कळले नाही त्याची होता होता

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 February, 2018 - 00:47

एक आठवण ताजी होता होता
तिचीच झाले माझी होता होता

गारपीट अश्रूंची गालांवरती
ऋतू कोपले राजी होता होता

माझ्यातुन मी केव्हा निसटुन गेले ?
कळले नाही त्याची होता होता

लढता लढता आत्मसमर्पण केले
थकून गेले झाशी होता होता

जन्मठेप ठोठवली मी इच्छान्ना
जरी वाचल्या फाशी होता होता

साय दुधाहुन जास्त गोड का असते ?
समजुन चुकले आजी होता होता

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users