मराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - ते दोघे

Submitted by मभा दिन संयोजक on 14 February, 2018 - 23:52

ते दोघे

बऱ्याचदा आपण समोरच्या दोन व्यक्तींचे हावभाव बघून त्यांच्यात नेमके काय बोलणे चाललंय याचा अंदाज लावतो. काही वेळा तो बरोबर असतो तर काही वेळा फसतो.

चित्रकार चित्रातून एखादी गोष्ट अगदी जिवंत करतो. पण निर्जीव वस्तूंचं काय, ते नेहमी एकमेकांसोबत असतात पण त्यांच्यात काय बोलणं चालत असेल बरं ! रात्री टीव्ही बंद केल्यावर जेव्हा रिमोट तिथे ठेऊन आपण झोपतो, तेव्हा म्हणत असतील का ते एकमेकांना "गुड नाईट" ? घरात येणारा प्रकाश किरण जेव्हा खिडकीला टांगलेला पडदा अडवतो तेव्हा होत असतील का त्यांच्यात सीमावाद ?? कदाचित होतही असतील असे संवाद. तर अश्याच दोन निर्जीव वस्तूंचं संभाषण तुम्हाला लिहायचं आहे.

नियम –
१) हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) लिखाण स्वलिखित असावे.
३) ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला मराठी भाषा दिवस २०१८ ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४) प्रवेशिका देण्यासाठी मराठी भाषा दिन २०१८ ह्या ग्रुपाचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा.
५) त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा : ते दोघे - <<संवाद कोणामधे आहे त्या वस्तूंची नावं >> - आयडी
६) एक आयडी एकापेक्षा जास्त संवाद लिहू शकतो.
७) या उपक्रमातील धागे २७ फेब्रुवारी २०१८ ते २ मार्च २०१८ या दिवसांतच काढावेत.

चला तर मग. सरसावा आपल्या बाह्या. कळफलक तर तुमच्या हातात असेलच. मायबोलीने वसा घेतला आहे. "ती उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही" याची काळजी तुम्हालाच करायची आहे. तेंव्हा सुरुवात करा लिहायला

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, २७ फेब ते २ मार्च या काळात धागा काढणे शक्य होणार नाही... Sad
तरीही उपक्रमात सहभागी व्हायचं असल्यास काही पर्याय आहे का?

नमस्कार ललिता-प्रीति, तुम्ही तुमचे लेख \ प्रवेशिका mabhadi@maayboli.com ह्या आयडीवर मेल करू शकता, आम्ही त्या ४ दिवसात नावाने प्रकाशित करू.