विज्ञान निष्ठ बनणे काळाची गरज
आज जागतिक विज्ञान दिन. अंधश्रद्धा निर्मूलन करून विज्ञानाची कास धरण्यासाठी संकल्प करण्याचा आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. ग्रामीण भागाची शहरिकरणाकडे वाटचाल सुरू असली तरी अंधश्रद्धेच्या विळख्यातून हा परिसर अद्याप दूर झालेला नाही. आजच्या युवा पिढीकडून त्या दृष्टीने योगदान होण्याची गरज आहे.
फार पूर्वीपासून मानव व विज्ञान यांचे एक नाते आहे. विज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक शोध लावले. 21 व्या शतकात तर विज्ञानाला पर्याय नाही त्यामुळे त्याच्या शक्तीचे आकलन झालेच पाहिजे. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक जाणून घेण्यासाठी विज्ञान एक साधन म्हणून वापरणे एवढाच विज्ञानाचा संकुचित अर्थ घेऊन चालणार नाही.
विज्ञानाच्या शक्तीची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. बालपणापासूनच विज्ञानाची आवड निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक स्पर्धेतून विध्यार्थ्यांना सतत जागृत ठेवले पाहिजे. त्यांच्यात विज्ञानाबाबत उत्सुकता निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी शाळांतून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या जातात. मात्र त्यात शिक्षक व विध्यार्थी मनापासून किती सहभागी होतात हा संशोधनाचा विषय आहे. शासन स्तरावर शिक्षण विभागाच्या माध्यमातून मोठा निधी खर्च केला जातो. मात्र त्यातून काय साध्य होते याचा विचार न केलेला बरा.
मग प्रश्न असा निर्माण होतो की यासाठी नेमके काय करायचे? वक्तृत्व, भाषण, निबंध, प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन, वादविवाद याचा प्रभावीपणे वापर करून हे साध्य करता येईल.
आज मानवी जीवनाचा प्रत्येक भाग विज्ञानाशी जोडलेला आहे. विज्ञानाच्या अनेक व्याख्या प्रचलित आहेत. अभ्यास व सरावातून मिळविलेले ज्ञान म्हणजे विज्ञान. नैसर्गिक जग व त्यातील प्रक्रियांचा सखोलपणे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान. टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रीज, संगणक, रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या, बांधकाम, अन्न शिजवणे दैनंदिन जीवनातील कोणतीही बाब घ्या. त्यामागे विज्ञान आहे.
शैक्षणिक, वैध्यकीय, शेती, अणू, वस्त्रोद्योग, खगोलशास्त्र, संख्याशास्त्र, दृक्श्राव्य माध्यमे सर्वार्थाने विज्ञानाशी जोडलेली आहेत. विकास व अनर्थ दोन्ही गोष्टी घडवुन आणण्याची ताकद विज्ञानाने मानवास दिली आहे. अंतराळातील गूढ उकलण्यास विज्ञानच कारणीभूत ठरले आहे. बिज्ञानाचा वापर कसा करायचा हे ज्याचे त्याला कळले पाहिजे.
दिवसेंदिवस विज्ञानाच्या शाखा रुंदावत चालल्या आहेत. शाळा महाविद्यालयात पुस्तकी ज्ञान न देता विज्ञानाच्या माध्यमातून दिले गेले पाहिजे. आजची पिढी शार्प आहे. दिवसेंदिवस त्यांच्या बुद्धिमत्तेत अधिक प्रगल्भशीलता येत आहे. शिक्षकांना गप्प बसविण्याइतपत ज्ञान आजच्या मुलांकडे आहे. त्याचा योग्य वापर होण्याची गरज आहे.
माझी नात केजी मध्ये आहे. ती सफाईदार पणे मोबाईल लॅपटॉप हाताळू शकते. हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. तुमच्या घरातही तुम्हाला याची प्रचिती येत असेल. थोडक्यात काय तर आपण मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. असे म्हणतात की ज्या शाळेतील विज्ञानशिक्षक जेवढा सक्रिय तेवढी त्या शाळेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असते.
केवळ वैज्ञानिकांचे फोटो ठेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून विज्ञान दिनाकडे न पाहता मुलात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे
प्रदीप जोशी उंड्री
मोबाईल.. 9881157709
( लेखक सेवानिवृत्त पर्यवेक्षक व जेष्ठ पत्रकार आहेत)
विज्ञान निष्ठ बनणे काळाची गरज
Submitted by Pradipbhau on 28 February, 2018 - 00:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विज्ञान हे माझ्या डोक्यावरुन,
विज्ञान हे माझ्या डोक्यावरुन, मनावरुन, हृदयावरुन, आकलनावरुन गेल्याने मी सायन्स ला ना जाता आधी कॉमर्स करुन मग आर्ट्स केले.
हा लेख सत्यपालसिंह यांना
हा लेख सत्यपालसिंह यांना पाठवा, त्यांना हे जाणुन घेण्याची गरज आहे!
ज्या ज्या वेळी
ज्या ज्या वेळी अंधश्रेध्देविषयी बोलण्याचा प्रसंग येतो तेंव्हा विज्ञानाबाबत समोरच्याला सर्व काही मान्य असते,पण तरीही त्यांचा " या जगाला चालविणारा, निर्माण करणारा कोणीतरी असलाच पाहिजे ना ? " असा प्रश्न येतोच. यावरुन विज्ञान मान्य करावयास त्यांचा नकारच असतो. खरं म्हणजे विज्ञानाचे फायदे सर्व उपभोगावयाचे, पण त्याची महती नाकारायची ही विसंगती होय.
सुन्दर लेख. नवि पिढी आपल्या
सुन्दर लेख. नवि पिढी आपल्या आस पास घडत असलेल्या घटनान्चे अर्थ कसे लावते हे बर्याच अन्शी पालकानी आणि शिक्शकानी त्याना कसा विचार करायची सवय लावली आहे ह्यावर अवलम्बून आहे. प्रत्येक घटनेमागे कार्यकारण भाव असतो हे त्याना समजवण्यची जबाबदारी मोठ्यान्चीच. हे सोपे नाही हे नक्की. पण अशक्यही नाही.