भोवताली चालती ही माणसे कुठल्या गतीने

Submitted by द्वैत on 27 February, 2018 - 01:01

भोवताली चालती ही माणसे कुठल्या गतीने
थांबती ना बैसती ना बोलती अपुल्या मतीने

जे हवे ते लाभले तरी वाटते सारे खुजे का? उंच शिखरे गाठती मग सावल्यांच्या संगतीने

प्रेम निष्ठा प्रीत वचने शब्द सारे पुस्तकी हे
ग्रासले बघ ह्या जगाला भावनांच्या विस्मृतीने

भासती सारे ऋतू तर सारखे आता आम्हाला
ही फुले फुलतात जाणे कोणत्या वेड्या प्रीतीने

Group content visibility: 
Public - accessible to all site users