मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - २७ फेब्रुवारी २०१८ - अतिशयोक्ती

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

काव्यालंकार

खरंतर एखादी कविता म्हणजे शब्दाची रचना नव्हे. यमक जुळवले की कविता होत नाही तर ती कविता वाचल्यानंतर जे भाव मनात उरतात ती कविता. कवितेला वय नसतं ,आयुष्य नसतं. विषयाचं ,वेळेचं, बंधन नसतं. शब्द भाव अमर असतात. तर अश्याच आपल्या सुंदर भावनांना कवितेत गुंफून सुंदर भाव भरूया.

संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत नि वाचकही आपल्यातलेच आहेत. आम्ही आपल्याला कवितांसाठी काही अलंकार देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही.

अलंकार -
अतिशयोक्ती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मितव्ययी अर्धांगिनी, सु-मधुर वाचा..
जसा शांत प्रवाह 'नायगर्‍याचा'...!!

(दोन ओळी सुचल्यात....आणखी प्रसववेदना 'झेपल्या' नाहीत म्हणून आता झोपायला जातो...मायबोलीवरील विद्वत-वर्ग ही धुरा पुढे सांभाळेलच..)