मराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - रसग्रहण

Submitted by मभा दिन संयोजक on 21 February, 2018 - 01:27

रसग्रहण

'ओळखीच्या वाऱ्या तुझे घर कुठे सांग? गरूडाच्या पंखामध्ये डोंगरांची रांग'. 'देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे' 'हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे', 'एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने', या सहज गुणगुणता येण्याजोग्या कवितांनी पिढयानपिढयांना भुरळ पाडली. कुमारवयात शाळेत शिकलेली कविता किंवा धडा आपण कितीही मोठे झालो तरी ती कविता आपल्यासमोर आली की आपण थेट कुमारवयात जातो. आपल्या मनाच्या कप्प्यात या कवितांनी कायमचे घर केलेले असते. अश्याच काही मोजक्या कवींच्या पंगतीत बालकवी, विंदा करंदीकर, केशवसुत ही मंडळी बसतात.ह्यांच्या कवितेत सौंदर्य होते, तत्वज्ञान होते, त्यातल्या शब्दांना नादमाधुर्य असायचे. त्यामुळे चांगल्या संगीतकारांच्या हातात पडल्यावर त्यांना अवीट गोडी प्राप्त झाली. तीस पस्तीस वर्षांपूर्वी त्यातली कांही गाणी स्वरबध्द केली गेली आणि आजसुध्दा ती ऐकली जात आहेत, यावरून त्यांचे काव्य किती अजरामर आहे याची कल्पना येईल.

यंदाचं वर्ष म्हणजे बालकवी यांच स्मृतिशताब्दी वर्ष आणि विंदा करंदीकर यांचं जन्म शताब्दी वर्ष.या उपक्रमात तुम्हाला बालकवी, विंदा करंदीकर, केशवसुत रचित तुमच्या आवडत्या कवितेबद्दलचे/कविता संग्रहाबद्दलचे/ त्यांच्या साहित्यिक प्रवासाचे तुमचे विचार शब्दबद्ध करायचे आहेत, त्या कवितेचं रसग्रहण करायचं आहे.

नियम -
१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) लिखाणाला शब्दमर्यादा नाही.
३) प्रवेशिका देण्यासाठी मराठी भाषा दिन - २०१८ ह्या ग्रुपाचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा.
४) धाग्याचे शीर्षक रसग्रहण- <<< कविचे नाव >>>> - <<कवितेचे शीर्षक >>- <<< आयडी >>>> ह्या प्रमाणे द्यावे.
५) एका आयडीने कितीही प्रवेशिका देता येतील.
६) या उपक्रमातील धागे २७ फेब्रुवारी २०१८ ते २ मार्च २०१८ या दिवसांतच काढावेत.

तळटीप -वर उल्लेख केलेल्या कविंपैकी केशवसुत आणि बालकवी ह्यांच्या कविता प्रताधिकारमुक्त आहेत. तसेच विंदा करंदीकर ह्यांच्या कवितांचे रसग्रहण करताना कवितेच्या ओळींचा उल्लेख लेखात करता यावा ह्यासाठी मायबोली प्रशासनाने परवानगी घेतली आहे. इतर कोणत्याही कविंच्या कविता ज्या प्रताधिकारमुक्त नाहीत, त्या ह्या उपक्रमात घेता येणार नाहीत.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा!
(तेवढं 'केशवसुत' दुरुस्त करता का? Happy )

विं दा करंदीकर पण दुरुस्त करा मग Happy विं दा ही इनिशियल्स नाहीत. विंदा करंदीकर असंच हवं ते. (विंदा हा गोविंद चा शॉर्ट फॉर्म आहे)

भरत, तुम्ही सोमवार पर्यंत रसग्रहण लिहू शकता.

Submitted by मभा दिन संयोजक on 1 March, 2018 - 11:38
हे फक्त भरत. यांच्यासाठी आहे की सर्वांसाठी?