पॅड मॅनः एका नव्या संकल्पनेला रुजवताना

Submitted by अमा on 10 February, 2018 - 08:32

पद्मावत बघून मग पॅड मॅन बघायचा म्हणजे पीएचडी चा थीसीस पूर्ण करून मग दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासारखे आहे. जौहर, स्वत्व, स्त्रीत्व पॅट्रिआर्की( मेली!!!) ह्यावर कोअर विचार करून झाल्यावर मासिक पाळी सारख्या एकेकाळी शरीर धर्म असलेल्या बाबीवरचा चित्रपट बघावा तरी का असे वाट्त होते पण वेळ होता. बघितला झालं. संपूर्ण चित्रपट एक प्रचारकी थाटाची डॉकुमेंटरी असल्यासारखा आहे. व इथे पण ती कायम फ्रेंच मुलग्याच्या सिनेमांत असणारी म्हातारी बाई आहे. ह्या क्षणाला मला परत निघून जावेसे वाटले पण
राधिका आपटे!!! उसके लिये तो हम जमीन बेच देंगे....

खिलाडी कुमार ह्यांच्या लेखी चित्रपट बनवणे म्हणजे एक शुद्ध धंदा आहे. वेळेत चित्रीकरण पूर्ण करणे, वेळेवर प्री पब्लिसिटी करणे व चित्रपट रिलीज करून तिकिट बारीवर मिळेल तो गल्ला बँकेत भरणे. ह्यात चित्रपटाची गुणवत्ता किमान असावी व सर्व साधारण प्रेक्षकाचे मनोरंजन व्हावे, तिकिटाचे पैसे वसूल झाल्यासारखे वाटावे एखादे गाणे प्रसिद्ध व्हावे चार दिवस चर्चा व्हावी हे म्हणजे अतिच. आता ह्या गणितात एखादा चांगला , कालानुरूप विषय हाती लागला की एक चांगला अनुभव प्रेक्षकांच्या पदरात पडतो. तो हा पॅड मॅन!!!!

चित्रपटाची सुरुवातच आपला हिरो लक्ष्मि चौहान ह्याचे लग्न लागते व राधिका आपटे सारखी सुस्वरूप गुणी बायको घरी येते. ह्या जोडप्याचे एक मेकांवर प्रेम व हा दृश्य स्वरूपात प्रेम करणारा नवरा बायकोची हर प्रकारे काळजी घेणारा आहे. तिला वेगळ्या गावातील इतर बायका घालतात त्या पेक्षा वेगळ्या फुलांचा गजरा घेउन देतो. कांदे चिरताना तिच्या डोळ्यातून पाणी येउ नये म्हणून तिला एक खेळणे मॉडिफाय करून देतो. संवेदनशील असा हा दुर्मिळ पती आहे. हे सर्व मध्यप्रदेशात महेश्वर इथे राहत आहेत. व तिथे राहणारे लोक असतील तसेच मध्यमवर्गीय, दकियानुसी विचारांचे आहेत. ह्यात लक्ष्मीच पुरोगामी विचारांचा व सर्जन शील प्रतिभेचा आहे. ( कारण तो मूळ तमीळ आहे!१)

बायको पाळी मुळे पाच दिवस बाहेर बस्ते तेव्हा ती त्या पाच दिवसात कापडाचे तुकडे वापरते हे त्याला अन हाय जिनिक वाट्ते म्हणून तो विकतचे महाग पॅडचे पाकीट घेउन येतो. पण बायको वापरायला नकार देते. मग हा स्वतः तसले पॅड बनवून आणतो पण तिला लाज वाटून ती त्याला ह्या बायकी प्रश्नात डोके घालू नकोस असे स्प्ष्ट सांगते.
पॅड साठी पंचावन्न रुपये खर्च करायला नाकारणारी बायको मारुतीच्या प्रसादासाठी लगेच एक्कावन्न रुपये मागते ह्यातला विरोधा भास लक्ष्मी ला जाण वतो पण बायकोला समजत नाही.

पुढे कथा आपल्या वळणाने सरधोपट अंगाने पुढे जाते. बायको बहिणी आई कोणीही ह्याची चागले हायजिनिक पॅड बनवायची व स्त्रियांची अडचण समजून घेण्याची कळकळ समजून घेत नाहीत. शेवटी जात पंचायतीत निवाडा होउन ह्याच्यावर अनेक आरोप होतात. बायकोला माहेरी नेले जाते कथा अगदी सरळ मांडली आहे. मध्यप्रदेश, महेश्वर चे चित्रण सुरेख आहे. पण पूर्ण सिनेमात तीन चारच आउ ट डोअर लोकेशन्स फिरू फिरू दाख्वली आहेत. ते अक्षय कुमार एका लिमिटेड रेंज मध्ये काम करतो. मूळ कथा वस्तूच खूप स्ट्राँग आहे त्यामुळे डिरेक्टरला फारसे काम नाही.

चित्रण व ट्रीटमेंट ह्यात नाविन्यपूर्ण काही नाही. पण लोकेशन्स वेगळी असल्याने एक फ्रेशनेस जाणवतो. घाटापाशी व्यायाम करणा रा लक्ष्मी , घरातली दृश्ये ह्यात नेपथ्य चांगले दाखवले आहे. घरे बारकी खूप सामानाने भरलेली.
खिडकीतून होणारी संभाषणे, हे नीट दाखवले आहे. आई तिघी बहिणी, बायको ह्या सर्व स्त्री मंडळात लक्ष्मी एकटाच बाप्या. तो पहिला सॅनिट री नॅपकिन बनवून पानात गुंडाळून त्यावर एक पांढरे फूल ठेवून बायकोला देतो . ते पॅकिंग च हरखून जाण्यासारखे आहे. दिग्दर्शक आर बाल्की पूर्वी जाहिरात पट बनवत असत. ती सफाई सर्वत्र दिसते.
व तसाच उथळपणा.

बायकांचे प्रश्न समजावून घेताना व नॅपकिनच्या ट्रायल्स घेताना बिचार्‍या लक्ष्मी वर लैंगिकदृष्ट्या वि कृत असल्याचा शिक्का मात्र बसतो. मध्यंतरानंतर ह्याचे दिवस पालट्तात. कमी खर्चात पॅड बनवायचे यंत्र बनवण्यात त्याला यश येते व पुरस्कारही मिळतो. सोनम कपूर ने तिला दिलेली व्यक्तिरेखा चांगली केली आहे. व तिचा पूर्ण कपडेपट दिल्लीच्या मुलीचा परफेक्टली घेतला आहे. त्यांची पहिली भेट एकदम मजेशीर आहे. जरूर बघा. आपण तयार केलेले उत्पादन स्वतः वपरून पाहिले पाहिजे म्हणजे त्यात काय कमी राहिले आहे ते कळते असे ऐकून लक्ष्मी स्वत पॅड वापरून पाहतो तो प्रसंग पण विनोदी अंगाने सुरू करून एका लाजिर वाण्या नोट वर संपतो. ह्यात साधारण पणे पीरीअड मध्ये लीकेज झाले तर ते मागच्या बाजूला होते व बायका कायम मागे काही लागले नाही ना ते तपासत राहतात ह्या ऐवजी त्याचे कपडे पुढॅ खराब होतात ही एक टेक्निकल चूक दाखवली आहे.

सोनम कपूरचे बाबा सरदार, आय आयटीत प्रोफेसर, सिंगल डँड लेकीला निगूतीने वाढवणारे, तिला आवड्ते म्हणून चिकनचे प्रकार शिकायला कुकिंग क्लास मध्ये जाणारे असे दाखवले आहेत. ह्या एका व्यक्तिरेखेने अनेक स्टिरीओ टाइप मोडले आहेत. त्या नटाने काम ही चागले केले आहे. ह्यांचा व अक्षयचा एक सीन आहे तो मला पूर्ण सिनेमात
बेस्ट वाटला. किती उत्तर भार तीय पुरुष व महिला त्या सीन पासून स्फूर्ति घेतील हा वेग्ळा मुद्दा आहे पण मला तरी
तो खूप आश्वासक वाटला. लोका ग्रा हास्तव तो विशद करून लिहीते.

लक्ष्मी परी( सोनमचे लहान पणचे फोटो बघत असतो) परीचे बाबा डॉ. तेजस वालिया तिथे येतात व सांगतात हिला मी किती प्रेमाने वाढवले आहे. हर तर्‍हेच्या केशरचना करायच्या, तिला आवरून शाळेत पाठवायचे अभ्यास घ्यायचा,
तिला सर्व वेळ चिकन खायला लागायचे तर मी बायकांच्या बरोबरीने क्लास मध्ये जाउन नवे प्रकार शिकलो. पंधरा बायकांच्यात मीच एक टा सरदार!! बाप बननेका असली मजा तो मां बनकेही आता है. ( हे खूप छान वाक्य आहे. )
व लक्ष्मी अ‍ॅग्री करतो डोळ्यानेच. मग बाबा पुढे म्हणतो. मर्द बननेका असली मजा अपने अंदर की फेमिनाइनिटी के टच मे रहनेसे ही है. एखादा पुरुष स्त्रियांना समजून घेत असेल, त्यांचे प्रश्न सोडव्ण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर त्याने त्याचे पौ रुषत्व कमी होत नाही किंवा त्याला डाग लागत नाही. हे अगदी कमी शब्दात पण फर्मली व्यक्त केले आहे. स्वस्त दरात पॅड उपलब्ध करून देण्याबरोबरच हा विचार ही मला एक महत्वाची नवी संकल्पना वाट्ते. महानगरांत असे विचार निदान विरोध करण्यापुरते तरी माहीत असतात पण गाव खेड्यात पसरलेल्या देशात हा एक नवा विचार रुजला पाहिजे निदान तसे प्रयत्न झाले पाहिजेत. तर मुली स्त्रियांचे जगणे सुसह्य होईल. सिनेमात हा सीन फार वेळ नाही पण महत्वाचा आहे.

अमिताभ बच्चनचा दोन तीन मिनिटाचा रोल पण अपेक्षित असा आहे. एकदम डिग्निफाइ ड व्यक्तिमत्व.

एकदा ब्रेक थ्रू मिळाल्यावर पुढे ब्रँडिन्ग प्रॉडक्षन महिला सक्षमी करण , बचत गट ह्यांना स्पर्श करत कथा पुढे जाते
फारसा इंपॅक्ट पडत नाही. सर्व सिनेमा भर वेग वेगळ्या स्तरातल्या, वयाच्या स्त्रियांचे ह्या वि ष यावरील वेग वेगळे मत व त्यांचे अ‍ॅप्रो च ऐकून गंमत वाट्ते. ते प्रत्यक्षच बघा.

शेवटी क्लायमॅक्स असा नाही पण युनो मध्ये लक्ष्मी त्याच्या लिंग्लिश मध्ये स्वतःची बाजू समजावतो. ते ओके ओके आहे. युनो मध्ये मागच्या बाजूला रस्त्यातल्या टॅक्स्या दिसत नसतील असा माझा समज आहे सीजीने केलयसारखे वाट्ते. ह्या वेळेची सोनमची साडी बनारसी व छान आहे आव्डली. ( कोक त कोक मोमेम्ट)

संगीत अगदी साधे आहे एक ही श्रवणीय गाणे नाही. प्रसंगानुरूप आहेत. शेवट क्युट आहे. मूळ संकल्पना चांगली आहे पण विवेचन व मांडणी अगदीच सरळ आहे. आपल्या विचारा त फारशी व्हॅल्यू अ‍ॅडिशन होत नाही
मूळ कल्पनेचे श्रेय ट्विंकल खन्ना ला दिले आहे. म्हण जे एखाद्या पॉवरफुल कथेचे डंब्ड डाउन बॉलिवु डीकरण कसे होते त्याचा प्रत्यक्ष पुरावा!!! पर क्या करते. पद्मावतीसारखेच इट टचेस ऑन द बेसिक्स अँड देन फ्लफ्स इट टु ग्लोरी.

ह्यापेक्षा आपले मायबोलीकर चिनूक्स ह्यांनी मूळ नायकावर लिहीलेला अतिशय प्रसिद्ध असा लेख परत वाचून घ्यावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परीक्षण आवडले. ह्या सिनेमा बद्दल जिथेजिथे बोलणं झालं, तिथे मी चिनुक्साच्या लेखाची लिंक दिली आहे.
अवांतर : पॅड डिस्पोझल बाबत काही आहे का सिनेमात?
मध्यंतरी कचरासेवकांनी ह्यासंदर्भात आंदोलन केले होते. पॅड, डायपर्सची राख होईल, अशी काही मशिन्स बाजारात आहेत. त्याचाही प्रचार होणे गरजेचे आहे.

मनोज कुमार च्या जागी अक्षयकुमार आला
चित्रपट चालत नसतील तर त्याला देशभक्ती, समाजसेवीचा तडका मारून प्रचारी थाट करायचा थोडी सिंपथी निर्मान करून हवा मारायची बस हाच फाॅर्मुला वापरला आहे
पॅड बरोबर सेल्फी हे त्यातलाच आचरटपणा होता. मुख्य समस्या बाजूला राहते यांचेच मार्केटींग गिमीक्स चालू असते नशिब टाॅयलेट चित्रपटावेळी कमोडवर बसून सेल्फी घ्यायचे सुचले नाही. Happy

मै +१
अमा , लिहित जा परीक्षण, भारी :).
अक्शय कुमारच्या त्याच त्या भारतप्रेम विषयांनंतर अता स्त्रियांच्या हायजिन वर कॉन्सन्ट्रेट करतोय असे दिसते, नथिंग राँग पण सिनेमा म्हणून फार मोनोटोनस, टॉयलेट पाठोपाठ अता सॅनिटरी नॅपकिन !
सिनेमा पाहिला नाही पण टॉयलेट ओवह्रहाइप्ड होता , हा ट्रेलर वरून त्याच मार्गातला वाटतोय.
सोश्॑ल मिडीया वर फोटो विथ पॅड ट्रेंड तर भंपकपणा होता, ज्या समाजात अवेअरनेस आणायचा / ज्या सोसायटीतल्या वर्गातल्या स्त्रियांसाठी सिनेमा बनवल्याचा दावा होतोय तो समाज सोशल मिडीयावर नाही , तेंव्हा सगळीच भोंदुगिरी वाटतेय.
असो.

छान परीक्षण अमा! माबो स्पेशल पंचेस पोचले Proud
डिजेचा मुद्दा पटला.. पण आजकालची ग्रामीण भागातली नवीन पिढी नक्कीच सोशल मीडियावर आहे. त्यांच्यापर्यंत सिनेमा पोचायला हवा.

अमांचा रिपोर्ट - आहे हे असं आहे स्टाइलचा आहे. चित्रपट पाहून झाल्यावर त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट होऊन मग बरं की वाइट ते ठरून परीक्षण लिहिलं जातं. तसं नाहीए. तो तो सीन बघताना जे जे मनात येतं ते लिहिलंय, असं जाणवलं. हे आवडलं मला.

अरुणाचलम मुरुगनंतम वर या आधी एक हिंदी चित्रपट येऊन गेलाय. सहासातच महिने झालेत.
दोन आठवड्यांपूर्वी दूरदर्शनवर पाहिला होता. बघताना मला तो डब्ड आहे की काय असं वाटत राहिलं.

या चित्रपटाच्या निमित्त एक प्रश्न पडला. हिंदी चित्रपट आहे म्हणून ती कथा उत्तर भारतात घडते आहे, असंच दाखवायला हवं का?

Straightforward परीक्षण आवडले. रुजवात हा शब्द हल्ली बऱ्याचदा "रुजणे" ह्या अर्थाने लिहिलेला वाचण्यात येतो. "रुजवात" चा अर्थ "दिलजमाई"/ resolution of conflict असा आहे.

हिंदी चित्रपट आहे म्हणून ती कथा उत्तर भारतात घडते आहे, असंच दाखवायला हवं का?>>>>>

तसे नाही केले तर तामिळनाडू हिंदी कधीपासून बोलायला लागला हा प्रश्न तुम्हाला पडेल. तामिळनाडू तमिळच बोलतोय असे दाखवले तर तो हिंदी चित्रपट कसा हा नवा प्रश्न निर्माण होईल.

भरत, फुल्लू हा हिंदी चित्रपट आहे. पण कलाकार अपरिचित व बजेट कमी यामुळे बोलबाला कमी.

पॅडमॅन हा बिग बजेट, बिग बॅनर चित्रपट आहे. त्याचा तितकाच मोठा बोलबाला केला नाही तर त्या बॅनरची लाज जाईल. हल्ली प्रॉडक्ट् काय आहे, गुणवत्ता किती आहे हे बॅकफुटावर गेलेय. कोण विकतोय, कसे विकतोय याला अवास्तव महत्व आलेय.

अजबराव, रुजवात अर्थाबद्दल धन्यवाद.

मला अरुणाचलम मुरुगानंतमवर चित्रपट कसा बनेल ही उत्सुकता होती. कारण मूळ कथानायकाचे आयुष्य जरी संघर्षाने भरलेले असले तरी हिंदी चित्रपटाला आवश्यक तो मसाला त्यात अजिबात नाही. त्याचा संघर्ष व प्रगती पडद्यावर कितपत उतरलीय? अमानच्या परिक्षणातून ती थोडीफार उतरली असे वाटतेय.

धन्यवाद. रुजवात शब्दाची व व्युत्पत्ती सांगितल्यामुळे तो बदल केला आहे व नवी संकल्पना पण विशद केली आहे.

तसे नाही केले तर तामिळनाडू हिंदी कधीपासून बोलायला लागला हा प्रश्न तुम्हाला पडेल. तामिळनाडू तमिळच बोलतोय असे दाखवले तर तो हिंदी चित्रपट कसा हा नवा प्रश्न निर्माण होईल.
>>> हा हा हा.. सही पकडे है !!

पन्नास वर्षांचा दिसणारा नायक अजून कॉलेजात कसा शिकतोय, असले प्रश्न नाही पडून घेतले कधी. त्यामुळे तामिळनाडूत हिंदी का बोलतात असा प्रश्नही नाही पडून घेणार.
बायोपिक असेल, तर नाव गाव तेच ठेवता येतं.
गांधी आणि कस्तुरबा एकमेकांशी इंग्रजीत बोलताना पाहिलेत.

अमा, छान परीक्षण. चित्रपट कसा आहे हे स्वत:च्या आवडी निवडीचा इन्फ्युअन्स होऊ न देता पोहोचवलात.

अक्षयची रेंज भारी आहे
पॅडमॅन, टॉयलेट सारखे सामाजिक करतो. देशभक्तीचे हॉलिडे, बेबी करतो. कॉमन मॅनचे जॉली एलेलबी किंवा रुस्तम, एअरलिफ्ट सारखे करतो. मध्येच एखादा स्पेशल छव्बीस येतो. आचरट कॉमेडीपटांची लिस्ट निघेल. एक्शन चित्रपटांबाबत बोलायलाच नको. एकेकाळचा खिलाडी एक्शनकुमारच होता तो. रोमांटीक आणि टिपिकल बॉलीवूड मसाला करण्यात अर्धे आयुष्य गेलेय त्याचे. करीअरच्या एका टप्प्यावर अशी इमेज बदलत दोन्ही इमेज एकाच वेळी कॅरी करणे कौतुकास्पद आहे. भले त्याची धाव शे दिडशे कोटींची असेल पण मर्यादित अभिनयक्षमता असताना हे जमवणे, नक्कीच एक स्पेशल एक्स फॅक्टर आहे त्याच्यात. आजवर पडद्यावर कधी तो इरीटेटींग वा असह्य वाटला नाही. एकवेळ त्याचा एखादा चित्रपट तसा वाटेल, पण तो नाही. त्यामुळे अगदी डॉक्युमेंटरी टाईप्स वा नीरस वा फसलेला असेल तरी एकदा बघायला हरकत नाही. अर्थात थिएटरात नाही, घरी नक्की बघणार..

बायोपिक असेल, तर नाव गाव तेच ठेवता येतं.>>>>>

हा नाहीय ना, फुल्लूही नव्हता. दोन्ही चित्रपटात अरुणाचलम नाही. फुल्लू मध्ये फुल्लू आहे, यात लक्ष्मी चौहान आहे. यापैकी कुणी एक जरी अरुणाचलम असता तरी तामिळ बोललेलं जस्टीफाय करता आलं असतं. गांधी व कस्तुरबा ह्याच नावाने होते ना चित्रपटात?

वाचायची फार इच्छा असूनही. पूर्ण वाचू शकले नाही. मराठीत लिहिले असते तर वाचायला फार आवडले असते. देवनागरीत लिहिलेले विविध इंग्रजी शब्द रसभंग करुन जातात. क्षमस्व.

मी आज कॉफी प्यायला मशीन समोर गेले होते. तर घडलेला प्रसंग. मराठी बाई स्वच्छता कामगार व उत्तर भारतीय / इतर भारतीय पुरुष सप्लायर . सप्लायर च्या माणसाने बाईस बोलावले व विचारले इथल्या चार लेडीज टॉयलेट्स तुमची टीमच साफ करते ना? तिथे मशीने बसवायची आहेत. लेडीज को वो चीज लगती हैना. महिनेमे एक बार आप समझ गयीना वो मशीन लगवाने है.

ती म्हणे डस्ट बिन मध्ये फेकतात.

तो म्हणे मशीन लगवानी है.

ती गप्प बसून समजून घ्यायला बघत होती की नक्की तिने काय करायचे आहे. मग तिला शुद्ध मराठीत सांगितले ते नॅपकिन चे मशीन किंवा डिस्पोज ऑफ करयचे मशीन बसवायचे सांगत आहेत. डस्ट बिन मध्ये टाकू नये किंवा फ्लश करू नये म्हणून ह्या वस्तूचे एक खास मशीन असते डिस्पोज करायचे कदाचित ते आणून बसवायचे असे ते म्हणत आहेत. किंवा व्हेंडिंग मशीनही असू शकते. फॉर यूज व फॉर डिस्पोजल अशी व्य्वस्थित साखळी उपलब्ध करून दिली जात आहे. हे बघून परम संतोष जाहला तथापि ह्या विषयावर व लेडीज् की चीज वर मोकळेपणे बोलायची खूप गरज आहे हे अधोरेखित झाले. संवाद चालू ठेवला तर गैरसमज कमी होतील.

मूवी ठिकठाकच आहे.
मला सोनम, तबला वाजवतानचा सीन इतका नाटकी वाटला की हसायलाच आले. अरे ताल कुठला चालुय आणि हिची बोटे कशी फिरताहेत..
अक्षयकुमार म्हणजे, दिलेला गॄहपाठ उतरवायचा आणि करायचा; तो टाळक्यात शिरलाय की नाही असे दाखवायचे नाही मास्तराला असा अभिनय.

कथेत बदल आहेत , अरुणाचलम ह्यांनी वापरलेले पॅड्स गोळा करून अभ्यास केला असे वाचालेले.

बाकी, ज्योती सुभाषला फुकट घालवलेय. आणि मृण्मयी गोडबोले सुद्धा.