणि एका मुलीची आई आहे. माझ्या मुलीला मला सर्व द्यायचे आहे. एका मुलीसाठी आई काय असते हे मलाच माहिती.
आईची खूप आठवण येते............ आणि त्याच बरोबर वडीलांच्या त्यागाला पण सलाम त्यांनी माझ्यासाठी दुसरे लग्न नाही केले.