रावणायन कादंबरीचा थोडक्यात आढावा

Submitted by निमिष_सोनार on 22 February, 2018 - 01:12

इंद्रायणी सावकार यांचे रावणायन नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल.

रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते.

रावण मंदोदरी यांची प्रेमकथा आणि प्रेम विवाह कसा झाला हे सुध्दा यात आपल्याला कळते. विष्णुचे द्वारपाल जय विजय आणि राम रावण कुंभकर्ण यांचा काय संबंध आहे, तसेच सिता ही लक्ष्मी होती का, रावण आणि शंकर यांच्यातील संबंध, पिनाक आणि सारंग या धनुष्यांची कथा या सगळ्यांचा यात उलगडा होतो.

असा होता सिकंदर सारखीच इंद्रायणी सावकार यांची शैली नेहमीप्रमाणे वाचन आनंद वाढवते.

नक्की वाचा! रा व णा य न

पुस्तक वाचायला घेण्याआधी आधीचे राम रावणाबद्दलचे असतील नसतील ते पूर्वग्रह बाजूला काढून ठेवा किंवा पेटीत बंद करून कुलूप लावा आणि पेटी माळ्यावर ठेऊन द्या. पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही ती पेटी काढून कुलूप उघडणार नाहीत!

नक्की! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असुर सारख आहे का?
म्हणजे अ‍ॅज अ थर्ड पर्सन आणि फॅण्टॅसी म्हणुन लिहिलेल?

नक्की वाचेन रावणायन! थँक यू निमिषजी, तुमच्यामुळे या पुस्तकाबद्दल कळलं आज!

भारतातले प्रसिद्ध पुराण अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांचे 'सीता' मी वाचले आहे, त्यात सुद्धा सीतेबद्दल, राम-लक्ष्मणाबद्दल, हनुमान('हनुमानाचे रामायण' हि बऱ्याच लोकांना माहित नसलेली कथाही यात दिलेली आहे), सुग्रीव, वाली, रावण आणि अजून बऱ्याच रामायणामधील घटनांबद्दल अनेक माहित नसलेल्या गोष्टी दिलेल्या आहेत. ते सुद्धा जरूर वाचा! and in the same way, देवदत्त यांच्याच 'जय' मध्ये महाभारतातील अनेक माहित नसलेल्या गोष्टी दिलेल्या आहेत. हि दोन्ही पुस्तके आपल्याला लहानपणी जे रामायण महाभारत शिकवले असते त्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतात. खूप अभ्यास करून हि पुस्तके देवदत्त यांनी लिहिलेली आहेत, या आधी लिहिलेल्या रामायण महाभारतांवरील पुस्तकांचा, त्यांवर आधारित कलांचा, मंदिरांचा देशभर फिरून त्यांनी अभ्यास केला आहे. Strongly recommended.