सांग ना कोठून मन व्हर्जीन आणू ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 February, 2018 - 10:34

संपूर्ण गझल...

रंगमंचावर हवा तो सीन आणू
घालुनी डोळ्यांमधे ग्लिसरीन आणू

तोडले गेलेत लचके लाखवेळा
सांग ना कोठून मन व्हर्जीन आणू ?

कुंडलीमधले जुने फिरलेत सारे
कोणते तारे नवे जामीन आणू ?

यायची डोळ्यात पाहुन झिंग ज्याच्या
तो विचारे व्होडका की जीन आणू ?

संसदेतिल टाळुया गंभीर मुद्दे
ऐरणीवरती विचाराधीन आणू

एक खांदा वापरू माझाच तोवर...
अंत्ययात्रेला कसेसे तीन आणू

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>
एक खांदा वापरू माझाच तोवर...
अंत्ययात्रेला कसेसे तीन आणू
<<<
जबरदस्त...