लय दिवस झाले. तुमका गजाल सांगाक गावली नाया. जरा कामात गुतलं हूतय.
झाला असां. आमचो सकलो मेरेकार औषधावालो माणुस. मेरेकार ह्या नाव तेच्या आज्याक पडला. त्यापासून हे सगळे मेरेकार झाले. पण सकलो मेरेकार कलाकार निघालो. काजीचो मोसम सुरू झालो काय सकल्याचा न्हेसान काय जाग्यावर ऱ्यवायचा नाय. लॉक काजींच्या पाठी तर ह्यो नरकडी ढोरासारखो बोंडाका भिरभिरायचो. १० वर्षापुर्वी टेंबावर आज्याच्या काळातली हूरलेली (बुजलेली ) डोणगी साफ करून तेतूर बोंडू गोळा करायचो. ते चांगले कुसले काय भिनभिनताना जावन ते गुडदावायचो. तेच्या पायांका कुसलेल्या काजीच्या बोडांचो वास घरातल्यांका थारो करायचो नाय. ते मोसमातले चार म्हयने सकलो भायल्या पडयेत झोपायचो. तेकाव वासान झोप लागायची नाय. पण आता काम केल्यान नाय तर बाकी वर्षभर उंडगाक कसा गावात ? मगे त्या बोंडवाच्या रसाची भट्टी लावायचो. तेचा सगळा काम वन म्यान शो हूता. मग तयार झालेलो पेटतो माल घेवन घराक यायचो आणि तेचो साठो करायचो. पेटतो माल म्हणजे काजीची दारू बॉटावर घेवन पेटवलास तर राकेलासारखी पेटतली. अगदी जळजळीत कडक माल. पिणारो पण घोटताना कसातरीच त्वांड करून पोटात ढकलायचो आणि मग मात्र हवेत तरंगायचो. सकल्याच्या घरात याक साधरानसा कपाट हूता तेच्यात तो सगळो माल लववून ठेवन द्यायचो. पुढे जशी मागणी येय तशी एक एक पैट भायर काढायचो. ही गोष्ट फक्त तेका आणि माका म्हायत हूती आणि भवतेक तेच्या बायलेक म्हायत आसात.
आसो तर ह्या सकल्याचा अगदी दहा वर्षापासना बरा चललेला. पंचक्रोशीत तेच्या मालाक जाम उठाव होतो. 'सकलोज फेणी' या ब्रॉंडनेमान तळीराम गोठात फेमस हूती. सकलो मागणी नुसार सगळीकडे माल पोचती करायचो. पण ह्या कोणाक तरी बघावला नाय. कोणीतरी पोलीसांका ह्या सगळा कळवल्यान. ही गोष्ट सकल्याच्या कानावर इली. तेचा नेटवर्क लय भारी हूता. एका पैटीच्या बदल्यात लाख मोलाची टिप गावली होती. फक्त सगळा कसा निस्तरायचा ता बघूचा हूता. सकलो जाम टेंशन मध्ये इलो. मे म्हयन्यातले दिवस. इचार करून करून डोक्याचा भुस्काट झाला. एवढ्या मालाचा करायचा काय? पोलीसांका गावलो तर सगळो जप्त होतोला आणि वर दंड . नेहमीची गिऱ्हाईका पण तुटतली. तेका त्या राती काय झोप लागली नाय.
दुसऱ्या दिवशी ११ वाजाच्या सुमारास साध्या येशातले पोलीस इले. सकल्याक आधीच बातमी लागलेली असल्यामुळे. कोण जरी इलो तर संशयान बघी. पोलीस चार जण हूते. तेतूरलो एक जण इल्या इल्या सकल्याकडे हातान बाटलीची खुना करीत माल हा काय इचारूक लागलो. सकलो पाटल्या दाराच्या पडयेच्या भिंतीचो पारो (मातीची भिंत तयार करत होता) घालीत हूतो. सकल्यान आपण तेंका वळकाकच नाय असा दाखयीत पान थुकान बोलाक लागलो.
"आमच्या कडे असला काय नाय बाबानू, माझो आजो ह्या करायचो, पण बापाशीपासना ह्या सगळा बंद केलाव. आम्ही असला काय इकनव नाय" सकलो तेच्या बारक्या झीलान हानून दिलला पाणी पित बोललो .
पण इलेली माणसा हार मानणारी थोडीच हूती. सकल्याक घोळात घेवक लागली. पण सकलो ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करीत ऱ्यवलो. तेंका कायच कळाक देयना. शेवटी त्यानी आपली ओळख सांगल्यानी आणि घराची झडती घेवक सुरवात केल्यानी. सकल्याची बायको पोटतना थोडी भियाली हूती पण दाखीत नाय हूती. पोलीस काय माय इचारी हूती तेचा सोयन देत हूती. पोलीसानी पुरा घर सोदल्यानी हाताक कायच गावाक नाय. तासभर सगळा इसकीत ऱ्यवले. हाताक कायच माल गावाक नाय. सादी जीएमची पैट पण नजरेक पडना. पोलीस हैरान झाले. शेवटी एका पोलीसान सकल्याच्या बारक्या झिलाक घेरल्यान , तेका प्रश्न इचारूक लागलो. तो पण बोलना. नाय म्हणाक कोबंडेच्या घुडाकडे बॉट दाखल्यान. थय जावन घुड उघडतत तर रवणेक बसलेली कोंबडी आंगार इली. तसे बाजूक झाले. नंतर सकल्याच्या मदतीन घुड तपासल्यानी. घुडात फक्त राकेलाच्यो बाटल्यो गावल्यो. पोलीसांचा हात हालवीत परत जावचा लागला. सकलो मनात गाजरा खावक लागलो. तेच्या बायलेन पण तेका बराच सांभाळून घीतल्यान. तिना हालीच अजय देवगन चो " दृश्यम " पिक्चर बघल्यान हूतो. त्यामुळे नवऱ्याचा काम म्हायत आसान पण आपल्या शब्दावर ठाम ऱ्यवली.
सगळे गेल्यावर बायलेन सकल्याक हळूच इचारल्यान .
"काय ओ, सगळी फेणयेची क्याना खय दडवलास खय? "
"ह्या, तुका पुढे भाताचे चार गोटे खावचे हत ना , मग ता सोडून काय ता इचार, ता राज हा तसाच ऱ्यवांदे." सकल्यान एवढा बोल्ल्यान पण मागच्या पडयेच्या भिंतीचो वरचो पारो (थर) तेच्या आंगार कोसाळलो आणि पाऱ्यात लिपलेली बारकी फेणयेची क्याना मातयेवांगडा खाली पडली.
ह्या बघून सकल्याची बायल हसत सुटली
"वायच जर पोलीस थांबले आसते तर, तुमची पाटलन काय धुवच्या लायकेची ऱ्यवली नसती, स्वताक काय दृश्यम मधलो ' विजय साळगांवकार' समाजतास काय?"
सकलो पण टकली खांजवीत हसत सुटलो.
गजाल कशी वाटली , सांगाक इसरा नको.
तुमचोच पिंटो इकाळो.
शब्दांकन - नितीन राणे
९००४६०२७६
सातरल कणकवली.
असे चतूर पण असतात.
मस्त गजाल... आमच्याकडेन पण
मस्त गजाल... आमच्याकडेन पण डोंगरानी जावन भाट्ये लावणारे आसत.. जास्ती नाय २-४ बाटले.. नि तेंची ठरलली गिर्हाईका
सही आहे
सही आहे
मस्त
मस्त
मस्तच
मस्तच
(No subject)
तिना हालीच अजय देवगन चो "
तिना हालीच अजय देवगन चो " दृश्यम " पिक्चर बघल्यान हूतो. त्यामुळे नवऱ्याचा काम म्हायत आसान पण आपल्या शब्दावर ठाम ऱ्यवली. >>>

भारीच
भारीच