रविवार माझ्या आवडीचा

Submitted by Pradipbhau on 28 February, 2018 - 21:18

तुमचा आवडता वार कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर डोळे झाकून कोणताही विचार न करता मी रविवार असेेेच उत्तर देईन. मला सहसा कोणी प्रश्न विचारण्याच्यानगडीत पडत नाही. मी देखील विचार करून नेहमीच उत्तर देतो असेही नाही. माझी बरीच उत्तरे मोघम असतात. त्यातील हे एक उत्तर.
आता मला रविवार का आवडतो त्या पाठीमागे ठोस असे एकच कारण नाही. रविवारी खूप वेळ झोपायला मिळते. झोप हा माझा तसा विक पॉईंन्ट. झोपेतून जागे करणाऱ्या माणसाचा मला खूप राग येतो. माझ्यात व बायकोच्यात मतभेद होण्याचे बहुदा हेच एकमेव कारण असते. तिला सूर्योदयाच्या आत उठण्याची सवय. मी कधीतरीच सूर्योदय पाहतो. तशी बायको खूप समंजस आहे. ती कधीच मला झोपेतून उठवण्याच्या भानगडीत पडत नाही.
कधी तरी पाहुणे येणार असले तर मात्र तिच्या अहो उठला का आठ वाजलेत. आत्ता पाहुणे येतील अशा हाका वर हाका सुरू असतात. पाहुण्यांना आमच्याकडे येण्यासाठी सकालचीच वेळ कशी सापडते हे मला आजवर न उल गडलेले एक कोडेचआहे. त्यात रविवार असला तर माझा रागाचा पारा आणखीच चढतो. एक दिवस सुट्टी असते तर ही पा हुुणे मंंडळी नेमकी याच दिवशी कडमडतात.
आता तुम्ही म्हणाल असे काय आहे रविवारच्या दिवशी. अहो आठवडाभर आलेला थकवा दूर करण्याचा हा दिवस. बाबा शाळेत सोडायला चला अशी मुलांची भुणभुण नसते. डबा तयार आहे .आवरा पटपट.ऑफिस ला जायचे नाही का अशी बायकोची बडबड नसते. शनिवारी मित्रांसोबत मस्त पार्टी करून रात्री एक दोन पेग जास्त झाले तरी चिंता नसते.
सकाळी पाहिजे तेंव्हा उठून तासभर क्रिकेट खेळून आंघोळ केली तरी चालते. बायको गरमागरम नाष्टा करते. रविवार असल्याने जेवणाचा बेत चांगला असतो. डब्यातील तीच तीच भाजी पानात नसते. दुपारी सिनेमाचा बेत असतो. पाच वाजता मॉल मधील शॉपिंग असते. रात्री पुन्हा हॉटेलचा बेत असतो. दिवस कसा मस्त जातो.
फायलीच्या ढिगाऱ्यात बसून बॉसची कटकट ऐकावी लागत नाही . जाण्यायेण्यासाठी धावाधाव करावी लागत नाही. डब्यातील गार जेवण जेवावे लागत नाही . मग सांगा रविवार का नाही आवडणार.
हा काही वेळेस मात्र मला बायकोचा भलताच राग येतो. नेमके रविवारी ती घर आवरायला काढते. झाडलोट, फरशी पुुसणे, कपडेधुणे नेमके रविवारी निघते. हाताखाली मोफत गडी मिळतो ना. ती तर ही संधी कशी सोडणार. रविवारचा आणखी एक फायदा म्हणजे बायकोशी प्रेम करण्याची संधी मिळते. अर्थात बाईसाहेब मूडमध्ये असल्या तर. नाहीतर तिच्या पेक्षा ऑफिस मधील सहकारी परवडली असे म्हणण्याची वेळ येते.
रविवार हा प्रत्येक वेळी आनंदाचाच जाईल याची मात्र खात्री देता येत नाही. एखाद्या रविवारी आपण मस्तपैकी प्लॅनिंग करावे अन तिच्या माहेरचे कोणीतरी नेमके यावे यासारखे दुर्दैव दुसरे कोणतेही नाही. माहेरचे कोण आले की नवऱ्याला मी कसे मुठीत ठेवले आहे हे दाखवण्याची संधीच बायकांना लाभते. आपण अंथरुणात मस्त पैकी पडून रहावे तोच हिची आरोळी, अहो झोपलात काय, जावा लवकर, श्रीखंडाच्या दोन पि शव्या घेेेऊन या. तुम्हाला कसलं मेल ते कौतुकच नाही. किती दिवसांनी माझे आई बाबा आलेत. बस झाली तुमची विश्रांती.
तर असा हा रविवार. दरवेळी माझ्या जगण्याला कलाटणी देणारा. तो मी कसा विसरीन. रविवारी खरच मी मनाचा राजा असतो. पण काही वेळेस नको तो रविवार असे वाटते.
एकदा असाच रविवारी निवांतपणे पडून होतो. टीव्हीवर मालिका पहात होतो. अंगात बनियन, बरमुडा असा पेहराव. तेवढ्यात बाईसाहेबांची मैत्रीण टपकली. दोघींंच्या गप्पा टप्पा हास्य विनोद झाले. जाता जाता तीने बायकोला काय कानमंत्र दिला कोणास ठाऊक. ती गेली अन बायको बोलू लागली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त
मलाही मनापासुन आवडतो रविवार

मस्त पडुन राहायच दहा वाजेपर्यंत

मला बायको नाही पन एक जीएफ आहे सतत डोक्याला ताप देत असते

जीएफपेक्षा बायको बरी.