मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - १ मार्च २०१८ - यमक

Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2018 - 22:47

काव्यालंकार
खरंतर एखादी कविता म्हणजे शब्दाची रचना नव्हे. यमक जुळवले की कविता होत नाही तर ती कविता वाचल्यानंतर जे भाव मनात उरतात ती कविता. कवितेला वय नसतं ,आयुष्य नसतं. विषयाचं ,वेळेचं, बंधन नसतं. शब्द भाव अमर असतात. तर अश्याच आपल्या सुंदर भावनांना कवितेत गुंफून सुंदर भाव भरूया.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत नि वाचकही आपल्यातलेच आहेत. आम्ही आपल्याला कवितांसाठी काही अलंकार देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही.
अलंकार -
यमक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंधमुक्त मी बंधमुक्त मी बंधित झालो कसा?
बंधित झालो कसा? ते या मुक्तमालेला पुसा.

Happy मुक्तमाला बाईंच्या नवर्याने घेतलेला उखाणा Proud

चतुर चपळ तो ससा झोपला दिसा
धावला मागुती गडमाथ्या तीरसा
परि न ये भरवसा हसे कसनुसा
बघताचि कासवा होई वेडापिसा
म्हणे तू येशी कसा, अरे राजसा
मज वेग तुझा ठाउका नसे फारसा
कूर्म हसे मंदसा, सुजनहो परिसा
नित,संतत श्रमकरी, हरेल कधी कैसा

होळीचा रंग
पुरणपोळीचा संग
सगळेच झाले दोन्हीत दंग.