मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - २८ फेब्रुवारी २०१८ - स्वभावोक्ती

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2018 - 22:14

काव्यालंकार
खरंतर एखादी कविता म्हणजे शब्दाची रचना नव्हे. यमक जुळवले की कविता होत नाही तर ती कविता वाचल्यानंतर जे भाव मनात उरतात ती कविता. कवितेला वय नसतं ,आयुष्य नसतं. विषयाचं ,वेळेचं, बंधन नसतं. शब्द भाव अमर असतात. तर अश्याच आपल्या सुंदर भावनांना कवितेत गुंफून सुंदर भाव भरूया.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत नि वाचकही आपल्यातलेच आहेत. आम्ही आपल्याला कवितांसाठी काही अलंकार देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही.
अलंकार -
स्वभावोक्ती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकरांनो, मोठ्या संख्येने खेळात सहभागी व्हा आणि खेळाचा आनंद लुटा Happy

केस तुझे सखे जणू
रेशमांनी विणलेले
बट त्यातली हळुच डोळ्यावर पडे
नयन तुझे पाणीदार
स्वप्नातच दंगलेले
कांती तुझी गव्हाळी
जणू गव्हाला सोन्याची झळाळी
अशी नखरेल तुझी अदा
ज्यावर आहे मी फिदा
आवर तुझ्या रुपाला
नको पाहूस तू अशी
नको करू असा नजरेचा वार
नको तुझे ते खळखळून हसणे
हाल मनाचे माझ्या होतात फार

संयोजक,
कविता करून त्यात अलंकार वापरणे माझ्या बुद्धी बाहेरचे काम आहे,
त्या ऐवजी हा अलंकार वापरलेल्या कवितेच्या 4 ओळी उद्धृत करू शकतो का?

स्वभावोक्ती अलंकार
एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.

कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणें सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के खुकले खालीं
तबकांत राहिले देठ, लवंगा, सालीं.

जोगीया - ग दि मा

मंद लयीत डौलदार चालीत,
लुकलुकणारे तेजस्वी धारदार डोळे,
दबकत दबकत घेई चाहूल.
सावज येताच टप्प्यात,
टिपतो क्षणात चपळाईने झेपावत.

हे चालेल का.

अक्षय दुधाळ मस्तच.

सिम्बा जोगिया सुरेख, मला फार आवडतो. यु ट्युबवर जाऊन बघते आता.