सांज वेळ

Submitted by रुतु.. on 16 February, 2018 - 04:17

सांज वेळ
नुकतच लग्न झालेली प्रीती कालच माहेरी आली होती .सगळं घर तिचा मागे पुढे करत होतं.घरात इतर नातेवाईकांची रेल-चेल चालू झाली होती .सर्व प्रीती ला भेटायला येत होती .तिची विचारपूस करत होते लग्न झाल्यानंतचा प्रीतीचा रूपाची कौतुकाने न्याहाळणी करत होते .प्रीती पण आनंदाने सगळ्यांना भेटत होती आपली सासू ,सासरे ,नवरा ,आपला लग्नानंतर बदललेल्या वेळापत्रकाची यथोवांछित माहिती सगळ्यांना देत होती .शेजारचे हि घरात डोकावून जात होते .एकंदरीत प्रीती चा येण्याने घरचं वातावरण बहरले होते दसऱ्या-दिवाळी सारखा उत्साह घरात ओसंडून वाहत होता .

दोन दिवस कसे गेले तिला कळलंच नाही गोतावळ,सक्खे – सोयऱ्यांचा गर्दीत प्रीती गुडूप झाली होती .त्यात बाहेरची खरीदी आई बरोबर शॉपिंग , हॉटेलींग ला जणू उधाण आला होता .आई लेकी करता कपडे ,आधुनिक स्वयंपाकाची भांडी ,एक ना अनेक प्रकार खरेदी करत होती.
एके संध्याकाळी एक दूर चे नातेवाईक त्यांचा मुलाचा लग्नाचा रेसपशन चे आमंत्रण देऊन गेले .आई बाबांना रेसपशन ला जावं लागणार होतं .त्यानी प्रीतीला हि रेसपशन ला येण्याचा चा आग्रह धरला पण "आम्हाला पत्रिका नाही तर मी कशी येऊ आई ? तुम्हीच जाऊन या .." प्रीती झटकन उत्तरली .हे बोलल्यावर तिला जरा वेगळच वाटलं .तो तिचा बोलण्यातला आम्ही आणि तुम्ही चा फरक जरा बोचलाच तिचा जीवाला..मी असं काय परक्या सारखं रिऍक्ट केलं ? शी खूपच खजील वाटलं तिला !

संध्याकाळी तय्यार होऊन आई बाबा रेसेपशन ला निघून गेले .प्रीती ने दरवाजा काळजी पूर्वक लावून घेतला .घर अगदीच मोकळं वाटायला लागला .ती स्वयंपाकघरात गेली तिकडची भांडयां ची रचना वेगळीच वाटली तिला .आधी सर्व डबे ,वस्तू तिचा हाताचाखालचा होत्या .आता तिला काही सापडतच नव्हतं ..नजरेला सर्व बदललेले वाटत होते कदाचित मला या KITCHEN ची सवय मोडली असेल का ? असं विचार तिचा मनात आला आणि तिला अगदीच तिर्हाईका सारखे वाटले .पाहुण्या सारखा ... अवघडल्यासारखं
ती बाल्कनीमध्ये जाऊन शांत बसली ..वाहता रास्ता गाड्याची रेलचेल ,येणारी जाणारी लोक सगळं काही धावतं,वर्दळीचे ,एरवी आई घरी नसली कि ती मधुरा कडे जात असे किती धम्मल यायची तिचा घरी बसून भंकस करायला .आज तिला तिचा कडे जावेसे वाटत नव्हते म्हणून तिलाच चमत्कारिक वाटलं.मधुरा म्हणजे प्रीती ची जीवस्य-कंठस्थ बालमैत्रीण ."कशाला त्या लोकांनां कडे जायचे " ..लोकं ..ती स्वतःचा मनाशीच पुटपुटली .काल पर्वा ची आपली जवळीक असलेली माणसे आपल्याला लोक वाटायला लागली आहेत का? तिचे विचार थांबले .ती स्तब्ध झाली ,लक्ख वीज चमकावी अशी तिला त्याची प्रकर्षाने आठवण आली .अजिंक्य ...तिचा मनात अजिंक्य हे नाव वादळागत घोळू लागले .कुठे असेल तो ?काय करत असेल? ? त्याला माझी आठवण येत असेल का ? तो माझ्या बद्दल काय विचार करत असेल ? हे आणि असे असंख्य विचारांनी क्षणात तिचा सर्वस्वाचा ताबा घेतला ,मनात विचित्र खळबळ माजली .नकळतच तिला दिसणाऱ्या माणसांचा लोंढ्यात तिचे डोळे त्याला शोधू लागले ..पाहता पाहत ती विचारांचा आसमंतात खोलच खोल रुतत गेली .

अजिंक्य प्रधान कॉलेज मधला अतिशय हुशार मुलगा .खेळ,अभ्यासक्रम ,वक्तृत्व सर्वात अव्वल ..कॉलेज चे पाहिलंच वर्ष होते ते; शाळे चा कडक शिस्ती नंतर कॉलेजचे बिनधास्त वातावरण हे गर्मीतल्या थंड झुळूक प्रमाणे होतं .मोकळं,मस्त ...नवनवीन मित्र मैत्रीण ,नवनवीन कपडे ,सर्व मना सारखं..मित्रमैत्रिणींचा गर्दीत एक मुलगा सर्वां पेक्षा वेगळा वाटायचा शांत,थोडा मुलींशी कमी बोलणारा..तो म्हणजे अजिंक्य .त्याला हि प्रीती कॉलेज चा पहिल्या दिवसा पासून आवडली होती, त्याचा नजरेतूनच कळायचं ते .. .अतिशय देखणी,हसरीआणि स्वछंद..एकामेकांचा नजरेतले प्रेम ओळखण्या इतपत ते जाणते होते आणि मित्र मैत्रिणींची साथ असल्या कारणाने अजिंक्य नि आपल्या प्रेमाची कबुली प्रीती समोर काही दिवसातच दिली होती ."
त्याच संध्याकाळी "MY GOD मधुरा ;अजिंक्य नि मला आज प्रोपोस केलं ..आई शपथ..डायरेक्ट बोलला ग "प्रीती मला तू खूप आवडतेस I LOVE YOU… PLEASE मला हो म्हण " असं म्हणत प्रीतीने मधुराला घट्ट मिठी मारली . .दोघी अक्षरशः नाचत होत्या आनंदाने त्या दिवशी .

मग काय प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागले ,दोघांना कसं हलकं वाटत होतं वाऱ्यांनी अलगद पान हलत तितकेच. .दिवस भर प्रीती अजिंक्य चा विचारात डुंबलेली असायची .सर्व काही त्याचा साठी आणि तो बोलला म्हणूनच किव्वा त्याला आवडते म्हणून खास असायचं .अभ्यासाकडे बरेच दुलक्ष होत होतं .तिचा वागण्यातला फरक प्रीतीचा आईने हेरला होतं.पण तिला दटावून विचारताच प्रीती "काही नाही ग आई ...काहीही बोलतेस असा म्हणून थोडीशी सतर्क व्हायची.पण हि सतर्कता तात्पुरती असायची तिचे तिचा वागण्यावर नियंत्रण थोडीच होते??

प्रीती जेवढी खेळकर,चंचल तितकाच अजिंक्य गंभीर ,मितभाषी, फोकस्ड आणि प्रॅक्टिकल होता.प्रीती अजिंक्य वर भावनिक रित्या पूर्णपणे विसंबून होती .अजिंक्य आणि तिचा वाद झाला कि प्रीती चे जगच थांबून जाई.बरेचदा वादचा विषय म्हणजे अजिंक्य ची आई असे. जिच्याबद्दल अजिंक्य अतिशय पोसेसिव्ह होता .
पाहता पाहता कॉलेज ची गोड गुलाबी वर्ष सरून गेली. या वेळात प्रीती आणि अजिंक्य ची जोडी कॉलेज मध्ये फेमस झाली होती .प्रीतीचा आजू बाजू चा वस्तीत कुजबुज होऊ लागली.दोघांचा आई समोर अजिंक्य -प्रीती चा प्रेमाचा शिक्का-मोर्तब झाला होता .आपल्या आईचा विरोधात जाऊन प्रीती आता अजिंक्य सोबत लग्नाची स्वप्न पाहू लागली .कोणाचाच विरोध न जुमानता प्रीती आणि अजिंक्य चे फिरणे,बोलणे चालूच होते .त्यांचा प्रेम दिवसं दिवस द्विगुणित होत होतं.

अजिंक्य आता MS करत होता त्याला SURGEON बनायचे होते .त्याची घरची परिस्तिथी अतिशय हलाखीची होती .अजिंक्य लहान असतांनाच त्याचे वडील निधन पावल्यामूळे त्याचा शिक्षणाचे ओझे एकट्या आई नि खांद्यावर पेलले होते .अतोनात काबाड कष्ट करून अजिंक्यचा वाडिलांचे त्याला शैल्य चिकित्सक बनवायचा स्वप्नाला अस्तित्वात उतरवण्याचा अठ्ठाहास ती माउली दिवसरात्र करत होती . ज्याची पूर्णपने जाणीव अजिंक्यला होती .त्यांचे हे स्वप्न साकारताना किती तरी गोष्टींची हसत आहुती देताना त्यानी त्याचा आईला पहिले होते . आपल्या आईचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द हेच त्याचे समीकरण होते .आपल्या आई वडिलांचे स्वप्न जगण्याचा तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता .
प्रीती ची घरची श्रीमंती होती .तिचा राहणीमान ,बोलणं हे अजिंक्य चा आईला उच्चब्रू .अवाजवी,भपके बाज वाटे."हांतरूण पाहून पाय पसरायचे असतात" असे म्हणून ती वेळोवेळी प्रीती चा तिरस्कार आपल्या लेका समोर दर्शवत होती .पण आपल्या पहिल्या प्रेमला पूर्णविराम देणे त्याचा अवाक्या बाहेरचे होते .कुठून काही चमत्कार होईल आणि आई प्रीतीचा स्वीकार करेल अशी त्याची मनशा होती .त्याची आई थोड्या जुन्या वळणाची असल्याने आपल्या आईला जसं आवडेल तसं प्रीती ने आपल्या वागण्या बोलण्यात बदल करावा असा अजिंक्य चा प्रयत्न असायचा .प्रीतीला ते मुळीच पटायचे नाही पण प्रेमाखातर तिने हे आवाहन हि स्वीकारले होते .

प्रीतीचे बाबा जेव्हा तिचा लग्न करता स्थळ पाहू लागली तेव्हा प्रीती चा पायाखालची जमीनच सरकली .ती अजिंक्य सोडून दुऱ्या कोना सोबत लग्न करायचा विचारच करू शकत नव्हती .अजिंक्य चा कानावर तिने हि बातमी टाकताच तो खचला कारण आपली आई प्रीतीचा सून म्हणून स्वीकार कधीच करणार नव्हती हे त्याला मनोमन माहित होते .आईकडे प्रीतीचा विषयाबाबत सामोरे जाण्याची गोष्ट त्याने वर्षानु वर्ष टाळली होती पण आता मात्र त्या गोष्टीला सामोरे जाण्या ची वेळ अली होती म्हणून तो चिंताग्रस्त झाला .त्यातच MS करण्या साठी LONDON मेडिकल असोसिएशन मधून त्याला शिष्यवृत्ती साठी कॉल आला होता ; तिकडे जाऊन MS पूर्ण करण्या करता जो काही खर्च येईल तो भागवायला त्याने गडगंज लोन घेतले होते ज्याची फेड तो एका ठिकाणी नोकरी करून करत होता.अशा प्रकारे अगदीच आणीबाणीची परिस्तिथी निर्माण झाली “आपण काळाचा कचाट्यात फसलो आहोत का ?” असा त्याला सारखे वाटत होते एकी कडे आपले भविष्य आपल्याला खुल्या हातानी खुणवत आहे जिथे आपण आपल्या आईचे वर्षानुवर्षाचे चे स्वप्न पूर्ण करू शकणार आहोत तर दुसरी कडे त्याचे प्रेम त्याचा श्वास त्याचा प्रीती चा आई दिवसेनदिवस तिरस्कार करत होती .

एके सांजवेळी अजिंक्य हिम्मत एकवटून घरी आला आणि थेट प्रीतीचा विषय आई समोर मांडला बिनधास्त ,बिन्धिक्कत ,आईला नजरे ला नजर करत ..तोडून दिला बांध मनाचा जो इतक्या वर्ष जपलेला .भिडस्तपने आपल्या इतक्या वर्षाचे प्रेम आईचा पायथ्याशी ठेवलं पण इतक्या वर्षा पासून मनाने हळवी आणि मृदू ममते ची सावली वाटणारी आपली आई नियती चा चोपाने इतकी व्यावहारिक आणि कठीण मनाची झाली होती कि तिला त्यांचं प्रेम कवडी मोलहि वाटलं नाही .प्रीती ला आपली सून करण्या चा प्रस्तावाला तिने अक्षरशः पायाने धुडकावलं .तिचा मते त्याचे स्वास्थ विदेशात जाऊन आपले MS पूर्ण करण्यात होतं प्रीती मूळे त्याची दिशा भूल होत होती ,शिक्षणाचा दृष्टी ने ती त्याचा तोडीची बिलकुलच नव्हते त्यात तिचा वागणं तिला अजिबातच रुचायचे नाही ,ती मुळात त्याचा तोडीस तोड नव्हतीच असा आईचा म्हणणं होतं ..वाद,भांडण,क्रोध ,क्लेश ,नकार,प्रितिकार सर्व काही घडून गेले अश्रूनी ती सांज काठो काठ भरून गेली .अजिंक्यला सर्व काही निष्क्रिय वाटू लागले .

तिथे प्रीती चा आईने प्रीती आपल्या शब्दाला जुमानत नाही हे पाहून तिचा बाबांना सर्व हकीकत सांगितली .प्रीती ला आई बाबांनि आपल्याला मिळते जुळते स्टेटस असणाऱ्या मुलाशी तिने लग्न करावे अशी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला .जीवनाचा कठीण प्रवासात पैसे ,इब्रत ,ऐपत महत्वाची असते आणि जो मुलगा आपल्या आई चा इतका आज्ञेत असून तीला इतका घाबरतो तो काय भरोसा प्रीती शी MS झाल्यावर लग्न करेल याचा ;त्यांचा मते त्याला जर प्रितीशी लग्न करायचे असते तर तो इतक्या वर्षात त्याचा आईचे मन वळवू शकला असता ..प्रीती ची आई "आम्ही लोकांना काय उत्तर द्याचे "म्हणून रडून उच्छाद मांडायची .एके दिवशी वादाला वाद पेटला आणि प्रीती आपले ऐकातच नाही हे पाहून आईनी स्वात:लाच मुस्काटीत मारून घेतल्या तरीही प्रीतीचा अजिंक्य शी लग्न करण्याचा आडमुठेपण चालूच होता.हे दृश्य पाहून बाबानी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या पिल्लाला त्यांचा प्रीतीला चार पाच मुस्काटात लागाउंन दिल्या होत्या .प्रीती जमीन वर वेगाने कोसळली डोळयात अश्रुनचा पूर आला पण तोंडातून एक अक्षरहि उमटले नाही .बाबांचे हाथ थर थर कापू लागले ..ते तणतणत खोलीतून निघून गेले ..त्या रात्री घरी कोणीच जेवलं नाही,कुणीच कोणाशी बोललं नाही,घरात कधीहि नसंपणारी भयाण स्मशान शांतता पसरली .....खूप दिवस असेच लोटले ना अजिंक्य चा काही फोन आला ना प्रीती नि त्याला मधुरा कडे काही निरोप पाठवला .

एके दिवशी सकाळीच प्रीतीचा बेडरूम मध्ये प्रीती ची आई आली, तिचा हातात जन्म कुंडली सरखे काही तरी खोचत बोलली हे वाच ..त्याचा वर ठसठशीत नाव लिहिला होते ऋषिकेश धर्माधिकारी .प्रीती नि आई कडे रोखून पहिले आणि आईला विचारला"हे काय ?" आई उत्तरली "हा मुलगा आम्ही तुझा साठी पसंत केला आहे इंजिनिअर आहे ,उंच कुळातील आहे आई वडील पुण्यला राहतात ..एकुलता एक आहे लग्न नंतर वर्षभरातच ऑस्ट्रेलिया मध्ये स्थायिक होणार आहे ..पाहून घे आत फोटो आहे ..उद्या बघायला येतायेत तुला" ..आई बोलतच गेली.......प्रीती चे हाथ पाय बधिर झाले खिन्न मनःस्तिथी नि ती ऐकत राहिली . ठरवल्या प्रमाणे पाहण्या चा कारेक्रम यथासांग पार पडला .त्यांनी होकार कळवला होता.. प्रीती त्यांना अतिशय भावली होती .

एका दुपारी गपचूप प्रीती मधुराच्या घरी गेली आणि तिने तिचा कडे अजिंक्यला "भेट" म्हणून निरोप पाठवला .नेहेमीचेच ठिकाणी नेहेमचाच वेळी .अजिंक्य वेळेचा पक्का होता प्रीती हि कधी नव्हे ते आज वेळेवर भेटायला आली होती .खूप महिन्यांनी भेटले दोघे .दोन्ही कडे एक अस्वस्थ शांतता ..दहा मिनिटे उलटून गेली ..न राहवून अजिंक्य ने विचारले कशी आहेस ...? त्याचा पहिलाच प्रस्न परका वाटला तिला."ठीक "तिने थोडक्यात उत्तर दिले .पुन्हा एकदा शांतता...प्रीती नि डोळ्याचा कोपऱ्यातून हळूच त्याला बघितले त्याची दाढी वाढलेली होती .डोळे लाल होते ..चेहेऱ्यावर प्रचंड ताण होता .."कशाला बोलावलस मला प्रीती "? अजिंक्य मला मुलगा बघायला आला होता ..त्यानी होकार कळवंला आहे .."तिचं वाक्य तोंडात होते तोच मधेच अजिंक्य बोलला "मग तू काय ठरवले आहेस ? " या वर प्रीती संतापाने बोलली "अजिंक्य काय चाललंय तू काय ठरवलस म्हणून काय विचारतोस ?असा परक्या सारखा का वागतोयस ? .अरे माझा घरचे लग्न ठरवतात माझं...""हे माझ्या प्रस्नचे उत्तर नाही प्रीती तू उत्तर का देत नाहीयेस मला "अजिंक्य ने मधेच तिचे वाक्य तोडलं त्याचा आवाज किंचित चढला . "चल पळून जाऊया आपण ;येतेस आहे हिम्मत तुझ्यात ? अजिंक्य आता थेट प्रीती चा डोळ्यात पाहून बोलत होता .प्रीती आतल्याआत हुंदके दाबत होती तिचे हृदय भरून आले होते .. "मला तू हवा आहेस ,मी तुझा वर जीवापाड प्रेम केलय अजिंक्य . .तुझी आई मला सून म्हणून स्वीकार करेल काय ..."प्रीती नि थोडा कचरत अजिंक्य चा आई या विषयाला हाथ घातला.."प्रीती हे माझ्या प्रश्न चे उत्तर नाही .."अजिंक्य ने मुद्देसूद उत्तर मागितले ."अजिंक्य तुझा आई ला काय प्रॉब्लेम आहे किती वर्ष झाली त्या बदल्याच नाहीत नुसती मला दूषणे देत फिरतात अजिंक्य मी पळून येऊ शकत नाही पण मला तुझाशी लग्न करायचे आहे .इतकी वर्ष तुला तुझा आई ला समजवायला सांगायचे तेव्हा तु त्यांचा समोर माझा विषय काढायची हिम्मत पण करायचा नाहीस प्रेत्येक वेळेस ती लग्नाला होकार देईल म्हणून मला आश्वासन देत आलास माझाशी तुझा आईचा विषया वरून भांडत राहिलास आता बघ झालं ना त्यांचा मना सारखे हेच हवे होतं ना तुझा आईला ....."प्रीती क्रोधाने बडबडत चालली होती .आपल्या आई बद्दल इतके कटू शब्द त्याला ऐकवले नाहीत त्याचा हि रागाचा पारा चढला अजिंक्य अनावर होऊन बोलला "तुझा घरचे इतके सुशिक्षित आहेत ना मग का नकार देतात ते आपल्या लग्नाला शेवटी ते तुझा साठी श्रीमंत मुलगाच शोधतायेत ना ..स्वतःचे स्टेटस जपण्या साठी माझा वर सतत अविश्वास दाखवला आहे त्यांनी . जर मी माझा आई चा नकार पचउन तुला माझ्याबरोबर येण्याच सांगू शकतो तर तू तुझा घरचांचा विरुद्ध जाऊन माझा बरोबर पळून का येऊ शकत नाहीस ?कि तुझा पण विश्वास नाही माझयावर ..?? बोल प्रीती बोल ..चल माझा सोबत.." असं म्हणत अजिंक्यने हक्काने प्रीतीचा हाथ घट्ट आपल्या हातात पकडला .पण त्याची पकड तिला बळजबरीची आणि असह्य वाटली तिनी क्षणाचा हि विलंब न करता त्याचा हाथ वेगाने झटकला आणि अजिंक्य ने रीतसर घरी येऊन तिला मागणी घालावी म्हणून अट टाकली .आपल्या परिस्तिथीला तुच्छ लेखणारे , आपल्या बद्दल अविश्वास दाखवून आपल्या आई बद्दल घृणास्पद विचार करणाऱ्यांचा घरी येऊन त्यांचाच समोर त्यांचाच मुलीबरोबर लग्नाची भिख मागावी अशी अपेक्षा प्रीती करते हे अजिंक्यचा स्वाभिमानी स्वभावाला मुळीच मान्य नव्हतं.अजिंक्य रागाने धुमसत प्रीतीचा चेहेरा पाहत राहिला प्रीती खाली बघून ओक्षि -बोक्क्षी रडत राहिली...वातावरण तणाव नि पूर्णतः डबडबले धुमसणारी शांतते ने कल्लोळ माजवला होतं .सूर्य आता मावळला होता भयाण अंधार पसरत होता .....तसाच बराच वेळ उलटला एकाएकी अजिंक्य ताडकन उठला आणि कधी हि न थांबण्याचा वेगाने निघू लागला तिला त्याचा हाथ पकडून त्याला थांबवायचं होतं पण ती खिळल्यासारखी अजिंक्य ची पाठमोरी आकृती एकटक पाहत राहिली पाहता पाहता तो दिसेनासा झाला गर्दीत ...लोकां मध्ये ...खूप लांब ...
टिंग टॉंग ....टिंग टॉंग...दरवाजाची बेल वाजली .प्रीती दचकली ..भानावर आली ..आपले डोळे तिनी चटकन पुसले आणि लगबगीनी दार उघडायला झेपावली.आई बाबा आले होते ;"काय ग प्रीती झोपली होतीस कि काय ? आई हसत बोलली .प्रितीने मानेनेच "नाही "म्हणून खुणावलं .बहुदा ती अजिंक्य या विषय तुन बाहेर आली नव्हती ...

माहेरपणाचे चार दिवस सरले. जायचा दिवस उजाडला .प्रीती ची संध्याकाळची डोंबिवली ते पुण्याचे लक्सझरी बसचे बुकिंग झालेली होतं.प्रीती सकाळपासूनच गुमसुम होती सासरी कितीही सुखाचा ताट वाढले असले तरीही माहेर ची ओढ कमी होत नसते .आईचा सोबत खरेदी केलेल्या वस्तू प्रीती बॅग मध्ये शून्य मनःस्तिथीने भरात होती , तिचा मनात आलं "खूप काही दिलंत मला आई बाबा तुम्ही पण माझं सगळं देऊ शकला नाहीत मला .. "बरेचदा वाटलं अजिंक्य आपल्याला वाटेत दिसला तर आपण कसा रिऍक्ट होऊ ? त्याची प्रतिक्रिया काय असेल वगेरे ...मी आई बाबां समोर नातेवाईकांना समोर वागते,हसते ती ह्रिषीकेश ची बायको खरी कि ती अजिंक्यची प्रेयसी; जी अजूनही अजिंक्यचा पाठमोऱ्या आकृती कडे वाट पाहत बसली आहे ती खरी...प्रीती गोधळली आपण काहीतरी चुकीचे विचार करत आहोत असं विचार तिचा मनात आला आणि ह्रिषीकेशचा हसरा चेहरा चटकन तिचा डोळ्यासमोर आला .तिला क्षणभर अपराध्यासारखा वाटलं ...मग किती तरी वेळ तिचा हात गळ्यातील मंगळसूत्राशी खेळात बसला.

गाडी पकडायची वेळ होत होत सासरवाशिणीला सोडायला आई बाबा जडपावलाने निघाले .ऐत्यावेळेस जाताना धाव धाव होऊ नये म्हणून तिघेही बस स्टॉप वर लवकरच आले होते .प्रीती पहिल्यांदाच बस ने सासरी जाणार होती .काही कारणाने थोडीशी अंतर्मुख झाली होती .तिची नजर न जाणो का भिरभिरत होती तेव्हा तिची नजर रस्त्या पलीकडचा हॉस्पिटल चा पाटी वर खिळली.
DR. AJINKYA SURYAKANT PRADHAN
(M.S. General Surgery D.L.T.S.(London))
And
Dr .Mrs .AVIKA AJINKYA PRADHAN
(M.S. General Surgery D.L.T.S.(London))

तिची नजर परतपरत ती दोन नावे वाचू लागली डॉक्टर अजिंक्य आणि Dr .Mrs .AVIKA AJINKYA Pradhan .तिला मेल्याहून मेल्या सारखा झालं.अजिंक्य ने लग्न केलं ...ती मनात बोलत होती Dr AVIKA डॉक्टर ....ती भान हरपल्यागत शब्दयांचा उच्चार करत राहिली ."तोडीस तोड हेच का ते ?"....तिचे मन क्षणोक्षणी दुभंगत होतं कोणी झटक्यात एक घाव दोन तुकडे केल्या सारखे....रक्तरंजित होत होते तिचा नजरेत कुत्सित भाव होता पण डोळे गच्च पाणावले होते ..

आपण पण तर लग्न करून मोकळे झाले होतो तर त्यांनी अपवाद का राहावे.आयुष्य पुढे पुढे सरत राहते आपण फक्त नशिबाचे कटोरे घेऊन आशेने उभे राहायचे असते नियती आपल्या वाट्याला जे काही भीक घालेल त्याने आपली ओंजळी भरायची .'.ती मनातल्यामनात क्लेश करू लागली .परत एकदा सांज वेळ साक्षीदार होती या आघाताची मनात वादळ उठलं होतं , तो आजही आपला सर्वस्व आहे ;याची ग्वाही विचारांचा आवेग देत होता पण प्रीती समुद्रा प्रमाणे वरून शांत होती.. .समुद्राला भरती येते तेव्हा जसे लाटांवर लlटा किनाऱ्यावर आदळतात तसा आठवणींची जुनी मालिका झटक्यात डोक्यावर आघात करू लागल्या .एकादी जुनी जखम जरी भरली तरी त्याचे व्रण आमरण शरीरावर राहतात तसाच काही स वाटत होतं तिला पण ती काय करू शकणार होती..??काहीच नाही ....आता कातरवेळ झाली होती सूर्यास्त झाला होता ..हाच जीवनाचा नियम आहे का ?..उद्या परत सूर्योदय नवा दिवस नवी आशा आयुष्य थांबत नसतं आपण पुढे पुढे जायचे असते ..आपण फक्त काळाचा कठपुतळ्या आहोत आपल्याला काळ नाचवतो आपण गप्पा पणे नाचायचं तमाशा सुरु ठेवायचा श्वास चालू असे परियन्त कलाकारही आपण आणि प्रेक्षकही आपण ...द शो मस्ट गो ऑन अँड ऑन ....

बसची जोरदार हॉर्नने तिची तंद्री तोडली .यंत्रवतपणे ती बस मध्ये जाऊन बसली .आई बाबांना हाथ दाखवून त्याची लग्न झालेली प्रीती सासरी निघाली होती ,...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users